Friday, January 31, 2020

राज की समाज.......... कारण!(?)



राज की समाज.......... कारण!(?)


अण्णा साहेब सकाळी 10 वाजल्या पासून त्यांच्या केबिनमधे येरझा-या घालत होते. ते कोणावर तरी प्रचंड चिडले होते. पण कोणावर ते कळायला मार्ग नव्हता. आणि त्या तापल्येल्या राक्षसाच्या समोर जाण्याची कोणाचीच हिम्मत नव्हती. सगळेच उदयची वाट बघत होते. उदय म्हणजे आण्णांचा मुलगा. त्याचा उदयच मुळी दुपारी व्हायचा. सवईप्रमाणे साधारण एकच्या सुमारास उदयने कार्यालयात पाऊल ठेवले.

"आण्णासाहेब सकाळपासून भडकले आहेत." एकाने तत्परतेने उदयला माहिती दिली. त्याच्याकडे दुर्लक्ष करत उदय आण्णांच्या केबिनमधे शिरला.

"कुठे उलथलेला असतोस रे तू?" भडकलेल्या आण्णांनी खाऊ का गिळू या नजरेने उदयकडे बघत प्रश्न विचारला.

"आण्णा तुम्हाला माहित आहे. का विचारता आणि उगाच मला तोंड उघडायला लावता. काय झालय् इतकं तापायला?" उदयने तेवढ्याच थंडपणे उत्तर दिले.

"अबे... तुझ्या मायला. मला अक्कल नको शिकवूस भोसडीच्या. म्हणे का विचारता... साल्या आजकाल तुला ती चवचाल भवानी भेटली आहे तेव्हापासून तुझ लक्षच नसत." उदयच्या थंडपणामुळे अजून भडकून आण्णा ओरडत म्हणाले.

"ओ.... माझी चवचाल भवानी माझ्या ताब्यात असती. तुम्ही तुमच बेण सांभाळा ना. बोलता का आता काय झालय् ते? की मी निघु?" उदय उद्धटपणे बोलला.

"फार तोंड़ सुटत आहे भडव्या तुझ आज काल." त्याच्या बोलण्याने भडकलेले आण्णा आता काय करतात अस बाहेरच्यांना वाटलं. पण क्षणात शांत होत ते म्हणाले,"बर ते जाऊ दे. गावात कोण आलिय रे ती नवी बया? ऑ? सालीने पंचायतीच्या हॉलच्या शेजारचीच रूम घेतली आहे. संस्थेचा बोर्ड पण लावला आहे स्वतःच्या. म्हणे गावच्या सर्व स्त्रियांना एकत्र करणार. काम देणार. कमवायला शिकवणार. चायला... आता बायका घराबाहेर पडून कमवणार तर पुरुष काय घर सांभाळणार आणि पोरं पैदा करणार का? माहिती घे रे तिची. दोन दिवसात दुखवटा व्यक्त करावा लागेल तिचा तेव्हा उपयोगाला येईल."

"मला वाटलच होत तुमच्या रागाच कारण हेच असेल. म्हणून मी आत्ताच सगळी माहिती काढली आहे. तिच्या वाकड्यात जाण्यात अर्थ नाही..."उदय समोरची खुर्ची ओढून त्यावर बसत म्हणाला.

"का रे भवानी काय चिलखत घालून फिरते की काय?" आश्चर्य वाटून आण्णांनी विचारल. उदयने माहिती काढून आणली आहे हे समजल्यावर त्यांचा पारा थोडा उतरला होता.

"तसच समजा हव तर. ती अपोजिट पक्षातल्या जिल्हा स्तरावरच्या नेत्याची मुलगी आहे. तिचा नवरा IPS अधिकारी आहे. ही बया स्वतः सामाजिक काम गेली 12-13वर्ष करते आहे. ज्या संस्थेसाठी करते आहे ती संस्थासुद्धा बरीच फेमस आहे. पार परदेशातून मदत येती म्हणे तिला." उदयने एकूणच इत्यंभूत माहिती दिली.

हे सगळ ऐकून आण्णा भलतेच शांत झाले. येरझारा थांबवून ते त्यांच्या जागेवर जाऊन बसले.

"तिच्यायला... इथे आपल्या गावात का उगवली आहे ही ब्याद?" त्यांनी कपाळावर हात मारत काहीस स्वतःला आणि काहीस उदयला उद्देशून प्रश्न केला.

उदयच आण्णाकडे लक्ष नव्हत. त्यामुळे ते आपल्याला विचारत आहेत अस समजून त्याने त्याच्या नेहेमीच्या स्टाईळे उत्तर दिल.  "ते तिच नीट सांगू शकेल. बोलावून घेऊ का तिला इथे?"

त्याच्या उत्तराने परत एकदा आण्णांचा पारा चढला. ते परत एकदा त्याच्यावर ओरडले,"उदय तू बिंडोक आहेस.. अरे तू माझा वारस ना रे? आत्ताच तूच म्हणालास ना तिच्या वाकड्यात जाण्यात अर्थ नाही म्हणून. मग इथे बोलावून कस चालेल? बेअक्कल कुठला. जा चल तू निघ इथून. बघतो मी काय ते."

बेफिकीरपणे खांदे उडवत "ठीके" अस म्हणून उदय केबिन मधून बाहेर पडला आणि त्याच्या मागोमाग आण्णासाहेब देखिल दुपारच्या जेवणासाठी वाड्याकडे निघाले.

आण्णांची घरी येण्याची वेळ तशी ठरलेली नसायची. त्यामुळे त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई कायमच त्यांची वाट बघत असायच्या. त्याच कारण देखील तसच होत. त्या आण्णांना  खूप घाबरून असायच्या. तापट आण्णा कधी कोणत्या गोष्टीवरुन चिड़तील आणि अंगावर हात टाकतील याचा काही भरोसा नसायचा. अजूनही.... मुलगा इतका मोठा झाला तरीही परिस्थिती बदलली नव्हती. ज्याच्याकड़े आशेने बघितल असत असा मुलगा उदयदेखील दिवटा निघाला होता. त्याची शिक्षणाच्या नावाने बोंब होती. वयाच्या सोळाव्या वर्षापासुनच बापाने दिलेल्या बुलेटवरुन गावात भटकायच आणि स्वतःच्या वयाचा विचारही न करता पोरी-बाळींना सतवायच याशिवाय त्याने कधी काही केल नव्हतं. आता तिशीचा झाला होता पण चोविशीचा होता तेव्हा एका सतरा वर्षाच्या पोरीला पुरत नासवल होत. तिला त्याने मारूनच टाकल असत. पण नेमक्या निवडणुका समोर होत्या म्हणून आण्णासाहेबानी लग्न लाउन दिल होत... म्हणून लग्न झाल म्हणायच आपल्. त्या पोरीची अवस्था लक्ष्मीबाईंसारखीच होती.

घरात शिरता-शिरता आण्णानी लक्ष्मीबाईंना आवाज दिला.

"लक्ष्मी.. ए लक्ष्मी...."

त्या मागील दारी मच्छीवाली आली होती तिच्याशी बोलत होत्या. त्यांना हाक एकु गेली नाही. इथे सुनबाईच काळीज सासुपुढे वाढून ठेवलेल्या लाथा-बुक्क्यांचा ताटाने धड़धड़ु लागल. ती मागिल दारी धावली.

"आई... अहो सोडा ते. मामंजी आल्येत. तुम्हाला बोलावतायत. जा लवकर. मी बघते इथल." घाईघाईने सासूबाईचा हात ओढत ती म्हणाली.

लक्ष्मीबाईंच्या पायाखालची जमिनच हादरली. पहिल्या हाकेत उत्तर नसल की काय होत याची त्यांना कल्पना होती. त्या  दिवानखाण्याच्या दिशेने अक्षरशः धावल्या. तोवर आण्णानी अजुन 2-3 वेळा हाक मारली होती.

"मागिल दारी होते जी. हाक एकु नाही जी आली." धपापत खालच्या आवाजात लक्ष्मीबाईं म्हणाल्या.

त्यांना समोर बघितल्या क्षणी कारण नसताना चिडत काहीही बोलायच्या अगोदर आण्णानी त्यांच्या मुस्काटात भड़कावली आणि मग म्हणाले,"ए बये मला कारण सांगू नकोस नाहीतर भर चौकात चाबकाने फोडेन. चल जेवायला वाढ मला."

अचानक बसलेल्या मारामुळे धड़पडलेल्या लक्ष्मीबांई स्वतः ला सांभाळत आणि डोळ्यात येणारे पाणी लपवत आत गेल्या. त्यांनी आण्णाच ताट वाढल. ते जेवायला बसले.

"लक्ष्मी एक काम करायच आज. गावात एक अति शिक्षित भवानी आली आहे. काय संस्था-बींस्था चालवते. त्या बयेला घरी बोलवायचं तुमच काहीतरी बायकांच कारण काढून. पुढच मी बघुन घेतो." जेवताना आण्णांनी लक्ष्मीबाईना फर्मान सोडलं.

लक्ष्मीबाईं धास्तावल्या. "म्हणजे घरात काही......"

"ए सांगतो तेवढ कर. मगासची ठेवून दिलेली कमी पडली काय?" आण्णा वसकन लक्ष्मीबाईंवर ओरडले. तशी लक्ष्मीबाईं गप आत गेल्या. साधारण तीनच्या सुमाराला त्या 'स्व निर्भरा महिला संस्था' च्या कार्यालयात पोहोचल्या. सुगंधा तिथेच बसली होती. ती नविन सुरु करायच्या प्रोजेक्टचा final draft तयार करत होती.

"नमस्कार. मी लक्ष्मी. आण्णा साहेबांची पत्नी." लक्ष्मीबाईं आत शिरून थेट सुगंधाच्या समोर उभ्या राहिल्या आणि बोलल्या.

सुगंधा माने म्हणजे अजितराव राणे यांची कन्या होती. अजितराव राणे म्हणजे देशातल्या एका मोठ्या पक्षामधील या जिल्ह्यातील सर्वेसर्वाच म्हणायचे. सुगंधाचे पति IPS अधिकारी होते. सुगंधाला राजकारणापेक्षा सामाजिक कामाची आवड होती. त्यामुळे वडिलांच्या इच्छेविरुद्ध ती गेली अनेक वर्षे स्व-निर्भराच काम करत होती. लग्नानंतरही तिच ते काम चालूच होत. सध्या तिला या गावात संस्थेची नवीन शाखा सुरु करण्याची जवाबदारी दिली होती. तिने आण्णा दळवी यांच्याबद्धल बरच एकल होत. त्यांच्या मदतिशिवाय या गावात काही करता येणार नाही याची तिला कल्पना होती. गेली दहा एक वर्षे ती या संस्थेच् काम करत होती. त्यामुळे 'पानी में रेहेना हे तो मगरमछ से दोस्ती अच्छी।' असा तिचा विचार होता. तशी ती सामाजिक कार्यकर्ती असली तरी बरीच प्रैक्टिकल होती. त्यामुळे आण्णासाहेबांच्या पत्नीच आपणहून आल्या आहेत हे पाहून तिला बर वाटल.

लक्ष्मीबाईना समोर बसायला सांगत सुगंधा म्हणाली,"नमस्कार वहिनी. अरे बसा न. ऐकून आहे मी आण्णासाहेबांबद्धल. पण तुम्ही कशा काय इथे? आमच्या संस्थेच् काम करायला की काय?" तिने मुद्दाम खोडसाळ पणा केला.

लक्ष्मीबाई एकदम विंचु चावल्या सारख्या उडाल्या. "छे छे.. आमच्याकडे असलं काही चालत नाही. अहो ताई हे आज सांगत होते की तुम्ही आमच्या गावातल्या बाया-बापड्यांसाठी काम करायला आला आहात. म्हंटल तुमची ओळख करून घ्यावी. तुमच काम आटपल की आज चहा पाण्याला या की घरी."

सुगंधा हसली. "अहो काम काय होत राहील. तुम्ही इतका आग्रह करता आहात तर चला. आत्ताच येते तुमच्या बरोबर."

लक्ष्मीबाईंना हे अपेक्षित नव्हतं. मुळात त्यांना सुगंधला घरी बोलवायच नव्हतं. त्यामुळे त्या थोड्या गडबडल्या पण त्यांनी पटकन सावरून घेतल आणि सुगंधा लक्ष्मीबाईं बरोबर निघाली. दोघी रस्त्याने चालत होत्या. सकाळच्या माराच्या खुणा लक्ष्मीबाईंच्या गालावर उमटल्या होत्या. सुगंधाला ते लक्षात आल.

"वहिनी काय हो हे?" तिने आश्चर्य वाटून विचारल.

"छे छे... काही नाही... काही नाही..." अस म्हणत लक्ष्मीबाईनी पदर लपेटुन घेतला आणि भराभरा चालत वाडा गाठला.

सुगंधा आपल्या पत्नीसोबत लगेच आलेली पाहून आण्णांना देखील आश्चर्य वाटल. पण ते चेहेऱ्यावर दाखवून न देता सुगंधाच स्वागत करत ते म्हणाले,"या या सुगंधाताई. बरच एकल आहे तुमच्या बद्धल आणि तुमच्या कामाबद्धल."

"नमस्कार आण्णा साहेब. मी देखिल बरच एकून आहे आपल्याबद्धल. आपल्या मदतिशिवाय गावात नविन काही करण शक्य नाही म्हणतात." सुगंधाने हसत म्हंटल आणि त्यांना नमस्कार केला.

आण्णाना सुगंधा इतकं स्पष्ट बोलेल अस वाटल नव्हतं त्यामुळे ते थोडे गडबडले. पण ते देखील पक्के खिलाडी होते. सावरून घेत म्हणाले,"अहो कसल काय? आम्ही देखिल थोड़ फार सामाजिक काम करतो. म्हणून तर लोकांनी निवडून दिल आहे. म्हंटल इतकी मोठी संस्था आमच्या गावात येणार ... काम करणार... पण काम बाया-बापड्यांसाठी आहे. म्हणून तर लक्ष्मीला म्हंटल जरा लक्ष घाल तू पण."

"हे बाकी बर केलत. उद्यापासून येऊ देत वहिनीना आमच्या संस्थेत. त्यांच्या सारख्या महिलांची खरच गरज आहे." सुगंधाने डाव साधत लगेच बोलून टाकल.

आण्णा एकदम गड़बडले. त्यांना फ़क्त एवढच म्हणायच होत की तुला बोलावण्या पुरत लक्ष्मीला लक्ष घालायला सांगितल. पण आता त्यांना मागे हटता येईना. त्यांनी विचार केला आत्ता हो म्हणू... रात्रि लक्ष्मीला काय ते समजाऊ. म्हणजे तिच नाही म्हणेल उद्या.

"हो हो... येईल न ती. तशी ती आमच्या शब्दाबाहेर नाही."

"बघा वहिनी मी म्हणाले नव्हते तुम्हाला? तुम्ही उगाच घरच काम... शेती... पै-पाहुणा.. असली असंख्य कारण रस्ताभर मला सांगितलीत. आण्णाचीच इच्छा आहे तुम्ही आमच्या संस्थेच काम करावत. आणि मी काही दिवसभर नाही बोलवत तुम्हाला. दुपारी या साधारण दोन-तीनपर्यंत. तास दोन तास थांबा आणि आजच्या सारख्या सहाला घरी चहाच्या वेळेपर्यंत. काय?" सुगंधा हसत म्हणाली. खरतर तिच आणि लक्ष्मीबाईच अस काहीच बोलण झाल नव्हतं. पण इतक्या वर्षात आता सुगंधालासुद्धा कशी खेळी करायची ते माहीत झाल होत. मात्र खरी पंचाईत लक्ष्मीबाईची झाली होती. हो म्हणावं तर नवरा काय करील याचा भरोसा नाही आणि नाही म्हणावं तर ही हुशार बाई काय ते समजून जाईल. त्यामुळे त्या गप्पच बसल्या. त्या काही बोलत नाही हे बधून सुगंध म्हणाली,"वहिनी आला नाहीत उद्यापासुन तर मी स्वतः घ्यायला येईन ह."

त्यावर आण्णासाहेबच म्हणाले,"येईल हो ती उद्यापासून. तुम्ही बसा." आणि लक्ष्मीबाईना त्यांनी चहा आणायला सांगितलं.
---------------------
"आठ दिवस झाले तुझी आई देवळात गेली नसेल इतक्या भक्तिभावाने त्या संस्थेत जाते आहे. उदय... हे काही खर नाही पोरा. त्या भवानीला आट्यात घ्यायलाच हवी. पण यावेळी थोड़ वेगळा गेम करावा लागेल. तयारीची दिसती आहे टवळी." दुपारच्या जेवणानंतर आण्णा उदयशी बोलत होते.

"उचलु का तिला? ब-याच दिवसात नविन काही नाही पाहिल." उदयने नेहेमीप्रमाणे मुक्ताफळ उधळली.

"भाड्या मी काय विचार करतोय आणि तू काय बोलतो आहेस. उदय अरे जरा काम-धंद्याला लाग. पालिकेच्या निवडणुका आठ महिन्यावर आल्यात. गावाच राजकारण आता तू बघायच. मी पंचक्रोशीच बघतो आहे गेली तीन वर्ष. गावसुद्धा मीच सांभाळायच का? बास कर की तुझा हा बाहेरख्यालीपणा" आण्णा वैतागून म्हणाले.

"वा वा! कोण कोणाला सांगतय बाहेरख्यालीपणा बद्दल! आण्णा शैला म्हणत होती परवा रात्रि तुम्ही तिच्या दाराशी थांबला होतात. पाणी मागितलत आणि हात धरलात. अहो ती माझी आहे. तिला तरी सोडा." उदय उर्मटपणे आण्णाकडे बघत म्हणाला.

उदयच्या उर्मटपणाने चिडलेले आण्णा त्याच्या अंगावर धावून जात ओरडले,"ए भेनच्योद तोंड आवर नाहीतर जीभ हासडून ठेवेन. भाड्या तुझी काय ती? तीचेच दागिने विकुन खाल्लेस... तिला लग्न करू देत नाहीस... साली आली होती रडत आणि पदर पसरून माझ्याकडे त्यादिवशी. पदर जास्त पसरला गेला आणि थोड़ा इथे तिथे हात लागला... एवढच. पण आता तू इतका मोठा झालास की मला तू विचारणार? आजही कानाखाली आवाज काढिन तुझ्या. समजल? चल चालता हो. मला विचार करू दे."

आण्णांचे बोलणे एकून उदय विचारात पडला. तो काही न बोलता वाड्यातून बाहेर पडला. आण्णा मात्र त्यांच्या आरामखुर्चीत बसून विचार करत होते.
-------------------------------------
आण्णांनीच सुगंधासमोर परवानगी दिल्यामुळे लक्ष्मीबाई रोज न चुकता सुगंधाच्या संस्थेत जात होत्या. आण्णा त्यांना थांबवू शकत नव्हते आणि त्यांना हे अस लक्ष्मीबाईच संस्थेत जाण आणि काम कारण पटत देखील नव्हत.

आण्णा आज थोड़े लवकरच वाड़यावर आले. लक्ष्मीबाई अजुन संस्थेतून घरी आल्या नव्हत्या. हे समजल्यावर आण्णाचा पारा चढ़ला. लक्ष्मीबाईनी घरात पाय ठेवला आणि आण्णानी त्यांना वृन्दावनासमोर बडव-बड़व... बडवल. लक्ष्मीबाई दोन दिवस तर त्या खोलीतून बाहेर पडु शकत नव्हत्या. पण त्यांना सुगंधा वाट बघत असेल याची कल्पना होती. त्यांच्या सुनेला घराबाहेर जाण्याची परवानगी नव्हती. पण त्यांनी सुनेला गळ घातली.... म्हणल्या,"सुगंधा माझी वाट बघत असेल ग पोरी. तिला निरोप तरी दे ग. कसही कर आणि तिला कळव की मला थोडं बर नाही. मला विचारात सुगंधा घरी आली तर अनर्थ होईल." पण सुन तरी काय करणार? जर ती बाहेर पडली अस उदयला समजल असत तर तिची खाट लक्ष्मीबाईच्या शेजारी पडली असती. त्यामुळे ती गेली नाही. शेवटी लक्ष्मीबाईना ज़ी भिती होती तेच झाल. सुगंधा तिस-या दिवशी घरी आली. कर्मधर्मसंयोगाने आण्णा घराच होते.

"या... या... सुगंधाताई. आज इकडे कुठे?" तिला समोर बघून त्यांनी खोट हसत तिच स्वागत केल.

"अहो वहिनी पडल्या म्हणे? चौकशिला आले." त्यांना हसत नमस्कार करत सुगंधाने उत्तर दिल.

आण्णा अवाक् झाले. कारण लक्ष्मीला बर नाही याची खबर बाहेर नव्हती.

"छे हो! तिला काय धाड़ भरली आहे. झक्कास आहे ती." त्यांनी उत्तर दिल.

"मग बोलवा न!" अस म्हणून सुगंधानेच हाक मारायला सुरवात केली. "वहिनी अहो वहिनी..."

"त्या जरा पडल्यात. थोड़ी कणकण आहे अंगात." आतल्या दाराशी येऊन सुनेने उत्तर दिल.

"अरे? तू कोण?" माहित असूनही सुगंधाने मुद्दाम आश्चर्याचा आव आणून विचारल.

"आमची सुनबाई." सून काहीतरी बोलेल म्हणून मनात नसूनही आण्णांनी उत्तर दिल.

"अरे वा आण्णा. तुम्हाला सुनदेखिल आहे? वाटत नाही तुमच्याकडे बघुन. तुम्ही अजूनही बरेच तरुण दिसता की" सुगंधाने आण्णांना चढवण्यासाठी म्हंटल.

हे ऐकून आण्णा खुश झाले. मिशीला पिळ देत त्यांनी आत बघत ऑर्डर सोडली. "पाहुण्या ताई आल्यात. चहां पाण्याच् बघा."

सुन मागल्या पावली आत पळाली आणि चहा-नाश्ता घेऊन आली.

तिला समोर आलेलं बघून सुगंधाने मुद्दाम तिच्याशी बोलायला सुरवात केली. तिला आपल्या बरोबर बसायला सांगत सुगंधाने विचारल,"अरे लहान दिसतेस ग. काही शिकली आहेस की नाही?"

पदर घट्ट डोक्यावरुन लपेटुन तिने हळूच उत्तर दिल. "हो जी. सातवी पास."

"अरे वा... बरीच शिकली आहेस की. बर झाल बाई तू भेटलीस. उद्या पासून तू पण ये संस्थेत वाहीनिंबरोबर. लिखा-पढ़ी तूच करशील. माझ काय बाई... माझ्यासाठी हा दोन-चार महिन्यांचा प्रोजेक्ट आहे. मग मी जाणार. तुला आणि वाहिनींनाच मग चालवायची आहे संस्था. काय आण्णा साहेब बरोबर न?" सुनेशी बोलत पण आण्णांना हवी असणारी माहिती स्वतःहून देत सुगंधा म्हणाली.

ही नवीन माहिती ऐकून आण्णा एकदम खुश झाले. 'म्हणजे ही बाई थोड्या दिवसांसाठीच् आली आहे तर.' अचानक त्यांना सुटल्यासारखे झाले. त्यांनी विचार केला 'बर झाल. मोठ नाव असलेल्या संस्थेचा आधार मिळाला तर भविष्यात उपयोग होईल. त्यात लक्ष्मी आणि सुनबाईनाच ही हाताशी घेते आहे. म्हणजे पुढे हिची संस्था आपल्यला खिशात घालता येणार आहे.' आपल्या विचारावर खुश होत आण्णा मोठ्याने म्हणाले,"हो हो... अगदी बरोबर. येईल न तीसुद्धा लक्ष्मीबरोबर. तशा दुपारी त्या मोकळयाच असतात." सुगंधाने हसत-हसत मान डोलावली आणि चहा घेऊन ती वाड्यावरून निघाली.
--------------------------
संस्थेच्या कामाला जवळ-जवळ दोन महीने झाले होते. लक्ष्मीबाईनी स्वतः गावात फिरून बायकांना एकत्र केल होत. त्यांची सुनसुद्धा आता संस्थेच्या कामाला सरावली होती. बायका ही आता मोकळेपणाने सुगंधाशी बोलायला लागल्या होत्या. सुगंधादेखिल कधीच मोठी मोठी भाषण देत नसे. त्यांच्याशी गप्पा मारायच्या. त्यांचे प्रश्न विचारायचे... आणि हळूहळू त्यांना स्वतः च्या पायावर उभ राहाण्याच महत्व समजावायच. असा एकूण तिचा कार्यक्रम असे. त्यातच त्यांच्याशी बोलून गावात कुठला व्यवसाय सुरु कारण जमेल त्याची पड़ताळणी देखील ती करत असे.

हळूहळू तिने गोणपाटाच्या पिशव्या बनवण्याचा व्यवसाय तुम्ही करु शकता; असा विश्वास गावातल्या महिलांच्या मनात निर्माण केला. पहिल्या शंभर पिशव्या त्यांच्या मागे लागून करून देखील घेतल्या. आता प्रश्न या पिशव्या विकण्याचा होता. यासाठी आश्चर्यकारक रित्या आण्णासाहेब पुढे आले. जील्ह्याच्या ठिकाणी काही मोठ्या दुकानातून त्यांच्या ओळखी होत्या. त्या लोकांशी बोलणी करून देण्यासाठी स्वतः आण्णासाहेब सुगंधाला नेणार होते. त्यांनी लक्ष्मीबाई बरोबर सुगंधाला निरोप पाठवला होता. वाड्यावर लवकर या. सकाळी लवकर निघावे लागणार होते. म्हणून मग काम लवकर आटपून त्यादिवशी सुगंधा घरी लवकर आली होती.

सगळ लवकर उरकून सुगंधा पलंगावर आडवी झाली. रात्रि अचानक तिच्या खोलीच्या खिड़कीची कड़ी अगदी हळू आवाजात वाजली. पण त्या आवाजाने देखिल सुगंधाला जाग आली. तिच्या लहानपणापासून तिला सांभाळणारे सदा काका तिच्या खोली बाहेर झोपले होते. साठीच्या घरात असले तरी आजही चार जणांना भारी पडतील अशी शरीर यष्टि होती त्यांची. त्यांच्याच भरोशावर सुगंधाचे वडील आणि पति तिला असे चार-चार महीने घरापासून लांब राहायला देत होते. सदा काकांची झोपही सावध होती. ते लगेच उठुन आत आले. तिला गप रहाण्याची खूण करून खिड़कीजवळ गेले. आतली अस्पष्ट हालचाल जाणवून बाहेरील व्यक्तिने हलक्या आवाजात हाक मारली. आवाज स्त्रीचा होता. सुगंधा पटकन खिड़कीजवळ गेली आणि तिने हळूच खिड़की उघडली.

"ताई मी शैला. मला आत घ्या ना."

एकदा सदा काकांकडे बघुन सुगंधाने तिच्यासाठी दार उघडले. शैला आत येऊन अक्षरशः सुगंधाच्या पायावर कोसळली. तिचा बांध फुटला होता. आणि तरीही आवाज होऊ नये म्हणून तोंडात पदराचा बोळा खुपसुन ती ओक्साभोक्षी रडत होती. सुगंधा ती शांत व्हायची वाट बघत होती. काही वेळाने शैलाने स्वतःला सावरले आणि ती बोलायला लागली,"ताई मला त्या हलकट आण्णा आणि त्याचा मुलगा उदय पासून वाचवा हो.   पाच महीन्यांपूर्वी माझे वडील गेले. आई लहानपणीच् गेली होती. वडील गेल्याच्या दुस-या दिवशी उदयने घरात घुसून माझ्यावर बलात्कार केला. तो दिवस आणि आज... शप्पथ सांगते ताई.. एक रात्र सोडत नाही हो तो. दिवसा देखील कधीही घुसतो. कधी शेतात ओढतो... माझ्या वडिलांनी माझ्या लग्नासाठी हौसेने दोन-चार दागिने केले होते तेसुद्धा त्याने घेतले आणि विकले. म्हणे आता मी तुला ठेवली आहे तर लग्नाचा प्रश्नच येत नाही. मग दागिने कशाला हवेत. ताई हे कमी होते म्हणून की काय काल आण्णानी निरोप पाठवला. वाहिनीनी बोलावल आहे वाड्यावर. मला मुर्खाला कळल नाही हो त्यांचा डाव. दुपारी वहिनी आणि उदयची बायको तुमच्या संस्थेत येतात ना... त्यावेळी बोलावून त्यांनी देखिल माझ्यावर हात टाकला हो. जीवाच्या आकांताने पळाले आणि आत्तापर्यंत शिवारात लपले होते. ताई, आण्णांचा गावात दरारा आहे. सगळे घाबरून आहेत त्यांना. त्यामुळे या उभ्या गावात आण्णाच्या विरुद्ध कोणी जाणार नाही. त्यांना आणि त्यांच्या मुलाला हे गाव म्हणजे त्यांची जहागिरि वाटते. सगळ्या गावातल्या पुरुषानी बांगड्या भरल्या आहेतजणू. काही दिवसांपूर्वी उदयच्या तोंडुन एकल होत की तुम्ही खूप हुशार आहात आणि बायकांसाठी काही करता आहात म्हणून. तुम्ही कामाला सुरुवात करायच्या अगोदर आण्णांच्या वाड्यावर गेला होतात. त्यामुळे लोक तुम्हाला त्यांच्या बाजूचे समजायला लागले आहेत. त्यामुळे त्यांनी तुमच्याकडे त्यांच्या बायका-सुनांना पाठवल आहे. त्यात तुम्ही लक्ष्मीबाईना आणि उदयच्या बायकोला पण तुमच्याकडे घेतल आहेत. त्यामुळे गावातल्या पुरुषांचा तुमच्यावर विश्वास आहे. अलीकडे बायाना तुमच्याबद्धल विश्वास वाटतो हे देखील मला माहित आहे. म्हणूनच मी तुमच्याकडे आले आहे. ताई मला मदत करा हो! उद्या मी उदयच्या हाती लागले काय किंवा आण्णांच्या हाती लागले काय माझ मरणच आहे ताई."

तिच बोलण एकून सुगंधा विचारात पडली. तिच्या पाठीवर थोपटत ती म्हणाली,"शैला शांत हो. मला विचार करायला वेळ दे. मी उद्या आण्णा साहेबांबरोबर जिल्ह्याच्या गावी जाते आहे. तिथून आले की आपण काय करायचे ते ठरवू. तोवर तू इथेच थांब."

"ताई मला मदत कराल न? इथे नाही थांबत मी. शिवारात जास्त सुरक्षित वाटत. परत उद्या रात्रि येते. मला सोडवा हो ताई या छळातून. नाहीतर जीव देण्याशिवाय पर्याय नाही हो मला." सुगंधाचा हात गच्च धरत शैला म्हणाली.

थोड़ा विचार करून सुगंधा सदा काकांना म्हणाली,"काका मी नाहितरी उद्या जिल्ह्यात आहे. तुम्ही हिला घेऊन आत्ताच ताबडतोप निघा. घरी जाऊन तिला आईकडे सुपुर्द करा आणि त्याच पावली परत या. म्हणजे दुपारपर्यंत याल. तुम्ही जिल्ह्याला जाऊन आलात हे कोणाला लक्षात येणार नाही. सध्यातरी मला संशयाची सुई माझ्या दिशेने वळायला नको आहे."

तिच बोलण एकून सदाकाकांनी मान हलवली आणि म्हणाले,"सुगंधा काय आहे तुझ्या डोक्यात मला माहीत नाही. पण मी तुझ्या शब्दाबाहेर नाही."

"शैला तू जा काकांबरोबर. अजिबात काळजी करू नकोस. मी तुला स्वतःहून येऊन भेटेन. तोवर माझ्या आई-वडिलांकडे रहा." सुगंधा शैलाला म्हणाली. डोळे पुसत शैलाने सुगंधाचे पाय धरले. त्याबरोबर तिला उठवत सुगंधा म्हणाली,"अग माझे पाय नको धरूस. चल... उठ आणि निघ तू काकांबरोबर."

सदाकाका आणि शैलाला निरोप देऊन सुगंधा पलंगावर येऊन पडली तोवर तांबड फुटायला लागल होत.
--------------------------
दुस-या दिवशी सुगंधा आणि आण्णा साहेब जिल्ह्याच्या गावी जाऊन आले. आण्णांनी खरच काही दुकानातून बोलणी करून दिली आणि लगोलग ऑर्डर्स पण मिळवून दिल्या गोणपाटाच्या पिशव्यांसाठी. आण्णांनी सुगंधाला त्यांच्या वरिष्ठ नेत्यांकडे देखिल नेल. ओळख करून देताना सुगंधाचे वडील आणि पति यांच्याबद्धल देखिल माहिती दिली.
आण्णा परतीच्या प्रवासात बरेच खुशीत होते. डाव त्यांच्या मना प्रमाणे साधला होता. सुगंधाला तिच्या संस्थेसाठी ऑर्डर्स मिळाल्या होत्या. त्यामुळे तिचा त्यांच्यावरचा विश्वास वाढला होता. मोठ्या नेत्यांना देखिल आण्णांच्या कामगिरीचे कौतुक वाटले होते. आता संस्थेने सुरु केलेल्या व्यवसायाचा जम बसायला वेळ लागणार नव्हता. म्हणजे सुगंधा आता काही दिवसात निघून जाईल असा कयास आण्णांनी बदला होता. काही दिवसातच ही संस्था आपल्या हातात येणार याची स्वप्न बघत आण्णा खुशीत हस्त होते. ते दोघे गावात परत आले मात्र गावातलं वातावरण तंग आहे हे आण्णाच्या लक्षात आल. उदयने काही गडबड तर करून ठेवलेली नाही ना या विचाराने सुगंधाला गाडीतून उतरवून आण्णा वाड्यावर धावले.

वाड्यात शिरताच समोर उदयला बघून आण्णांनी त्यांच्या तोंडाचा पट्टा सुरु केला. "उदय काय झालय नक्की? अरे एक दिवस तुझा बाप बाहेर गेला तर काय गोंधळ घातलात तुम्ही इथे? अरे किती दिवस बापाच्या जीवावर जगणार तू? जरा स्वतः काही करत नाहीस. आणि तुझीच सोय करायला गेलो तर इथे अजून घाण करून ठेवतोस काय?"

"ओ.. बाप आहात तर बापासारख वागा. तुम्ही इथे वाड्यावर बोलावून माझ्या शैलावर हात टाकलात का ते बोला..." उदयने आण्णाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत उलट त्यांच्या अंगावर धावून जात सवाल केला.

"हो... टाकला होता हात... पण सुटली साली रांड. सरळ येत नव्हती म्हणून इथे बोलावली होती. काय करशील?" आण्णा भडकून म्हणाले.

त्यांच्या उत्तराने उदय भलताच भडकला आणि म्हणाला,"बर झाल मला बहिण नाही... नाहीतर तुम्ही तिला देखिल सोडल नसत."

"ए भेनच्योद... आता गपतो का? की घालू ही गुप्ति तुझ्या नरद्यात्. गावात काय झालय ते बोल. कोणाच मयत आहे की काही घोळ झालाय ते सांग. बाकी गप् बसायच गुमान. समजलास?" अंगावर आलेल्या उडायला ढकलत आण्णा म्हणाले.

आण्णाचा अवतार बघून उदय थोडा वरमला आणि म्हणाला,"ती शैला गायब आहे वाड़यावरुन पळाल्यापासून."

उदयच्या बोलण्याने बेफिकीर होत आण्णा म्हणाले,"गायब तर गायब. दिला असेल जीव तिने. तू तुझी दूसरी सोय बघ. आणि जरा घरात आणलेल्या बाईकडे बघ. पाळणा हलवून टाक परत एकदा. एकदा पालिका निवडणुका आल्या की वेळ मिळणार नाही." त्यांनी तो विषय तिथेच संपवून टाकला.

दुस-या दिवशी आण्णांच्या कार्यालयात पोलिस चौकशिला आले. पण आण्णानी माहीत नाही म्हणून हात वर केले. शैलाच कोणीच नव्हतं. त्यामुळे पोलिसांनी फाईल बंद केली.
------------
असेच दोन महीने गेले. संस्थेचे काम आता नीट चालायला लागले होते. सुगंधाने तिच्या परतीची तयारी सुरु केली. एक दिवशी अचानकपणे लक्ष्मीबाई आणि त्यांची सुन बाराच्या सुमाराला सुगंधाच्या घरी आल्या.

"अरे वहिनी आज इथे कुठे?" त्यादोघीना बघून सुगंधा आश्चर्याने म्हणाली.

"सुगंधा तू मला माझ्या मूली सारखी आहेस म्हणून आज तुझ्याकडे आले आहे. काल संस्थेत चर्चा होती की तू आता जाणार आहेस. अग अशी आम्हाला एकट सोडून जाऊ नकोस ग. अग माझ्या नव-याने आणि नालायक मुलाने गावातल्या अनेकांच्या आयुष्याची वाट लावली आहे. मी तर संपूर्ण आयुष्य फ़क्त नरक यातनाच् भोगल्या ग. तुझ्या रूपाने मला, माझ्या सुनेला आणि गावातल्या बायकाना आशेचा किरण दिसला आहे. पण तू गेलीस की हे आमच प्रामाणिक काम बंद होणार. माझा हलकट नवरा ही संस्था ताब्यात घेईल. म्हणून म्हणते जाऊ नकोस." हळव्या होत आणि सुगंधाचा हात धरत लक्ष्मीबाई म्हणल्या.

"वहिनी अहो मग तुम्ही काय शिकलात इतक्या महिन्यात? अहो थोडा आत्मविश्वास वाढवा. तुम्ही सर्व स्त्रीया एकत्र आलात तर उदय आणि आण्णा सारख्या नाराधमाला नक्की धड़ा शिकवू शकाल." सुगंधा त्यांच्या खांद्यावर थोपटत म्हणाली.

"सुगंधा त्यांना राजकीय पाठबळ खूप आहे ग. तुला काय वाटत मी प्रयत्न केले नसतील? पूर्वी कधी कधी मला ते जिल्ह्यात घेऊन जायचे. तुला ज्या मोठ्या साहेबांकड़े नेल होत तिथे मला ही नेल आहे त्यांनी दोन-चार वेळा. त्यावेलील मी मोठ्या साहेबांच्या बायकोकडे आण्णांच्या अपरोक्ष गा-हाण घातल होत. तुला माहीत आहे त्या काय म्हणाल्या? म्हणे तुझ्या एकटीच्या दुःखापायी आम्ही काय आण्णाला देशोधडीला लाऊ का? हा घरातला प्रश्न आहे. जरा कुठे थोड़ सहन कराव बाई माणसाने. आण्णा पक्षाला पैसा पुरवतात. गावात काम आहे... पंचक्रोशित नाव आहे. जळणारी लोक असतात. लोकांच् ऐकून तू काही करु नकोस बर. एकटी पडशील. त्यानंतर साहेबांनी ह्यांना सांगितल मला जिल्ह्यात आणायच नाही. आम्ही वाड्यावर आलो आणि त्यादिवशी माझी जी पिटाई झाली की मला हॉस्पिटलमधे पंधरा दिवस ठेवाव लागल. साहेब-वहिनी येऊन गेल्या. आणि माझ तोंड कायमच बंद झाल. तुझ्या रूपाने मला आशेचा किरण दिसला आहे. माझ काय ग रहिलय. पण हिची माझ्या सुनेची काळजी वाटते." लक्ष्मीबाई पोटतिडकीने बोलत होत्या.

"वहिनी इतके दिवस काही का नाही बोललात? मला आता गेलच पाहिजे... पण तुम्ही चिंता करू नका. मी परत येईनच. नगर पालिका निवडणुका तोंडावर आहेत. आण्णा उदयला उभ करायची तयारी करत आहेत. त्यामुळे सध्या संस्थेच्या कामाला धोका नाही. तुम्ही दोघी संस्थेला बंद पडू देऊ नका. सर्व बायका एकजुटीने रहा. मी अजून काही महिने येऊन जाऊन असेनच. त्यामुळे आण्णा घाई करणार नाहीत. माझ्या मनात काही उपाय आहेत तुमच्या प्रश्नावर. माझ्यावर विश्वास ठेवा. बस आत्ता इतकंच सांगू शकते." सुगंधाने लक्ष्मीबाईचा हात हातात घेत त्यांना आश्वासन दिले.

"तुझ्यावर स्वतः पेक्षा जास्त विश्वास आहे सुगंधा." अस म्हणून लक्ष्मीबाई सुनेला घेऊन निघाल्या.
-----------------------------
निवडणुकांचे वारे वाहायला लागले.  त्यामुळे आण्णा आणि उदय उद्योगाला लागले. त्यांना सध्या संस्थेकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. आणि तसही सुगंधा गेलीच होती. फक्त संस्थेच्या कामासाठी महिन्यातून एखाद-दोन वेळा येऊन जात होती. त्यामुळे निवडणुकीनंतर सगळा कारभार हातात घेऊ असा आण्णांनी विचार केला होता. सुगंधा जेव्हा केव्हा गावात येत होती तेव्हा तिला गावातल्या बायकांकडून  सगळ्या खबरी कळत होत्या. पण ती शांत होती. आता बायकाच् काय पण गावातल्या पुरुषमंडळीना देखील सुगंधाबद्दल आदर निर्माण झाला होता. त्यांना देखील आण्णाची आणि उडायची आरेरावी नकोशी झाली होती. त्यामुळे बायकांच्या माध्यमातून या पुरुषमंडळीनी देखिल सुगंधाला भेटून आण्णापासून सुटकारा व्हायला मदत मागितली होती.

अपेक्षेप्रमाणे आण्णांच्या पक्षाने उदयला तिकीट जाहिर केले. उदयने जाऊन फॉर्म भरला. प्रचाराची रण धुमाळी सुरु झाली. फॉर्म भरायचा शेवटचा दिवस होता. दुसरा पक्ष बहुतेक उमेदवार देणार नाही असे बोलले जाऊ लागले होते आणि त्या दिवशी अचानक वीस पंचवीस गाड्या गावात आल्या. दुस-या पक्षाचा उमेद्वार फॉर्म भरायला आला होता.... नव्हे आली होती.

शैला गायकवाड़! उदयच्या विरुद्ध याहुन चांगला उमेद्वार कोण असू शकत होता? आण्णा आणि उदय हड़बडले. गोंधळले. संपूर्ण निवडणुकीचे एकवीस दिवस स्वतः सुगंधा आणि तिचा IPS नवरा गावात ठाण मांडून बसले होते. शैलाच्या बाजूने सुगंधा उभी राहिली होती.

प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली. शैलाला समोर उभी बघून उदय भडकला होता. पण आण्णांनी त्याला शांत केला. निवडणुकी नंतर काय ते बघू असे त्याला समजावले. कारण आण्णांना त्यांच्या जिंकण्याबद्धल पूर्ण विश्वास होता. त्याच कारण देखील असच होत. अत्यंत खालच्या दर्जाचा प्रचार आण्णांच्या गोटातून चालु होता. त. शैलाच्या चारित्र्याबद्दल अत्यंत वाईट शब्दात पोस्टर्स लावले जात होते. घराघरात तिच्या आणि उदयच्या संबंधा बद्दलची वर्णनं लिहून टाकली जात होती.

सुगंधा मात्र शांत होती. तिने प्रचाराचे प्लानिग व्यवस्थित केले होते. गाव सोडलेली शैला आणि उमेद्वार शैला यात जमीन आस्मानाचा फरक होता. शैला भावनिक आव्हाहन अजिबात करत नव्हती. ती फ़क्त विकासाचा आराखडा आणि भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बोलत होती. शैलाला एकूण पालिकेच्या कामाची व्यवस्थित माहिती होती हे दिसत होते. तिचा आत्मविश्वास वाखाडण्यासारखा होता.

आणि मग जसजसे दिवस उलटायला लागले तसतसे आण्णांना थोड़े टेंशन यायला लागले. त्या रात्रि आण्णा खूप उशिरा सभा संपवून आणि कार्यालयातले काम आटपुन वाड्यावर पोहोचले. समोरच उदय पीत बसला होता. ते बघुन त्यांचा पारा चढ़ला. त्यांनी चिडून त्याच्या कमरेत लाथ घातली.

"भाड्या मी इथे जीव काढतो आहे आणि तू आरामात पीत बसला आहेस? अरे मर्द असशील तर त्या शैलाला खेचून चौकात उभ कर आणि चाबकाने फोडून काढ़. अरे काहीतरी कर साल्या नाहीतर तू माझा मुलगा नाहीस." भडकून आण्णांनी वाड्याबाहेर हकलले.

उदयचे डोके अगोदरच फिरले होते. त्यात बापाने घातलेल्या लाथेमुळे तो अजुनच भड़कला. तसाच तिथून निघुन तो शैलाच्या घरी गेला. तिथे पोहोचेपर्यंत त्याने थोड़ा विचार केला. थोड़ डोक शांत केल आणि दाराची कड़ी वाजवली. शैलाने स्वतःच दार उघडले.

"तू?" शैलाने शांतपणे त्याच्याकडे बघत प्रश्न केला.

"शैला मला तुझ्याशी बोलायच आहे. जरा बाहेर येतेस?" उदय कमालीच्या शांतपणे बोलत होता.

"तूच ये घरात. तुला सवय आहे की या घराची आणि मला बाहेर यायची इच्छा नाही." शैला दारातून बाजूला होत म्हणाली.

"एकटीच् आहेस?" उदयने आत घरात नजर टाकत विचारले.

"हो" शैला शांतपणे म्हणाली.

उदयला आश्चर्य वाटले. आणि बर देखील. तो घरात आला आणि मग मात्र त्याचा पवित्रा बदलला. त्याने शैलाचे बखोट धरले आणि तिला खसकन स्वतःकडे ओढत म्हणला,"ए भवाने... फार चर्बी चढ़ली ग तुला. ज्यांच्या जीवावर उड़ते आहेस ते आयुष्यभर साथ नाही देनारेत तुला. साsssली रांड... गप गुमान पडून राहा एका कोप-यात निवडणूक होई पर्यंत. समजलिस? नाहीतरी तू हरणारच आहेस. मग बघून घेईनच मी तुला. कोण उभ राहील ग मग तुझ्या पाठीशी?"

"एssss तुझ्या आईच्या.... " त्याने धरलेला हात झटकत अचानक शैला कडाडली. "भेनच्योद तूझ्या औकातीत राहा.. समजलास? मी ती जुनी शैला नाही; जी तुला घाबरायची. कुठली ठस्सन देतोस् रे भाड्या? काय करणार तू मला? आणि माझ्या माग रडायला आहे कोण मला? इज्जत जी काही होती ती तू आन तुझ्या बापान कधीच वेशीला टांगली आहे. माझ्या नावाची पोस्टर्स लावत फिरता आहात ना ती कहाणी पुऱ्या गावाला अगोदरच माहित आहे. एक लक्षात ठेव.... मला ना आगा... ना पीछा... जिंकेन् की हारेन ते पुढच पुढे. पण मी राहणार याच गावात. तुझ्या नाकावर टिच्चून. हात तर लाव... नाय भर चौकात नागवा करून चाबकाने फोडला तर नावाची शैला नाही. चल चालता हो. मादरच्योद....... तुझ्या सारख्या नपुसकाला ज्याचा माज आहे तेच पायाने ठेचून तुझा जीव घेतला पाहिजे; म्हणजे पुढे भविष्यात तुझ्यासारखे नपुंसक नराधम जन्मणार नाहीत...."

शैलाचा आवाज टिपेला पोहोचला होता. बाजूच्या घरातले कार्यकर्ते, सुगंधा ... तिचा नवरा... सगळेच धावत आले. सगळ्यांना बघुन उदय घाबरला. धड़पडत मागे सरकत तो पळून गेला. दुसऱ्या दिवशी गावात आदल्या रात्रीच्या प्रसंगाचीच चर्चा होती. पण शैला मात्र शांत होती. ती तिचा प्रचार करत होती. अनेकांनी तिला पोलीस कम्प्लेंट करायला सांगितले. पण तिने नकार दिला. मात्र एवढे सगळे होऊनही आण्णांचा विश्वास दांडगा होता. त्यांनी गावात पैसा वाटायला सुरुवात केली. आता हा फ़क्त हार-जीत चा प्रश्न नव्हता त्यांच्यासाठी. हा आण्णांच्या अस्तित्वाचा प्रश्न झाला होता. लोकहि म्हणत होते; काहीही झाल तरी आम्ही आण्णांच्या बाजूने आहोत. काल आलेली ही बाई गावाला काय देणार असेही असे म्हणत होते. शेवटचे दोन दिवस तर दारू-चिकन-मटणाचा जोर लावून दिला होता आण्णांनी. लोकं देखील शैलाच्या सभेला जात नव्हते आणि आपल्या घरच्या बायकांना देखील जाऊ देत नव्हते. तरीही शैला शांतच होती.

याच दुमश्चाक्रीत मतदान आले. गावातील प्रत्येक पुरुष आणि बाई मतदान केंद्रावर पोहोचते आहे की नाही हे आण्णा आणि उदय जातीने बघत होते.

................ आणि रिजल्ट लागला. पुन्हा एकदा आण्णा साहेबांचा विजय होऊन त्यांच्या साम्राजाचे पाय पक्के आणि कायमचे रोवले.................... जाऊ नयेत म्हणून गावातल्या लोकांनी स्वतः बदल घडवून आणत शैला गायकवाड़ला प्रचंड बहुमतांनी निवडून दिल होत!!!

चांगल्याचा वाईटावर विजय झाला होता.......

---------------------------------------------


Friday, January 24, 2020

CAA ...हिंदू राष्ट्र ... धर्मनिरपेक्ष राष्ट्र!


CAA ...हिंदू राष्ट्र ... धर्मनिरपेक्ष राष्ट्र!


आपल्या देशाचे गृहमंत्री श्री. अमित शहा यांनी CAB म्हणजेच नागरिकत्व दुरुस्ती विधेयक संसदेत मांडले आणि ते संमत झाले. त्यानंतर राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले आणि राजकीय असुरक्षितता मनात निर्माण झाल्याने काही राजकीय पक्षांनी देशभरामध्ये गैरसमज पसरवत या कायद्या विरोधात एक वादळ निर्माण झाल्याचा आभास निर्माण केला आहे. मुळात काय आहे हा कायदा?

नागरिकत्व दुरुस्ती कायदा २०१९

-या कायद्याअन्वये पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधील धार्मिक अल्पसंख्याकांना धार्मिक छळामुळे त्या देशांमधून पळ काढावा लागला असेल तर त्या देशातील अल्पसंख्यांकांना भारताचं नागरिकत्व देण्याची तरतूद  आहे. मुस्लिम राष्ट्र असा दर्जा स्वीकारलेल्या आणि त्यामुळे कायदा आणि नियम हे मुस्लिम धर्मसंमत असलेल्या या देशांमधील हिंदू, शीख, पारशी, जैन, बौद्ध आणि ख्रिश्चन धर्मियांना धार्मिक प्रतारणा झाली असल्यास या कायद्यानुसार भारताचे नागरिकत्व मिळू शकेल.

- ३१ डिसेंबर २०१४ पूर्वीच भारतात स्थलांतरीत झालेले आणि ज्यांना पासपोर्ट (एन्ट्री इनटू इंडिया) कायद्यामधून सूट दिली गेली आहे अशा पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशामधील धार्मिक अल्पसंख्याक भारताचे नागरिकत्व मिळवण्यास पात्र ठरतील.

- सध्या भारताचे नागरिकत्व मिळवण्यासाठी संबंधित व्यक्तीला भारतात किमान ११ वर्षे वास्तव्य करणे आवश्यक होते. मात्र आता ही अट शिथील करून सहा वर्षांवर आणण्यात आली आहे.

- यापूर्वी भारतात बेकायदेशीरपणे घुसखोरी करणाऱ्यांना देशाचे नागरिकत्व मिळू शकत नव्हते. त्यांना पासपोर्ट (एन्ट्री इनटू इंडिया) कायद्या मधून सूट मिळण्याची तरतूद होती; पण ती परिपूर्ण नव्हती त्यामुळे त्यांना नागरिकत्व मिळणे शक्य नव्हते. मात्र त्यांना नाईलाजाने ताब्यात घेऊन मायदेशी पाठवावे लागले असते. मात्र हे अल्पसंख्यांक धार्मिक प्रतारणेमुळे आपले सर्वस्व मागे सोडून हिंदुस्थानात आसरा शोधत आले असल्याने अशी कारवाई करणे योग्य ठरले नसते म्हणून आजपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नव्हती. आता नागरिकत्व कायद्यातील २०१९ मधील सुधारणांमुळे अशा बेकायदेशीर स्थलांतराच्या आरोपांमधून संबंधित अल्पसंख्यानकांची सुटका होणार आहे.

या कायद्यासंदर्भात पसरवण्यात आलेले गैरसमज आणि सरकार विरोधातील राजकीय पक्षांनी घेतलेले आक्षेप

- हा कायदा म्हणजे मुस्लिमांना मुख्य प्रावाहातून बाजुला सारण्याचा प्रयत्न आहे; नागरिकत्व दुरुस्ती कायदा २०१९ अन्वये भारतीय मुस्लिम लोकांना देशाबाहेर काढले जाणार आहे.

- नागरिकत्व दुरुस्ती कायदा २०१९ अन्वये भारतीय मुस्लिम लोकांची स्थावर जंगम मालमत्ता सरकार जमा होणार आहे.

- या कायद्यामुळे प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार देणाऱ्या कलम १४चं उल्लंघन होते आहे. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष राष्ट्रात कुणालाही धार्मिक निकषांवरून नागरिकत्व कसं मिळू शकतं, असा सवाल विरोधक करत आहेत.


पसरवण्यात आलेले गैरसमज आणि घेतलेले आक्षेप यावरील उत्तरे

- भारतीय मुस्लिमांना नागरिकत्व नोंदणी किंवा नागरिकत्व सुधारणा कायद्याला घाबरण्याची गरज नाही. कारण हा कायदा कोणत्याही भारतीय नागरिकाचे (मग तो कोणत्याही धर्माचा असो) नागरिकत्व किंवा त्यांच्या नावाने असलेली त्यांची मालमत्ता रद्द करणार नाही आहे.तर तो पाकिस्तान, अफगाणिस्थान आणि बांगलादेश येथून धार्मिक प्रतारणेअंतर्गत आलेल्यांना नारिकत्व देण्याचा कायदा आहे.
- राज्यघटनेतील कलम १४ किंवा अन्य कोणतीही तरतूद ही भारताच्या नागरिकांसाठी आहे. समानतेच्या तत्वावर पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश येथील मुस्लिम धर्मियांना भारतीय राज्यघटनेचा आधार घेता येणार नाही. तसेच एखाद्या बाबीनुसार वर्गीकरण करण्याची तरतूद भारतीय घटनेमध्येअसून त्यानुसारच 'धार्मिक प्रतारणा' हे वर्गीकरण घटना विरोधी ठरत नाही.

नागरिक सुधारणा कायदा २०१९ लागू झाल्यानंतर राजकीय असुरक्षितता मनात निर्माण झालेल्या राजकीय पक्षांकडून एक नवीनच आरोप आजच्या केंद्र सरकारवर केला जातो आहे. 'हे सरकार भारताला हिंदुराष्ट्र करीत आहे'. या आरोपाचे खंडन करताना हिंदुस्तानाच्या भौगोलिक, ऐतिहासिक आणि पौराणिक परंपरेचा विचार करणे जरुरीचे आहे.

हिंदुस्तान हा १९४७ सालच्या फाळणी नंतर निर्माण झालेला देश नसून एक खूप मोठा इतिहास आणि पौराणिक परंपरा लाभलेला सार्वभौम देश आहे. आताचे 'पाकिस्तान' आणि 'बांगलादेश' हे मूळचे हिंदूस्थानाचाच भाग होते. या सार्वभौमिक देशामध्ये धार्मिक विचार न करता विविध प्रदेशात सर्वच धर्माचे लोक राहात होते. त्यामुळे ते या सार्वभौमिक हिंदुस्तानाचे नागरिक होते. मात्र १९४७ मध्ये धर्माच्या आधारावर हिंदुस्तानाचे दोन तुकडे करण्यात आले. पाकिस्तान 'मुस्लिम धर्मियांचा' देश म्हणून घोषित झाला. पुढे पाकिस्तानचे दोन तुकडे होऊन 'बांगलादेश' हा अजून एक 'मुस्लिम धर्मीय' देश निर्माण झाला. १९४७ च्या अगोदरपासून जे मुस्लिम धर्माव्यतिरिक्तच्या धर्माचे लोक आताच्या 'पाकिस्तान' किंवा 'बांगलादेश' येथे अनेक पिढ्या राहात होते; त्यांनी त्यावेळी फाळणी झाल्यानंतर देखील 'पाकिस्तान' किंवा 'बांगलादेश' येथेच राहाण्याचा निर्णय घेतला. मात्र या लोकांना पुढील काळामध्ये धार्मिक प्रतारणा झाल्यास आताच्या हिंदुस्थानात कायमचे स्थलांतर करावे असे वाटले; तर त्यांचे हिंदुस्थानात स्वागत असेल असे स्वतः महात्मा गांधी यांनी आश्वासन दिले होते. अर्थात दोन्ही देशामधील अल्पसंख्यांकांची धार्मिक प्रतारणा होऊ नये म्हणून पाकिस्तान आणि हिंदुस्थान यांच्या तात्कालिक पंतप्रधानांमध्ये एक करार करण्यात आला जो नेहेरू-लियाकत करार १९५० म्हणून ओळखला जातो. याअन्वये दोन्ही देशांनी आपल्या देशातील अल्पसंख्यांकांची काळजी घेणे क्रमप्राप्त होते. मात्र जर या अल्पसंख्यांकांना धार्मिक असुरक्षितता वाटली किंवा त्यांची धार्मिक प्रतारणा झाली तर पूर्वीच्या एकसंघ हिंदुस्थानाचा नागरिक म्हणून त्यांना या देशाचे नागरिकत्व दिले जाणार होते.

कदाचित इथे एक मुद्दा उपस्थित होऊ शकतो की १९४७ पूर्वीच्या एकसंघ भारतातील मुस्लिम देखील त्यावेळच्या सार्वभौमिक भारताचे नागरिक होते. येथे समजून घेतले पाहिजे की मुळात नागरिकत्व सुधारणा कायदा हा अल्पसंख्यांक लोकांसाठी आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश हे तीनही देश 'मुस्लिम धर्मीय' देश असल्याने येथे राहणारे मुस्लिम लोक हे अल्पसंख्यांक होत नाहीत. यावर वैचारिक गोंधळ असणाऱ्या काही लोकांकडून असे म्हंटले जाते आहे की मुस्लिम धर्मामधील काही पोट जाती आहेत; या पोट जातींमधील मुस्लिम लोकांना त्यांच्याच देशांमध्ये खूप त्रास सहन करावा लागतो आहे. याविषयी एक लक्षात घेतले पाहिजे की मुळात ते लोक मुस्लिमच आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांच्या अधिकारासाठी तेथे राहून लढा देणे अपेक्षित आहे. (उदाहरणार्थ: एकाच घरातील दोन भावांमध्ये भांडण झाले आणि त्यातील एक भाऊ शेजारील घरात जाऊन राहण्याचा हट्ट करू लागला तर ते जसे अयोग्य ठरते; तद्वतच पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश येथील पोट जातींमधील लोकांना होणाऱ्या त्रासाकडे बघणे आवश्यक आहे.) तरीही येथे नमूद करणे आवश्यक आहे की; याच कायद्यामधील अन्य तरतुदींआंतर्गत पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश मधील मुस्लिम धर्मीय लोकांना अर्ज करून त्याद्वारे योग्य प्रक्रिये आंतर्गत भारताचे नागरिकत्व घेता येते. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचे सरकार असताना देखील याच प्रक्रियेद्वारे काही हजार मुस्लिम धर्मियांना नागरिकत्व दिले गेले आहे.
आपण हे देखील समजून घेतले पाहिजे की पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश येथील अल्पसंख्यानकांना हिंदुस्तानात का यावेसे वाटत आहे?! ज्यावेळी १९४७ ची फाळणी झाली त्यावेळी हिंदुस्थानामध्ये मुस्लिम धर्मियांची संख्या केवळ २/३ टक्के होती. मात्र आता हीच संख्या जवळ जवळ १९ टक्के म्हणजे (द्वितीय बहुसंख्यांक धर्मीय) इतकी झाली आहे. याउलट पाकिस्तान किंवा बांगलादेश येथील हिंदू, शीख, पारशी, जैन, बौद्ध आणि ख्रिश्चन धर्मियांची संख्या काही शे इतकी कमी झाली आहे. त्या देशांमधील अल्पसंख्यांकांची लोकसंख्या कमी होण्याचे कारण म्हणजे एकतर त्यांचे धर्म परिवर्तन करून त्यांना मुस्लिम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले गेले किंवा ज्यांनी धर्म परिवर्तनास नकार दिला त्यांची कत्तल करण्यात आली. या देशांमधील या अल्पसंख्यानकांचा छळ धर्माच्या नावावर झाला. ज्यावेळी त्यांच्यावरील अत्याचार हे त्यांच्या घरातील स्त्रियांवरच्या अत्याचाराचे स्वरूप घेऊ लागले त्यावेळी या अल्पसंख्यानकांना हिंदुस्थान हा देश आधारस्तंभ वाटल्यास त्यात गैर ते काय?

अजून एक मुद्दा खूप महत्वाचा ठरतो; तो म्हणजे या लोकांना हिंदुस्तानच आधारस्तंभ का वाटावा? एकतर संपूर्ण विश्वभरात 'हिंदू धर्मियांसाठी' आपला देश असा केवळ हिंदुस्तान आहे. हिंदुस्तान 'धर्मनिरपेक्ष देश' आहे. धर्मनिरपेक्षता म्हणजे काय हे देखील समजून घेणे आवश्यक आहे. मुळात हिंदू धर्मामध्ये 'सर्व धर्म समभाव' हा विचार अग्रणी आहे. आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांनी कायमच देशांतर्गत किंवा विदेशामध्ये हिंदुस्तानाविषयी बोलताना हिंदू धर्मातील आद्य विचार 'वसुधैव कुटुंबकम्' (संपूर्ण वसुधा (पृथ्वी) म्हणजे एक कुटुंब आहे) बोलून दाखवला आहे. म्हणजेच हिंदू धर्माच्या विचार परंपरेचा आरसा 'धर्मनिरपेक्षता' होतो; हे स्पष्ट आहे. त्यामुळे राजकीय असुरक्षितता मनात निर्माण झालेल्या राजकीय पक्षांकडून जो आरोप होतो की 'हे सरकार भारताला हिंदुराष्ट्र करीत आहे'. तर त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की मूलतः भारत हा हिंदू धर्म विचारांचाच तर आहे; म्हणूनच तो 'धर्मनिरपेक्ष' देश आहे.

वरील सर्व मुद्दे वाचल्यानंतर कदाचित आपल्या मनात प्रश्न उभा राहिला असेल की वर नमूद सर्वच मुद्दे हे सहज समजून येण्यासारखे आहेत. तरीही CAA विरोधातील हे सततचे आंदोलन का? त्यासाठी हे समजून घेतले पाहिजे की या आंदोलनकर्त्यांमध्ये दोन घटक आहेत. एक जहाल मुस्लिमवादी आणि दुसरे हे केवळ मोदींजींचा विरोध करणारे त्यांचे राजकीय स्पर्धक आहेत. या दोन्ही घटकांना नागरिकत्व सुधारणा कायदा २०१९ मधील तरतुदी कशासाठी आहेत हे संपूर्णपणे माहीत आहे. मात्र तरीही आपापला अजेंडा राबवण्यासाठी ते या कायद्याला विरोध करीत आहेत. या आंदोलकांकडून 'आझादी'; 'आझाद काश्मीर' यासारख्या घोषणा दिल्या जात आहेत. तर या आंदोलकांचे संचलन करणाऱ्या किंवा त्यांच्या समोर भाषण देणाऱ्या नेत्यांकडून मुलाखतींदरम्यान 'कलम ३७० हटवले गेले' आणि 'राममंदिर बाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय'; या विरोधातील राग व्यक्त होत आहे असे सांगितले जाते आहे. यातून हे स्पष्ट होत आहे की हा विरोध नागरिकत्व सुधारणा कायद्याला नसून या निमित्ताने सरकार विरुद्ध राग व्यक्त केला जात आहे.

इथे एक महत्वाचा मुद्दा नमूद करणे आवश्यक आहे; आजच्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात बोलणाऱ्या काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी देखील नागरिकत्व कायद्याची मागणी यापूर्वी अनेकदा केलेली आहे. त्यामुळे आताचा हा विरोध आणि भारतीय मुस्लिमांचा आलेला पुळका म्हणजे केवळ ढोंगीपणा आहे हे सिद्ध होते. या केवळ 'विरोधासाठी विरोध' करणाऱ्या राजकीय नेत्यांचे एकच उद्दिष्ट आहे की सर्व अनायासे मुस्लिम धर्मीय रस्त्यावर उतरले आहेत तर त्याचा उपयोग करून घेऊन प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या विरोधात संपूर्ण देशभरात अस्वीकार आहे असे वातावरण निर्माण करणे.

आपण सर्वांनीच या देशविरोधी वैचारिक तत्वांचा विरोध केला पाहिजे आणि आपले समर्थन CAA ला म्हणजेच नागरिकत्व सुधारणा कायदा २०१९ आहे हे नमूद केले पाहिजे. खाली नमूद नंबरवर missed call करून आपण आपले समर्थन नोंदवू शकता.

नंबर आहे: 88662 88662 / ८८६६२ ८८६६२





Friday, January 17, 2020

बंगला

बंगला

आम्ही नविनच फ्लॅट घेतला. थोडा गावा बाहेर. पण एका नवीन बिल्डींगमधे होता आणि मुख्य म्हणजे छान प्रशस्त होता. मुलांची शाळा आणि बायकोच ऑफिस थोडं लांब होत. पण  शाळेची आणि ऑफिसची बस जवळच्या वळणावर येत होती. त्यामुळे त्यांना काहीच त्रास नव्हता.  माझ ऑफिस मात्र जवळच होत. त्यामुळे मी माझ्या स्कूटरने जायचो.  मला पहिल्यापासूनच शांतता आवडते. म्हणून तर बायको आणि मुल फारशी तयार नसतानासुद्धा त्याचं न ऐकता मी हा फ्लॅट बुक केला होता. खर तर मला बंगलाच आवडला असता. अगदी आमच्या बिल्डिंग समोरच जसा टुमदार बंगला आहे तसा. ते एक मी माझ्या मनाशी जपलेल.... फक्त मलाच माहित असलेलं; अस माझ एकट्याच स्वप्न आहे. पण बंगला परवडणार नाही म्हणून तर हा मस्त आणि प्रशस्त फ्लॅट पसंत केला होता. स्वतःचा बंगला मला कधी परवडणार नसला तरी किमान समोर दिसणारा बंगला बघून मनातल्या मनात समाधान करून घेतो.

आता तुम्हाला वाटेल इतकं का मी बंगला बंगला करोत आहे. सांगतोच आता! एकूणच सुंदरच आहे तो बंगला. बाहेर खूप मोठ नाही खूप लहान नाही अस छानस आवार. या आवारात गुलाब, चाफा, अनंत, पारिजात, आणि वेगवेगळ्या प्रकारची जास्वंद अशी एक ना अनेक फुल झाड आहेत आणि बंगल्याच्या भोवतीने चार नारळ, एक आंबा, एक फणस, जांभुळ, बकुळ अशी मोठी झाड़ देखील आहेत. त्यामुळे घरावर कायम सावली असते. बंगल्याच्या चारही बाजुनी तारेच साधसच कुंपण आहे. मोठस गेट. पोर्च. बहुतेक वरुन पोर्चच्या वरच्या बाजूला गॅलरी असावी.

आता तुम्हाला वाटेल मला कस काय हे सगळ माहित; ते ही इतक्या डिटेलमध्ये! नुकताच राहायला आलो आहे तरीही. अहो, संध्याकाळी बाहेर पडतो ना मी ऑफिसमधून आलो की, ते मुद्धामच. मला या बंगल्याच निरीक्षण करायचा नादच लागला आहे. इतके दिवस रोज फिरतो त्याच्या बाजूने आणि रोज काहीतरी नवीन दिसतच. म्हणजे कधी एखाद्या झाडाला आलेलं फुल किंवा नवीन लावलेलं झाड. मोठ्या झाडांना लागलेली फळ मोजण तर मला फार आवडत. मी राहायला आलो त्याच दिवशी तिथे जाऊन तिथल्या नोकराकडे चौकशीसुद्धा करून आलो बंगल्यात कोण राहात? त्याचं नाव काय? वगैरे... सर्वसाधारण मानवी स्वभाव; दुसर काय? कळल ते अस की एक एकटी मध्यम वयाची कोणी स्त्री राहाते. बस्! पण तेव्हापासून का कोण जाणे माझ कुतूहल जाग झाल आहे.

तो नोकर.... किंवा माळी किंवा खानसामा... काय हवी ती उपाधी देता येईल..... त्याने बाकी काही माहिती दिली नाही. आता मी दिसलो की तो माझ्याकडे थोडा विचित्र नजरेने पाहत असतो म्हणा. पण मी मुद्धामच बंगल्याच्या थोडा लांबून चालतो. त्यामुळे त्याला माझ हे निरीक्षण करण आणि बंगल्याच्या आजूबाजूला घोटाळण आवडत नसल तरी तो काही बोलू शकत नाही.

बंगल्याच्या मालकीणबाई मध्यम वयाच्या अस आपल् म्हणायच. पण दिसायला अत्यंत सुंदर, आणि टापटीप आहेत. रोज सकाळी 7 ला त्या पोर्चच्या गॅलरीमधे बसून चहा घेताना दिसतात त्या. मग 10/10.30 पर्यंत बागेत काम. त्यानंतर कधी या गॅलरीत तर कधी त्या खिड़कीत दिसतात. कधी पडदे सारखे कर; कधी गाण गुणगुणत शिवण-टिपण कर. शिवण-टिपण हा आपला माझा अंदाज हो; नाहीतर म्हणाल याला बरे माहित ती सुंदर बंगल्याची सुंदर मालकीण तिच्या घरात काय करते ते. हा हा हा!

१२ नंतर मात्र त्या दिसत नाहीत. मग त्यांचे दर्शन 4 च्या सुमारास आंब्याच्या झाडाकडच्या गॅलरीत चहा घेताना होत. बाई मजेत चहा आणि नाष्टा करते. एकटी असली तरी शिस्त भारी आहे बहुतेक. चहा केटलीतूनच लागतो. आणि नाश्तासुद्धा काहीतरी गरम-गरम असतो. उगाच चकल्या-चिवडा अस नसावं; असा माझा अंदाज बरका. ज्याप्रकारे त्या प्लेट हातात घेऊन झाडांकडे बघत निवांतपणे खात असतात त्यावरून.  मग छान तयार होऊन कुठेतरी बाहेर पडतात. जाताना बागेतल फूल तोडून केसात माळताना अनेकदा दिसतात, पण बाहेर बहुतेक मागच्या गेट ने जात असतील. पुढच गेट उघडताना त्या कधी दिसत नाहीत. बहुतेक बाजार किंवा लायब्ररी किंवा एखाद महिला मंडळ असावं रोज वेगळ ठिकाण. पण आजूबाजूला कोणाशी कधी बोलताना बघितल नाही त्यांना. आमची बिल्डिंग तशी नवीन. त्यामुळे इथले लोकं पण नवीन. पण त्यांच्या बंगल्याच्या थोड पुढे एक बिल्डिंग होती. तिन मजली. बऱ्यापैकी जुनी असावी. पण तिकडचे कोणी कधी बंगल्याकडे आलेले बघितले नाहीत किंवा मालकीणबाई कधी त्या बिल्डींगच्या बाजूला गेलेल्या दिसल्या नाहीत.  त्यांच्याकडे कधी पाहुणे आलेले देखील दिसले नाहीत; की त्यांच्या रूटीनमधे कधी फरक पडला नाही. मात्र कधी कधी त्या बिल्डिंगच्या बाजूच्या गॅलरीत उभं राहून त्या बिल्डींगच निरीक्षण करताना मी बघितल आहे त्यांना.

मात्र एक गम्मत सांगू का? त्या मालकीणबाई गॅलरीत असोत किंवा बागेत.. त्यांची माझी दृष्टादृष्ट क्वचित कधी झाली तर त्यांना माझ्याशी बोलायच आहे अस मला वाटायच. बहुतेक त्या हसायच्या देखिल माझ्याकडे बघुन. कदाचित ती माझी आंतरिक इच्छा होती; म्हणूनही मला असं वाटत असेल... पण मी त्यांना कधी कोणाशीही बोलताना बघितलं नाही की पुढच्या गेटजवळ आलेलं बघितल नाही. त्यांचा सोबती अस म्हणायला तो एकुलता एक नोकर होता; बंगल्याची आणि मालकीणबाईंची देखील काळजी घेणारा... कारण त्या आवारात झाडा-फुलांमध्ये असल्या की तो सतत त्यांच्या आजूबाजूला रंगाळत असतो. कधी कधी तर मला वाटत की मालकीणबाईना बोलायचं असल तरी या नोकरामुळे त्या बोलायला पुढे येत नाहीत. तो तर त्यांची पाठ एक मिनिट देखील सोडत नाही. राहातो देखील आवारातल्या दोन खोल्यात. मी  त्यालाही कधी कोणाशी बोलताना बघितला नाही.

बहुतेक मी ऑफिसला जायचो तेव्हा तो घरच सामान आणत असावा. कारण त्याला तर कधी मी आवाराबाहेर पडलेलासुद्धा बघितला नाही. फक्त मी जेव्हा बंगल्याच्या बाजूने फेऱ्या मारायचो तेव्हा तो काहीतरी काम करतो आहे अस दाखवत बंगल्याच्या आतून माझ्यावर नजर ठेवून असायचा. त्याला वाटत असेल मला कळत नाही,; पण मला माहित होत की त्याच पहिल्या दिवसापासूनच माझ्याकडे लक्ष होत.

मला मात्र त्या बंगल्याबद्दल आणि त्याच्या मालकिणी बद्दल खूप उत्सुकता, कुतूहल  होत. अनेकदा मी प्रयत्न केला त्या मालकीणबाईना गाठण्याचा. पण त्या कधी बाहेर पडायच्या ते कळलच नाही. दिवसां मागून दिवस आणि महिन्यांमागून महिने जात होते; पण तरी पहिल्या काही दिवसात जितकी माहिती मिळाली त्याहून जास्त माहिती अशी कळतच् नव्हती त्या बंगल्याच्या मालकिणी बद्धल किंवा त्या नोकाराबाद्धल. मी आजूबाजूला देखील चौकशी केली सहज बोलता-बोलता. लोक काही फार उत्सुक नसायचे त्या बंगल्याबाद्धाल बोलायला. आणि मग मला का बुवा त्या बंगल्याची एवढी उत्सुकता? असा प्रश्न हे लोक विचारतील आणि एकूणच ते वाईट दिसेल म्हणून मी देखिल कोणाला काही बोललो नाही. आपली आपणच जमेल तशी माहिती काढावी अस मी मनात ठरवून टाकल.

अर्थात माझा संसार चांगला चालू होता. माझ आपल ऑफिस आणि घर इतकच चालू असायचं. सुरवातीला रविवारी बाहेर जाण्यासाठी मुलं हट्ट करायची. पण मी टाळायचो.  मग माझ्याकडे रागीट कटाक्ष टाकून बायकोच मुलांना घेऊन जायची कुठेतरी. मुलांच्या शाळेच्या पिकनिक असायच्या त्याला आवर्जून पाठवायचो त्यांना. बायको पण ऑफिसच्या पिकनिकला जायची. ती नाही म्हणाली तरी मी आग्रह करायचो तिला जाण्यासाठी. म्हणजे मग माझ्यामागे नको लागायला बाहेरगावी जाऊया म्हणून. आमच्या ऑफिसची पिकनिक देखील ठरायची; मला विचारायचे देखील सुरवातीला. पण मी काही ना काही कारण सांगून टाळायचो. मग हळूहळू त्यांनी मला विचारण सोडलं. त्याच कारण देखील तसच आहे. तसा मी आत्ता तुमच्याशी बोलतो आहे; पण मुळचा अबोलच.मला फार कोणाशी बोलायला आवडत नाही. जर बायको मुद्धाम येऊन माझ्याशी बोलली नाही तर मी आपणहून नाही तिच्याशी बोलायला जात. मला नेहेमीच प्रश्न पडतो... काय बोलायचं असत अस? लोकं सारख गप्पा काय मारतात? इतक काय असत त्यांच्याकडे बोलण्यासारख? अर्थात मी कामात चोख आहे; त्यामुळे ऑफिसमध्ये जरी फारसा कोणाला आवडत नसलो तरी कोणी मला त्रास द्यायला नाही येत. त्यात मला त्या चढाओढीत इंटरेस्ट नाही. त्यामुळे माझ्या कामाच्या जोरावर जी इन्क्रिमेंट मिळते आणि वरची पोस्ट मिळते त्यात मी सुखी असतो.

आता परवाच इन्क्रिमेंट झाली. बायकोला रात्री जेवताना सांगितल तर ती वैतागली. म्हणे इतकी चांगली बातमी अशी शांतपणे काही खास नसल्यासारखं काय सांगता? अहो आल्या आल्या बोलला असतात तर बाहेर गेलो असतो ना सेलिब्रेट करायला.

आता हिला काय सांगू? बाहेर जायचं म्हणजे संध्याकाळचा माझा फेरफटका ही बुडवायला लावणार. म्हणजे त्या बंगल्याच दर्शन नाही होणार. कालच मी बघितलं होत की दोन पपया छान पिकल्या होत्या. आज तो नोकर त्या उतरवतो की नाही ते बघायला नको का? हिला काहीच कळत नाही. बर मला माझा फेरफटका चुकवायला आवडत नाही अस सांगितलं तर घराला रणागाणाच रूप आल असत.

मागे झाल होत न असच. कुठलासा नवीन सिनेमा आला होता. हिला आणि मुलांना तो फर्स्ट डे लाच बघायचाच होता. माझी शुक्रवार संध्याकाळ एकदमच लाडकी. कारण शनिवारी ऑफिस नाही त्यामुळे शुक्रवारी निवांतपणे खूपवेळ मी भटकतो. त्या बंगल्याच्या आजू-बाजूने आणि मग तसाच बंगल्याच्या मागच्या बाजूच्या टेकडीवर पण जाऊन येतो. अगदी एकलकोंडी आहे ती टेकडी. कधी कोणाला तिथे जाताना मी बघितलेलं नाही. मला मात्र तिथे जायला फार आवडत. हे घरात कोणालाच माहित नाही. घरात काय.... इतर कोणालाच ते माहित नाही. गंमत म्हणजे त्या छानशा बंगल्याच्या नोकराला देखील माहित नसावं. कारण मी जोवर बंगल्याच्या आजूबाजूला फिरत असतो तोवर त्याची माझ्यावर बारीक नजर असते. मात्र मी बंगल्यापासून ४-५ फुटावर गेलो की मग मी काय करतो आहे याची त्याला फिकीर नसते. मग परत त्याची नजर बंगल्यात वळते.

अरे लिंक तुटली वटत; तर काय म्हणत होतो.... की मी शुक्रवारी त्या टेकडीवर जातो.  ती टेकडी म्हणे झपाटलेली आहे. लोकाना म्हणे तिथून चित्र-विचित्र आवाज एकू येतात. मूर्खपणा सगळा. अहो; मी कायम जातोच की तिथे. काही नाही तिथे. सुंदर निसर्ग सोडला तर. लोकाना जे विचित्र आवाज वाटतात ना ते वारा दगडांवर आणि झाडांमधून वाहत असतो; त्याचा असतो. आपल्याला वाटत की खरच कोणीतरी आपल्याला हाक मारत आहे. पण तस काहीच नाही.

हव तर चला माझ्याबरोबर तुम्ही एकदा त्या टेकडीवर. आणि मला तर वाटत की बंगल्याच्या मालकीणबाई पण बहुतेक जात असाव्यात टेकडीवर. कारण त्या तयार होतात पण मागून बाहेर पडतात अस मी बघून ठेवल. आहे. असो! तर.... सांगायचा मुद्धा हा, की मी त्यादिवशी नाही म्हणालो सिनेमाला यायला. मग घरात जो काही प्रकार झाला त्यावरून मला पहिलं आणि दुसर जागतिक युद्ध कस झाल असेल याची कल्पना आली. पण मी मात्र माझ्या म्हणण्यावर  ठाम राहिलो. परिणाम एवढाच झाला की बायको आणि मुल सिनेमा गेली आणि मग बाहेरच जेवून रात्री उशिरा आली आणि मी फक्त ब्रेड खाऊन झोपलो. पण ते नव्हते ते माझ्या पथ्यावरच पडल बर का! खूप उशिरा पर्यंत भटकलो मी त्यादिवशी टेकडीवर. आणि असा शोधही लागला मला की टेकडीचा एक सुळका बंगल्याच्या अगदी जवळ आहे आणि त्यामुळे बंगल्याच्या आतल्या भागांच निट निरीक्षण करता येयील मला. फक्त दिवसा जायला हव टेकडीवर.

अहो तसा मी अबोल आहे ना त्यामुळे बोलायची सवय नाही. मग लिंक तुटते माझी बोलताना. मुळात मी तुम्हाला दुसरच सांगत होतो न. तर; मी जेव्हा बायकोला सांगिलतल की मला इन्क्रिमेंट मिळाली आहे तेव्हा तिला आनंद पण झाला आणि सेलिब्रेशन नाही म्हणून राग पण आला. म्हणून मग मुलांना बोलावून तिने लगेच परस्परच सांगून टाकल की त्या शनिवार-रविवार बाबा.... म्हणजे अस्मादिक.... सेलिब्रेशन म्हणून त्यांना जवळच्या थंड हवेच्या ठिकाणी नेणार आहेत. अस्सा राग आला मला. कोणी सांगितल होत हिला असला शहाणपणा करायला. बर 'नाही' म्हणावं तरी पंचायीत. तिसर महायुद्ध मला नको होत. म्हणून मग हो म्हणालो. हॉटेलच बुकिंग केल... शनिवार सकाळसाठी गाडी बुक केली.... मुलं आणि बायको एकदम खुश होते. मी मात्र काहीच बोलत नव्हतो... आणि  मला अचानक शुक्रवारी रात्री ताप भरला. मुलांची तोंड उतरली. बायकोला सुद्धा खूप वाईट वाटत होत; हे मला कळत होत. मग मीच हिला समजावलं की ताप असा काही फार नाही. तू जा मुलांना घेऊन. त्यांचा हिरमोड नको. मी सांभाळीन स्वतःला. तिची अगोदर तयारी नव्हती मला एकट्याला सोडून जायची. पण मग मुलांच्या हिरमुसल्या तोंडांकडे बघून तयार झाली. शनिवार सकाळी ६ वाजता गाडीत बसवून दिल त्यांना आणि पोहोचल्यावर फोन करा म्हणून सांगितल.

मी जिना चढून वर घरी आलो तेच शीळ वाजवत. अहो असा प्रश्नार्थक चेहेरा काय करताय? मला ताप बीप काही नव्हता. उगाच नाटक केल. मग अंग कस गरम लागल? आहो त्यात काय.... आपण म्हंटल न अंग गरम आहे की या बायका लगेच खर मानतात. त्यात मला जायचं नव्हत. पण त्या तिघाना जायचंच होत न... त्यामुळे जाण्याची तयारी.. तिथे करायची मजा.. त्यांच्या असल्याच गप्पा जास्त होत होत्या. मग माझा उतरलेला चेहेरा आणि ब्लंकेट घेऊन पडून राहाण इतकं पुरेसं होत मला ताप आला आहे हे सिद्ध करायला. बस!

काय हो, आता पर्यंत तुम्हाला मी न जाण्याच कारण समजलच असेल न? तसे तुम्ही हुशार आहात. अगदी बरोबर! मला आजचा पूर्ण दिवस आणि उद्या दुपारपर्यंत मी कुठे जातोय; काय करतोय ते विचारणार कोणीही नाही. त्यामुळे मी आजच दुपारी टेकडीवर जाणार आहे. प्रत्यक्ष त्या बंगल्याच्या आत जाण माझ स्वप्न आहे; पण तो योग काही जुळून येत नाही आहे. मग निदान त्या सुळक्यावरून काही दिसलं तर बघायची मला खूप उत्सुकता आहे. म्हणजे मला हे बघायचं आहे की तो बंगला आतून कसा ठेवला आहे.

त्यामुळे माझ मी ठरवल्याप्रमाणे दुपारच जेवण आटोपून गेलो टेकडीवर. बंगल्याच्या बाजूने जात होतो तेव्हा त्या नोकराच माझ्याकडे लक्ष होत. पण मी मुद्धामच शीळ घालत माझ बंगल्याकडे लक्ष नाही अस दाखवत बंगल्याला लांबून एक फेरी मारून टेकडीच्या दिशेने गेलो. मस्त टेकडी फिरलो अगोदर. अर्थात त्याची दोन कारण होती. एकतर टेकडीवर अजून कोणी नाही ना याची खात्री करून घ्यायची होती. नाहीतर मी आपला बंगल्याच निरीक्षण केवळ कुतूहल म्हणून करणार आणि कोणी बघितल तर वाटणार की मी कोणी चोर-बीर आहे. आणि दुसर म्हणजे; मी खरच ती टेकडी अजून निट पूर्ण बघितालील नव्हती. त्यामुळे तिचं सौंदर्य देखील मला बघायचं होत.

तर टेकडी फिरलो. चांगला तास दोन तास फिरत होतो. थोडी भूक लागल्या सारख वाटल. मग बरोबर नेलेली sangwhiches खाली. एका मस्त वडाच्या झाडाखाली मस्त ताणून दिली. थोड्यावेळाने जाग आली. काहीतरी आवाज जाणवला. मी वळून बघितलं आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. त्या बंगल्याच्या मालकीणबाई टेकडीच्या दिशेनेच येत होत्या. काळ्या रंगाचा चुडीदार त्यांच्या गोऱ्या कांतीवर खुलून दिसत होता. त्याचं अजून तरी माझ्याकडे लक्ष गेलं नव्हत. मी पटकन उठून झाडामागे लपलो. मी त्यांना दिसू नये असा मला वाटत होत. कारण त्या कुठे जातात त्याची मला उत्सुकता होती. त्या देखील इथे तिथे न बघता नाकासमोर सरळ चालत टेकडीच्या टोकावर गेल्या. पार वर-वर. तस पाहिलं तर एका मर्यादेनंतर टेकडीचा चढ दमछाक करणारा होता. पण बाईला सवय असावी. झपझप चालत त्या वर गेल्या. माझी खुप इच्छा होती त्यांच्या मागे जायची. निदान कळल असत की त्या कुठे जातात रोज छान तयार होऊन. पण वरती फक्त साधी झुडपं होती. त्यांनी मागे वळून बघितल असत तर लपायला ना मोठे दगड ना झाड. म्हणून मग मी त्या परत यायची वाट बघत बसलो.

माझ्या मनात आल आता तर मला मी ठरवल्येल्या सुळक्यावर जाऊन त्या बंगल्याच निरीक्षण देखील करता येणार नव्हत. कारण मी अस काही करत असताना जर त्या खाली उतरल्या असत्या आणि त्यांनी बघितल असत तर पंचाईत झाली असती. त्यामुळे मी त्या खाली येण्याची वाट बघत बसलो. सहा वाजून गेले तरी त्यांचा पत्ता नव्हता. आणि अचानक चांगलाच जोरात वारा सुटला. मोठमोठ्याने शीळ घालत होता वारा. मला तर वाटल की कोणाच्यातरी नावाचा जप चालू झाला आहे. गम्मत म्हणजे वारा टेकडीवर सुटला होता आणि मला भास होत होता की हाका बंगल्यातून येत आहेत. हळूहळू अंधार झाला. मी गोंधळून गेलो होतो. अजून मालकीणबाई टेकडीवरून उतरल्या नव्हत्या. काही प्रोब्लेम नसेल ना झाला. माझ्या मनात आल. वर जाव का? मदतीच्या निमित्ताने ओळख पण होईल. पण तेवढ्यात त्यांना मी घाईघाईने टेकडीवरून खाली येताना बघितल. इथे तिथे न बघता त्या वेगात टेकडी उतरल्या आणि बंगल्याच्या दिशेने अदृश्य झाल्या. मनातून चरफडत मी घराकडे निघालो; हे ठरवूनच की दुसऱ्या दिवशी सकाळीच जायचं टेकडीवर. कारण अस अचानक त्यांच्या येण्यामुळे मी जे ठरवलं होत त्यावर सगळ पाणी पडलं होत.

पण हाय रे माझ दुर्दैव! रात्रीच मला खरच बराच ताप चढला. इतका की औषध घ्यायलासुद्धा मी पलंगावरून उठू शकत नव्हतो. फोन वाजत होता बाहेरच्या खोलीत. पण तो उचलायला जाण्याचे पण अंगात त्राण नव्हते. बायको आणि मुलं दुसऱ्या दिवशी दुपारी किंवा संध्याकाळी येणार होती. माझ्या मनात आलं म्हणजे आता ते लोक येईपर्यंत आपलं काही खर नाही. पण आश्चर्य म्हणजे सकाळी मी डोळे उघडले तर ही माझ्या समोर उभी. म्हंटल तू कशी काय आत्ता या वेळेला. तर म्हणाली काल दुपारपासून फोन लावत होते घरचा... तुम्ही एकदाही उचलला नाहीत. त्यामुळे खूप काळजी वाटायला लागली. शेजारच्या वाहीनींना फोन केला तर म्हणाल्या तुम्ही काल दुपारीच बाहेर कुठेतरी गेला होतात. कधी आलात ते कळल नाही. म्हणजे उशिरा आला असाल; असा अंदाज केला मी. बर नाही त्यात भर उन्हात बाहेर गेलात आणि घरी कधी आलात कोणाला माहित नाही... मग राहावल नाही आणि मुलांना समजाऊन घेऊन आले परत. काय सांगू हिच्या या वागण्याला. अस कोणी कोणा व्यक्तिवर इतका जीव लावत का? मूर्ख आहे. जाऊ दे झाल.

त्यादिवशी तब्बेत ठीक नव्हती तरी मी त्या टेकडीच्या सुळक्याकडे गेलो असतो. पण आता ही आली म्हणजे घरातच रहायला हवं हे लक्षात आल माझ्या. परत कधीतरी जाऊ असा विचार करून मनाला समजावलं. पण मग असेच दिवसांमागून दिवस जात राहिले पण त्या सुळक्याकडे जाण काही जमलं नाही मला.

माझी नोकरी मात्र छान चालू होती. कोणाशी मैत्री नाही... कोणाशी बोलत नाही.. त्यामुळे मी माझ काम भलतच चांगल करत होत अस वाटत. कारण मला वरची पोस्ट मिळणार होती याची मला कुणकुण लागली. मग प्रयत्न करून मी ती ऑफर टाळली. अहो आता काय सांगू तुम्हाला? फिरतीवर जाव लागल असत मला ती पोस्ट घेतल्यावर. म्हणजे त्या बंगल्यापासून लांब. म्हणून मग नाही घेतली बढती. हिला बोललो नाही मात्र. नाहीतर उगाच तिची चिडचिड आणि बडबड ऐकायला लागली असती.

 असेच दिवस आणि वर्ष जात होती. आता माझी मुलं मोठी झाली होती . ती इतकी मोठी कधी झाली ते कळलच नाही. तशी माझी बायको व्यवहारी आणि हुशार. तिनेच वाढवलं मुलांना. मी आपला नावाला. कमावून आणायचं ते तिच्या हातात ठेवायचं आणि घरात रहायचं.... बस! एवढाच केल मी कायम. पण मला यात काही वावग वाटलच नाही. कारण तसा मी अबोल आणि एकटाच रहायला आवडणारा मनुष्य आहे न. गम्मत म्हणजे माझ्या लेकीच लग्न ठरल. ते सगळ ठरल्यावर मला माझ्या बायकोने सांगितल. अगदी आमंत्रण पर्त्रीका पण तयार झाल्या होत्या. आणि मला पत्ताच नव्हता. पण त्यात माझी काही तक्रारच नव्हती. मात्र आमंत्रण पत्रिका बघून माझ्या मनात एक कल्पना आली आणि  मी आमंत्रण देण्याच्या निमित्ताने बंगल्याकडे वळलो.

चला या निमित्ताने इतकी वर्षे समोर असूनही कधी ओळख न झालेल्या त्या बंगल्याची आणि बंगल्याच्या मालकिणीची ओळख होईल अस वाटल होत मला. पण नेमक्या मालकिणबाई काही दिवसांसाठी बाहेर गावी गेल्या होत्या असे नोकराने मी गेटजवळच पोहोचताच मला बाहेरच थांबवून सांगितले. इतक्या वर्षांमध्ये पहिल्यांदाच तो माझ्याशी बोलला. पण तेही फक्त माहिती देण्यापुरताच. एकुलता एक मार्ग देखील संपला तो बंगला जवळून.... आतून पहाण्याचा. खूप वाईट वाटल मला.

ठरल्या प्रमाणे आणि ठरल्या दिवशी लेकीच लग्न झाल आणि पुढे यथावकाश मुलाचही. मुलगा लग्ना नंतर गावात घर घेऊन राहायला गेला. हिला बोलावून घेतल. मी मात्र गावातला कोलाहल आणि ती गडबड घाई असल जीवन मला आवडत नाही या सबबिवर इथेच राहिलो.

आता मी रिटायर झालो होतो. संपूर्ण दिवस माझाच होता. आता तर बायकोही नव्हती अडवायला. त्यामुळे रोज तो बंगला आणि त्याची काड़ी इतकाही बदल न झालेली मालकिण यांच निरिक्षण करायचा नादच लागला होता मला. वयापरत्वे मी टेकडीकडे जाणे मात्र सोडून दिले होते. कारण अगदी थोडसच जरी चढलं तरी  तिथून आल की हमखास मला ताप यायचा. तिथला वारा मला सोसत नव्हता. बर; तब्बेत बिघडली की हिला याव लागायचं. मग तिच्या तोंडाचा पट्टा सुरु व्हायचा. ते नकोस वाटायचं. त्या सुळक्याकडे पोहोचणं तर आता अशक्यच होत. त्यामुळे माझा मुक्कमपोस्ट आमच्या घराची प्रशस्त गॅलरी हाच झाला होता.

आता तर मालकीणबाईंचा दिनक्रम मला जवळ जवळ पाठ झाला होता. त्या कधी कोणत्या गॅलरीमध्ये दिसतील याचा अंदाज बंधणे हा माझा आवडता खेळ होता. काहीही झाल तरी त्या दिवसभरात एकदा तरी त्या जुनी बिल्डिंग दिसायची त्या गॅलरीमध्ये एकदा तरी नक्की जाऊन उभ्या राहायच्या. मात्र गेले दोन दिवस मला मालकीणबाई आवारात फिरताना किंवा कुठल्याच खिडकीत किंवा गॅलरीमध्ये दिसल्या नाहीत. खूप आश्चर्य वाटलं. बंगल्याच्या जवळपास फिरून बघितल; पण काही पत्ता लागेना. मग विचार केला टेकडीवरून निरीक्षण कराव. काहीतरी समजेल. म्हणून मग झेपत नव्हत तरी गेलो टेकडीवर. पण कसलं काय! काही दिसलच नाही. उलट नेहेमीसारख जोराचं वारं सुटलं आणि मला हाका एकू आल्या. पण गम्मत म्हणजे मला माझच नाव कोणीतरी घेत आहे अस वाटल. खूप हसू आल. मज्जा पण वाटली. कितीतरी वेळ मी अंदाज घेत होतो कुठून हाका येत आहेत. पण काही केल्या कळेना.  मग मात्र वाऱ्याचा त्रास होईल आणि आजारी पडू या विचाराने उतरलो टेकडी आणि घरी आलो माझ्या. रात्री थोड़ बर वाटेनास झालचं मला आणि त्यात थंडीचे दिवस. सर्दी-खोकला. मग थोड़ा ताप आला.

दुसऱ्या दिवशी अंगात चांगलीच कणकण होती सकाळपासून. पण बायकोला फोन करून नाही बोलावलं. तिची कटकट नको होती मला. बर नव्हत वाटत म्हणून मी संध्याकाळ झाली तरी दिवे न लावता बेड रूम मधे पडून होतो. अचानक खालुन कोणीतरी हाक मारतं आहे असा भास झाला. नीट कान देऊन एकल.. कोणीतरी माझ नाव घेऊन 'चला.... या...' अस काहिस म्हणत होत. आश्चर्य म्हणजे काल टेकडीवर जशी हाक मी एकली होती तशीच हाक होती ती.  म्हणून मग मी उठून गॅलरीतुन खाली बघितल तर समोरच्या बंगल्यातला नोकर! मला खूप आश्चर्य वाटल. ज्याच्याशी गेले अनेक वर्षे मी बोलायचा प्रयत्न करतो आहे, ज्याला मी रोज बघतो आहे; पण ना बोलतो ना बंगल्याच्या जवळ येऊ देतो... तो आज चक्क मला हाक मारतो आहे.... आणि तेही माझ्या घराकडे येऊन?  मी त्याला खुणेनेच काय म्हणून विचारल. आवाज बसला होता माझा. त्याने बंगल्याकडे बोट दाखवत ' चला.... या  तुम्ही.' अस काहिस म्हंटल्यासारख वाटल.

मनुष्य स्वभाव कसा असतो बघा. इतकं बर नसुनही बंगला बघायला मिळणार या आनंदात मी चपलाही न घालता उतरलो आणि तड़क बंगल्याकडे येऊन गेट उघडून आत शिरलो..........

.............."अहो सकाळी आमचे 'हे' दुधाला जात होते तेव्हा त्यांना दिसल. काय झाल... कस झाल... कुणास ठाऊक? तुम्ही गेलात मुलाकडे राहायला आणि कधीही बघाव तेव्हा तुमचे 'हे' सारखे आपले गॅलरीत बसलेले असायचे. काल हे भाजी घेऊन येत होते तेव्हा त्यांची आणि ह्यांची दारात क्षण दोन क्षण भेट झाली. हे हसले तर तुमचे  मिस्टर देखील कधी नव्हे ते हसले. म्हणून मग यांनी विचारल 'काय म्हणता'; तर म्हणाले 'थोड़ बर  वाटत नाहीये. आता जेवून आराम करीन'. हे बर म्हणाले आणि तुमचे मिस्टर घरात गेले.  सकाळी हे गॅलरीमध्ये उभे राहून चहा घेत होते तेव्हा यांच सहज लक्ष गेल तर तुमचे मिस्टर त्या पछाडलेल्या बंगल्याच्या दिशेने जाताना दिसले. तसे ते नेहेमीच जातात त्या बाजूला हे आता सगळ्यांना माहित झाल आहे त्यामुळे ह्यांनी दुर्लक्ष केलं. पण मग अंघोळ आणि पूजा आटपून हे परत गॅलरीत सहज गेले तर त्यांना त्या बंगल्याच्या तुटक्या पोर्चच्या वरच्या गॅलरीसारख्या भागातून कोणीतरी अर्धवट वाकलेल दिसल. अगोदर ह्याना कळलच नाही अस अचानक त्या बंद पडक्या बंगल्यात कोणी का दिसावं? म्हणून त्यांनी दुर्लक्ष केल. उगाच कशाला! नाही का? पछाडलेला बंगला आहे म्हणतात तर आपण कशाला पडा त्यात. पण मग त्यांना त्या व्यक्तिचे कपडे ओळखीचे वाटले म्हणून हे 'कोण आहे त्या बंगल्याकडे'; अस मोठ्याने ओरडले. तिथून काही उत्तर नाही. पण मी, मुलगा आणि सून बाहेर आलो. बिल्डिंग मधले इतर लोक देखील त्यांच्या त्यांच्या गॅलरीतून डोकावले. काहीच हालचाल दिसली नाही बंगल्यातून मग मात्र काहीतरी गड़बड़ आहे हे लक्षात येऊन आम्ही ताबड़तोप पोलिसात कळवल. पोलिस आले तोपर्यंत आम्ही तुम्हाला कळवल....  पण तुम्ही यायच्या अगोदरच डॉक्टरांनी सांगितल ते गेले. खूप वाईट झाल हो. पण वाहिनी तुमचे मिस्टर सारखं त्या पडक्या बंगल्याकडे का बघत बसायचे हो? आम्हाला कायम नवल वाटायच. पण तसे अगदीच अबोल होते. त्यामुळे ह्यांनी कधी विचारल नाही. कधी तुम्हाला तरी बोलले का?"

"नाही हो वाहिनी. आयुष्यभर संसार करूनही ते कधीही संसारात रमलेच नाहीत. सुरवातीला खूप वाईट वाटायचं. इथे या घरात राहायला आल्यानंतर तर ते आमचे राहिलेच नाहीत. खूपदा वाटायचं अस सतत त्या बंगल्याकडे काय बघत असता. पण मला माहित होत त्यांनी काही उत्तर दिल नसत. म्हणून मग कधी विचारलच नाही. मात्र त्यांनी मला कधी कशालाही अडवल नाही. हाच त्यांच्या मनाचा मोठेपणा समजून मी सोडून दिल. आणि मग हळुहळु आम्हाला पण त्यांच्या अलिप्तपणाची सवय झाली. जाऊ दे. खूप काही आहे मनात. पण आता गेलेल्या माणसाबद्दल काय बोलायच? जाऊ दे!"

..................बंगल्यात तर आलो आहे... अनेक वर्ष मनाशी जपलेलं स्वप्न पूर्ण झालं एकदाच. संपूर्ण बंगला आधाशासारखा फिरून बघितला. बाहेरून जितका सुंदर आहे तितकाच आतून देखील छान ठेवला आहे. पण बंघ्ल्याच्या मालकिण बाई नाही दिसल्या. तो नोकर सांगून गेला फ्लॅट सोडून मी या बंगल्यात शिफ्ट झालो तरी चालेल. हे अस अचानक त्याने मला सांगण थोडं आश्चर्य वाटल मला. पण खूप खुश झालो मी. उत्साहाने पोर्चच्या वर असणाऱ्या गॅलरीत गेलो आणि घराकडे बघितल तर बायको दिसली घराच्या गॅलरीमध्ये..... कमाल आहे. मी न बोलावता ही कशी आली? पण बर झालं... आता तिला देखील बोलावून घेतो इथे. दोघे मस्त राहू या बंगल्यात. अरे!! पण कधीची  हाक मारतो आहे तर बघतही नाही माझ्याकडे. जाऊ दे झाल. मला इथे यायच होत... आलो... बस.......

-------------------------------------------------------


Friday, January 10, 2020

एक 'पोपटी'ची संध्याकाळ

एक 'पोपटी'ची संध्याकाळ


जानेवारीची मस्त थंडी आणि त्यात आम्ही दोन दिवसांकरता का होईना पण अलिबागला गेलो होतो. आम्ही उतरलो होतो तो बंगला तर केवळ अप्रतिमच होता. एक मस्त तरण तलाव होता. मागच्या आवारात भरपूर नारळाची झाडं आणि हिरवं गार गवत. एकदम शांत वातावरण. आवाज फक्त पक्षांचे आणि आमच्या गप्पा-हसण्याचे. याहून छान आणि निवांत अस काही असूच शकत नाही; अस वाटत होत. दुपारच्या जेवणानंतर मस्त वामकुक्षी आटोपून मुलींबरोबर त्या तरण तलावाकाठी गप्पा मारत कॉफीचा आस्वाद घेत बसलो होतो. त्यावेळी बंगल्याचे caretaker विनोदजी आले. त्यांनी विचारले, "या सिझनला पोपटी करतात. तुम्हाला आवडणार असेल तर करतो." म्हंटल,"हे पोपटी काय असत? माहित नाही आम्हाला." ते म्हणाले,"मडक्यात भाजलेलं चिकन आणि भाज्या. बघा आवडेल नक्की." मी म्हणाले,"मी नॉनवेज नाही खात. बाकी हे तिघे सगळं खातात." ते म्हणाले,"वाहिनी, तुमच्यासाठी कणीस, बटाटा, वांगी असतील. खाऊन बघा. नक्की आवडेल." म्हंटल, "हे काहीतरी नवीन आहे. नक्की बघितलं पाहिजे. नक्की खाऊ आम्ही. कराच तुम्ही ही पोपटी."

मी हो म्हंटल्यावर ते तयारी करायला गेले. थोड्यावेळाने बघितलं तर २ किलो वालाच्या शेंगा, तितक्याच वाटाण्याच्या शेंगा, ४-५ बटाटे, वांगी, अंडी आणि चिकन घेऊन ते आले. बटाटा, वांगी आणि चिकन याला फक्त तिखट, मीठ, हळद आणि गरम मसाला आणि अख्खा लसूण लावून त्यांनी ते मुरायला ठेऊन दिल. दिवस मावळला तसं एक मोठसं मडक घेऊन ते स्वच्छ धूतलं. त्यात ते कोणतीतरी झुडपं घालत होते. मी विचारलं," हे काय आहे नक्की?" त्यांनी माहिती दिली,"हा भांभूर्डीचा पाला आहे. बघा याला वास कसा येतो." हातात घेऊन बघितलं त्याला मस्त ओव्याचा वास येत होता. खूप छान वाटला तो ताजा ओलसर झाडाचा ओव्यासारखा वास. त्यांनी पुढे माहिती दिली. "हा या मडक्यात घालायचा. त्यावर या गावठी वालाच्या शेंगा आणि वाटाणा शेंगा घालायच्या. त्यावर चिकन आणि अंडी. मग परत शेंगा. मग तुमची वांगी आणि बटाटे. परत शेंगा. आणि मग परत भांभूर्डीचा पाला."

एकूण हे सगळ त्यांनी त्या मडक्यात भरलं. मग आवारात एका कोपऱ्यात ते मडक त्यांनी उलट करून ठेवलं. त्यावर सुकलेल्या काथ्या रचल्या. मग सुकलेलं गवत निट रचून त्याला आग लावली चारी बाजूनी. गोल फिरून आग नीट लागली आहे की नाही ते पाहिलं. मी देखील त्यांच्या बरोबर तिथे उभी राहून बघत होते. ते म्हणाले,"वाहिनी, आता २० मिनिट बसा आरामात." साधारण २०-२५ मिनिटांनी त्यांनी काठीने त्या मडक्याच्या बाजूचा जाळ हलवायला सुरवात केली. मडक चांगलच लालसर गरम झालेलं दिसत होत. मी म्हंटल,"आता हे गार होईपर्यंत थांबावं लागेल." त्यावर विनोदजी म्हणाले, "अरे गार झाल्यावर खाण्यात काय मजा? आता ओल्या गोणपाटात मडक उचलून आणतो पुढे. चला तुम्ही." आणि खरच एक गोणपाट ओल करून ते त्या मडक्यावर टाकल. ते गरम मडक उचलून त्यांनी आम्ही बसलो होतो तिथे आणलं. त्या ओल्या गोणपाटानेच त्यांनी वरचा पाला काढला. तिथे एक परात तयार ठेवलेली होती. त्यात त्यांनी ते मडक उलटं केलं. आतून मस्त खरपूस भाजलेल्या शेंगा, बटाटा, वांगी, अंडी बाहेर आली. मग एक मोठा चिमटा घेऊन त्यांनी चिकनचे तुकडे बाहेर काढले आणि परात आमच्या समोर ठेवली. म्हणाले,"हे असंच गरम-गरम खाऊन बघा."

तो एकूण प्रकार बघून मुली काही फार उत्साही नव्हत्या ते खायला. पण त्यांची मेहेनत बघून त्यांनी एक एक चिकनचा तुकडा उचलला. खायला सुरवात केली मात्र... सर्वांचाच चेहेरा खुलला. भाजलेल्या भाज्या आणि चिकन-अंडी सगळ एकूणच इतक अप्रतिम चविष्ट होतं. भाजलेल्या शेंगा देखील अगदी मस्त लागत होत्या. 'मी काही फारस खाणार नाही ह....' अस म्हणणाऱ्या माझ्या लेकीनी अगदी मनापासून सगळ खाल्ल. नंतर शेंगांच्या सालींचा झालेला ढीग बघून आम्ही एकमेकांना चिडवत हसायला लागलो.
खरच! इतकं स्वादिष्ट... मस्त खरपूस भाजलेली... अत्यंत पौष्टिक आणि तेल-तूप किंवा फार काही मसाले नसलेली ती पोपटी आमची संध्याकाळ एकदम सप्तरंगी चविष्ट करून गेली.




****










Friday, January 3, 2020

एक निर्णय (भाग 3) (शेवटचा)

भाग 3

हळूहळू दिवस पुढे सरकत होते. लग्नाला तीन वर्षे देखिल झाली. अलीकडे मीनाक्षी घरी वेळेत येऊ शकायची नाही. तिने एक उत्तम गायनॅक म्हणून अत्यंत थोड्या अवधित नाव मिळवले होते.  तिच्या पेशंट्स तिनेच तपासावे म्हणून तिची वाट पाहात उशिरापर्यंत थांबायच्या. अशा प्रेग्नेंट बायकांना दुस-याकोणावर सोडायला मीनाक्षीचीही तयारी नसायची.  अनेकदा इमर्जंसीज देखिल अनेक असायच्या.  त्यामुळे तिला हॉस्पिटलमधेच राहावे लागायचे. त्यामानाने ओर्थपेडीक झालेल्या प्रशांतला अपॉइंटमेंट घेऊन पेशंट्स भेटायला येत. त्याचेदेखिल हळूहळू नाव व्हायला लागले होते. तो भारतातील सर्वात मोठ्या ऑर्थो सर्जनना असिस्ट करत होता. पण फक्त पेशंट्सना तपासणे इतकेच आयुष्य जगणारा प्रशांत नव्हता. दोघेही डॉक्टर असल्याने त्या प्रोफेशनमधे द्यावा लागणारा वेळ.. इमार्जनसीज... सगळ्याची दोघानाही कल्पना होती. दोघेही आपापल्या कामात खुश होते.... आणि तरीही काहीतरी कुठेतरी गड़बड़ होती.

अनेकदा प्रशांत घरी वेळेत यायचा. पण मिनाक्षीला उशिर होत असे. ती घरी खूप दमुन येत असे. प्रशांतने जर कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन केला असला तर 'दमले आहे', अस म्हणून ती तो हाणून पाडायची. पण 'एमर्जंसी आहे,' असा कॉल आला तर आहे तशीच पळायची. तिच इमर्जन्सीला जाणं प्रशांतला मान्यच होत... पण त्याला मीनाक्षीचा वेळ हवासा वाटायचा... तो मात्र ती त्याला देत नव्हती. मुळात मीनाक्षीने लहानपणापासून डॉक्टर बनण्याचे स्वप्न बघितले होते. प्रशांतने कधी असा प्लॅन केला नव्हता. हुशार होता आणि यश मिळत गेल मिनक्षीची सोबत होती, म्हणून तो डॉक्टर झाला होता. त्यामुळे दोघांचाही त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता.

प्रशांतला नाटकं बघायला जायची खूप इच्छा असायची. गाण्याचे कार्यक्रम. विविध फेस्टिवल्सला जावस वाटायच. पण मिनाक्षीला जमायच नाही. सुरवातीला त्याची चिडचिड व्हायची. पण मग त्याने तिच न येण स्वीकारलं आणि एकट्याने जायला सुरवात केली. मिनाक्षीला थोड़ वाईट वाटल. पण ती काही बोलली नाही. कारण एकतर त्यांचा वाद झाला असता आणि मुख्य म्हणजे... तो एकटा जायला लागल्यापासून तिला सूटल्यासारख वाटायला लागल होत. हे वाटण योग्य की अयोग्य याचा त्यावेळी तिने विचारही केला नव्हता.

एका शनिवारी ती घरी लवकर आली. त्याचं त्यादिवशी एक नाटक बघायला जायच ठरल होत. प्रशांतचा हॉस्पिटलमधे फोन देखिल आला होता.पण ती तो घेऊ शकली नव्हती. त्याला वाईट वाटल असणार हे तिला लक्षात आल होत; त्यामुळे तर ती ठरलेल्या वेळेच्या अगोदर घरी पोहोचली होती. पण प्रशांत घरी नव्हता. डायनिंग टेबलावर एक छोटी चिठ्ठी होती. 'उशीर होईल. जेउन येणार आहे. तू वेळेत झोप. मी घराच्या किल्या घेऊन गेलो आहे.'

चिठ्ठीला मायना नव्हता. खाली नाव नव्हतं. बस एक मजकूर... काही शब्द! ती चिठ्ठी  वाचून मिनाक्षी मटकन खुर्चीत बसली. प्रशांत माझी वाट न बघताच गेला? खर तर मी आज ठरलेल्या वेळेच्या लवकर आले आहे. तरीही तो नाही? म्हणजे त्याने हे ठरवूनच टाकल होत की मी येणार नाही आहे. ती चिडली... हिरमूसली.... आणि तिथेच डायनिंग टेबलावर विचार करत बसली.

'कुठेतरी काहीतरी चुकत आहे. तो असा कसा मला सोडून एकटाच नाटकाला जाऊ शकतो? ठरल होत न आपण एकत्र जाऊ या अस. मग का नाही थांबला तो माझ्यासाठी?' मीनाक्षीच एक मन विचार करत होत. त्याचवेळी दूसर मन तिच तिला उत्तर देत होत... 'जेव्हा त्याने पहिल्यांदा एकट्याने जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा तू त्याला थंबवल नाहीस न? उलट तुला सुटल्या सारख वाटल होत... विसरलिस? मग आता का ही चिडचिड? आणि त्यातही आत्ता जर तुला काही इमरजेंसी आली तर तू हॉस्पिटलला जाणारच आहेस ना?'

'पण मग ते माझ कर्तव्य नाही का?' पहिल मन.

'इमर्जन्सी आली तरी तुझ्या एवजी पर्याय खरच नाही का हॉस्पिटलमध्ये? डॉक्टर्सनी त्यांच्या प्रोफेशनला प्रामाणिक असलच पाहिजे. तुला तुझ काम सर्वात जास्त प्रिय आहे. पण मुख्य म्हणजे प्रशांतसाठी तुझ काही कर्तव्य किंवा प्रेम आहे की नाही?' दुस-या मनाने सवाल केला.

'हो... पर्याय आहे हॉस्पिटलला. पण मला माझ काम खूप जास्त प्रिय आहे. माझ लहानपणापासूनच स्वप्न होत... एकच धेय.... खूप मेहेनत घेतली आहे मी त्यासाठी. आज काम करताना प्रत्येक क्षण मी एन्जॉय करते. This is what i wanted all my life! प्रशांतवर माझ प्रेम आहेच; पण माझ काम माझ पहिल प्रेम आहे' पहिल्या मनाने उत्तर दिल.

'हो न? मग आता तुला राग का आला आहे? तुझ पाहिलं प्रेम जर तुझ काम आहे तर कदाचित नाटकाला जाणं ही प्रशांतची गरज आहे.  तुझ्या प्रायॉरिटीमधे प्रशांत... त्याची स्वप्न... हे कधी होत का? आजही तुला नक्की दुःख कसल झाल आहे? तो न थांबल्याच् की तुझा विचार न करता तो गेल्याच? मीनाक्षी... हीच खरी वेळ आहे. तू निट विचार करायला हवा आहेस. लग्नाला तीन वर्ष झाली आहेत. प्रशांतच्या डोळ्यात तुला संसार आणि एखाद मुलाची अपेक्षा दिसत नाही का? तू याचा काही विचार केला आहेस का?' दुस-या मनाच्या या प्रश्नांच्या भडीमाराने मिनाक्षी गळून गेली.

तिने खरच संसार.. मुलं... यासगळ्याचा विचारच केला नव्हता. शाळेत असल्यापासून ऐकत्र असल्याने तिला प्रशांतच्या असण्याची सवय झाली होती. त्यामळे शिक्षण संपल्यावर आई-वडिलांनी लग्नाचा विषय काढला तेव्हा तिने 'मी प्रशांतशी लग्न करणार आहे;' अस म्हणून तिच्यापुरता तो प्रश्न सोडवून टाकला होता. त्याच कारण देखील तसच होत. आजवर ती म्हणेल ते प्रशांत एकत आला होता... मान्य करत आला होता. त्यामुळे तिला खात्री होती की प्रशांत देखील लगेच लग्नाला तयार होईल. नवीन व्यक्तीबरोबर लग्न करून परत एकमेकांची सवय होईपर्यंत थांबण्याची तिला इच्छा नव्हती. म्हणून तिने प्रशांतशी लग्न केले होते. त्यावेळी तिला त्याच्याकडून कोणतेही प्रश्न येतिल किंवा त्याचा तो काही निर्णय घेईल याची अपेक्षा नव्हती. त्यामुळेच आतापर्यंत त्यांचा संसार सरळ सुरळीत चालू होता. पण अलीकडे तो तिला म्हणायचा..,"मिनु किती धावणार आहेस? आता थोड़ जगुया ना! मला तुला काहीतरी सांगायचं आहे...." पण मिनक्षीने कधी हसून.. तर कधी दमले आहे म्हणून त्याच बोलण थांबवाल होत... त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केल होत.

आज मात्र प्रशांत तिच्यासाठी नाटकाला जायचा थांबला नाही; या एका लहानशा घटनेने तिच तिलाच विचारात टाकल होत. तिला पटत होत की तिच कुठेतरी चुकत आहे; पण तिला ते मान्य करायच नव्हतं. विचार करता-करता तिला तिथेच टेबलाजवळ झोप लागली. मेन डोर उघडण्याच्या आवाजाने तिला जाग आली.

"अरे, मिनु तू इथे अशी अवघडून का बसली आहेस? असा अंधार का आहे घरात?" प्रशांतने दिवे लावत तिला विचारले.

"प्रशांत आपल् एकत्र जायच ठरल होत न? मग तू असा कसा गेलास एकटाच?" मिनाक्षीने त्याच्या बोलण्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करत एकदम भांडण्याचा पवित्रा घेतला. तिला तिच्या मनातल्या विचारांपासून दूर जायच होत. त्यावर एकच उपाय होता... प्रशांतला कोर्टात उभ केल्याप्रमाणे प्रश्न विचारायचे .. आणि ती तेच करत होती.

"अग, मी तुला तेच तर सांगायला कॉल केला होता. पण तू घेऊ शकली नाहीस." प्रशांत जाम खुशीत होता. त्याच मिनाक्षीकडे लक्षच नव्हतं. "ओळख बघू मला कोणाचा फोन आला असेल? अग, तुला रेश्मा आठवते? अकरावी, बारावी मधे आपल्याच बरोबर होती. दोन्ही वर्ष नाटकाची हिरोईन होती... तिचा मला आज अचानक फोन आला होता. मिनु अग आजच्या नाटकाची हिरोईन पण तिच होती. तिला समजल मी नाटक बघायला येणार आहे तर तिने लवकर येण्याचा आग्रह केला. तुला माहित आहे; बारावी नंतर तिने साध बी. एससी. केल. तिला त्याच काळात लक्षात आल म्हणे की अभिनय हिच तिची आवड आहे. मग तिने कॉलेज बदलल. जिथुन नाटकं आणि स्पर्धात्मक कार्यक्रम जास्त होते अशा कॉलेजला अडमिशन घेतली. मेहेनत घेतली. आणि आता एक उत्तम नटी म्हणून तिने नाव कमवल आहे. कमाल आहे न?"

काय बोलाव मिनाक्षीला सुचेना. कारण तिच्या चिडण्याचा प्रशांतवर काहीही परिणाम झालेला नाही हे तिच्या लक्षात आल होत. तिने फ़क्त ""हम्" एवढाच प्रतिसाद दिला आणि गप्प बसली. पण आज प्रशांतच एकूण लक्षच नव्हतं. "दमली आहेस का? मग उगाच जागु नकोस ह. जेउन घे अन् झोप वेळेत. माझ जेवण झाल आहे. दमलो पण आहे. उद्या थोड लवकर पण निघायचं आहे त्यामुळे मी झोपायला जातो. गुड नाईट." प्रशांत आपल्याच तंद्रित बोलत बोलत आत गेला आणि कपडे बदलून पाच मिनिटांत झोपला देखिल. मिनाक्षीला खरतर खूप भांडायच होत... तो तिला सोडून आणि तिची वाट न बघता एकटाच नाटकाला गेला... बाहेर जेवून आला... एक दोन ओळींची चिठ्ठी तेवढी ठेवली... तिला यासागळ्याचाच राग आला होता. पण तिचा राग काय... तिच असणही प्रशांतनी रजिस्टर केल नव्हतं.

हताशपणे ती उठली आणि जाऊन झोपली. तिने प्रशांतच्या अंगावर हात ठेवला. पण झोपतच कुस बदलत तिच्या हातावर क्षणभर थोपटुन प्रशांत परत शांत झोपुन गेला.

त्या संध्याकाळनंतर मीनाक्षी खूप डिस्टर्ब झाली. आपल्या करियरमुळे आपण आपल्या संसाराला फारसा वेळ देत नाही आहोत हे तिला समजत होत... पण हे सत्य तिला स्विकारता येत नव्हतं. असाच एक एक दिवस जात होता.

एकदिवस प्रशांत संध्याकाळ आठ वाजताच घरी आला. पाहतो तर मीनाक्षीपण घरीच होती. तिला बघुन एकदम खुश झाला तो. दोघांच जेवण आटपल आणि दोघे गॅलरीमधे येऊन बसले. घराला गॅलरी असावी हा प्रशांतचाच आग्रह होता. पण आत्ता अस मोकळेपणी आकाशाकडे बघत असताना मीनाक्षीला देखील त्याचा आग्रह योग्यच होता अस वाटल. कारण तिथे प्रशांत बरोबर बसून तिला खूप बर वाटत होत.

"मिनु..." प्रशांतने हलकेच तंद्री लागलेल्या मीनाक्षीला हाक मारली.

"हम्.."

"डिस्टर्ब आहेस?" त्याने हलकेच तिचा हात हातात घेत विचारलं.

"नाही रे.. का?"

"असच. तू अशी इतक्या लवकर घरी येत नाहीस. चुकून आलिस तरी अशी गॅलरी मधे येण्यापक्षा एखाद्या कॉम्लीकेटेड केस चा अभ्यास करत बसतेस. म्हणून विचारल." प्रशांत तिच्याकडे बघत म्हणाला.

"अरे... आज लवकर आटपल म्हणून आले. इतकेच. रोज नाही ह येऊ शकणार." तिने त्याच्याकडे बघत आपला हात सोडवून घेतला आणि हसत म्हंटल. त्याच्या ओलावलेल्या भावूक आवाजामुळे ती उगाच सावध झाल्यासारखी झाली होती.

"मिनु एक विचारू?" प्रशांतने तिच्याजवळ सरकत म्हंटल. तिच सावरून बसण त्याच्या लक्षात आलं नव्हत.

"अरे अस विचारतोस काय? बोल न राजा..." मिनाक्षीने त्याचा हात धरत म्हंटल.

"मिनु आता सगळच् कस छान चालु आहे. We r very well settled too. तुला नाही का अस वाटत?" प्रशांत म्हणाला.

"अरे छान तर कायमच चालु होत आपल्. आजवर कधी कुठे प्रॉब्लम आला आहे का?" मुद्दाम विषय बदलायचा प्रयत्न करत मिनाक्षी म्हणाली. ती बेसावध असताना जणुकाही प्रशांतने तिला खिंडीत पकडले असल्याचा फील आला. "चल... झोपुया. कधी नव्हे ते लवकर झोपता येणार आहे आज." अस हसत म्हणत ती उठायला लागली.

प्रशांतने तिला हात धरून तिला परत बसवले. "मिनु किती दिवस अस टाळणार आहेस मला? तू हुशार आहेस. आतापर्यंत तुला माझ्या मनातले प्रश्न माझ्या डोळ्यातून दिसले नाहीत का?" त्याने अगदी मनापासून तिच्या नजरेत नजर अड़कवत विचारले.

"काय म्हणतो आहेस तू प्रशांत? आपण घरात आहोत. कसले नाटकातले डायलॉग्स मारतो आहेस..." मिनाक्षी उठायचा प्रयत्न करत तुटक आवाजात म्हणाली.

प्रशांत आत खोल कुठेतरी दुखावला. पण आज स्पष्ट बोलायचच् अस त्याने ठरवले होते. तिला बसवत त्याने स्पष्ट शब्दात विचारले.."मिनु तुला स्पष्ट हव आहे न... मग मला सांग आता आपण बाळाचा चान्स कधी घ्यायचा? आपण आता तिशीला आलो. सगळ छान आहे. मग काय हरकत आहे?"

"प्रशांत मी अजुन याचा विचार नाही केला." मीनाक्षी शांतपणे म्हणाली.

"मग आता कर. प्लीज... माझ्यासाठी... आपल्यासाठी... मिनु अग शिक्षण... करियर... याच्यापालिकडे देखिल आयुष्य आहे ग. अस काय करतेस? तुला नाही का वाटत आपल् बाळ असाव? अग तू स्वतः गायनकोलॉजिस्ट आहेस न ग?" प्रशांत काकुळतीला येऊन म्हणाला.

"प्रशांत मी गायनॅक आहे म्हणूनच आई होण्याचा विचार सध्यातरी माझ्या मनात नाही. तुला हे अस काय सुचत ते मला समजत नाही. तुला हव ते शिक्षण आणि उत्तम करियर सहज मिळाल आहे; म्हणून तुला याच्या पालिकडच् आयुष्य वगैरे दिसत आहे. ज्याना हुशारी असूनही काही मिळत नाही त्यांना विचार याच महत्व." मीनाक्षीच्या या वक्तव्यने मात्र प्रशांतला पुरत दुखावल.

त्याने मान खाली घातली आणि शांतपणे म्हणाला,"खर आहे तुझ; ज्याना हे सहज मिळत नाही त्यांना यासर्वाच खुप अप्रूप असेल. अगदी मान्य.पण मिनु तुला आणि मला देवाच्या दयेने सगळच कस सहज मिळाल आहे. मग आपण का नाही संसाराचा मुला-बाळांचा विचार करायचा?"

आता मात्र मिनाक्षीने प्रशांतला स्पष्टपणे सांगितल... "प्रशांत हे बघ... मला मुल नको आहे... निदान आत्ता... अजून काही वर्ष तरी. मला माझ काम अत्यंत प्रिय आहे. तेच माझ मुल आहे अस समज. त्यामुळे मी अजुन पुढचा विचार नाही केला."

अस म्हणून ती उठली आणि जाऊन बेड वर आडवी झाली. प्रशांत तिच्या या कोरडया उत्तराने खूप खूप दुखावला गेला. तिला संसारात... मुल होण्यात.... इंटरेस्ट नाही आहे हे त्याच्या लक्षात आल. त्याला मात्र एक छानस कौटुंबिक आयुष्य हव होत. तो तसाच तिथेच विचार करत बसून राहिला.

त्या दिवसानंतर दोघांमधे एक तणाव निर्माण झाला. दोघेही एकमेकांना टाळायला लागले. दोघानीही एकमेकांशी अबोला धरला. असेच अजुन काही दिवस गेले.

मिनाक्षीने स्वतः ला अजुनच गाढुन घेतले कामात. तिला खूपच उशीर होऊ लागला घरी यायला. अलीकडे ती यायच्या वेळी प्रशांत जेऊन गॅलरीमधे काहीतरी लिहित किंवा वाचत बसलेला असायचा. त्यांच्यात एकूणच संवाद नसल्याने ती तिच उरकुन झोपुन जायची. तो कधी झोपायचा... सध्या काय करतो आहे... याचा तिला काहीच पत्ता नव्हता. असेच काही दिवास गेले. प्रशांतने हॉस्पिटलमधून सुट्टी घेतली होती. त्याने स्वतःहून मीनाक्षीला ते सांगितल नव्हत. पण मात्र त्याने पंधरा दिवसांची सुट्टी घेतली आहे हे तिला त्याच्या हॉस्पिटल मधून समजल होत. तिने त्याविषयी ही त्याला काहीच विचारल नव्हत. कारण जर त्याने परत भाऊक होत संसार आणि  मुल होण्याबद्धलचा विषय काढला असता तर या वेळी परत काय उत्तर द्यायचे असा तिला प्रश्न पडला होता.

एक दिवस ती नेहमीप्रमाणे घरी आली, पण घर बंद होते. डायनिंग टेबलावर परत एकदा चिठ्ठी होती... 'उशीर होईल. वाट बघू नये.' त्यादिवशी मात्र तिचा बांध फुटला. खूप खूप रडली मिनाक्षी आणि तशीच न जेवता झोपुन गेली. सकाळी तिला उशिराच जाग आली. प्रशांत घरात दिसत नव्हता. तिने स्वतःचा चहा करून घेतला आणि पेपर उघडला. दुसऱ्याच पानावरची बातमी वाचून मिनाक्षीला मोठ्ठा धक्का बसला. एका नविन नाटकाचा शुभारंभ झाला होता... आणि नाटकाच्या डायरेक्टरच नाव डॉ. प्रशांत प्रधान होत. प्रशांतच्या स्तुतीने रकानेच्या रकाने भरले होते.  M. D. सर्जन असणा-या प्रशांतच्या 'सर्जनशीलतेचे' खूप कौतुक केले होते.

मिनाक्षीने प्रशांतला फोन लावला. पण त्याने उचलला नाही. 'म्हणजे गेले काही दिवस तो रात्र रात्र नाटकाचा अभ्यास करत होता तर!' तिच्या मनात विचार आला. तिला खूप असहाय्य, हताश वाटायला लागल. भयंकर राग आला... पण नक्की कोणाचा राग आला आहे हे मात्र तिला समजत नव्हतं. स्वतःचा की प्रशांतचा की एकूण परिस्थितीचा! तिने तशीच तयारी केली आणि ती हॉस्पिटलमधे गेली. दिवसभर लोक तिच्याकडे प्रशांतच कौतुक करत होते आणि त्यांच्यासाठी अभिनंदनाचा निरोप देत होते. का कोण जाणे... पण तिला तेसर्व आवडत नव्हतं.

ती त्यादिवशी कधी नव्हे ते हॉस्पिटलमधुन लवकर निघाली. मिनाक्षी घरी पोहोचली. प्रशांतने तिचे हसत-हसत स्वागत केले. "कस वाटल सरप्राइज?" त्याने तिला विचारल.

"सरप्राइज? मूर्खपणा आहे हा. अरे प्रशांत तू डॉक्टर आहेस. एक नावाजलेला डॉक्टर! हा काय खुळचटपणा लावला आहेस? हे अस अचानक नाटकाच डायरेक्शनच काय सुचल तुला? आणि मला अजिब्बात कल्पना दिली नाहीस? मी तुझी कोणी आहे की नाही? आज अचानक न्यूज़ पेपर मधून मला समजल. कमाल करतोस तू. दिवसभर लोकांना तोंड देऊन कंटाळले आहे. हे अस परस्पर कस करू शकलास तू?" मीनाक्षी चिडून प्रशांतवर ओरडत होती. तिच तिला भान नव्हतं.

प्रशांतने तिचा हात धरून तिला बसवल आणि शांतपणे विचारल,"मीनाक्षी तुला नक्की कसला राग आला आहे? मी तुला न सांगितल्याचा? की मी नाटक डायरेक्ट केल त्याचा?"

"मला तुझाच राग आला आहे. मला काय खेळण समजतोस का? तुझ्या आयुष्यात काय चालल आहे हे तू आता मला सांगणारही नाहीस का? मला न्यूज़ पेपर्स मधून आणि लोकांकडूनच जर तुझ्याबद्दल समजणार असेल तर मग आपण एकत्र का राहायच प्रशांत? Its better we separate. Even otherwise i have realized that my way of life and your way of life is different. Let's get divorced prashant." एवढ़ बोलून त्याच्या हातातला हात झटका देऊन सोडवून मीनाक्षी बेडरूममधे गेली. तिने रागाच्या भरात स्वतः ची बॅग भरली आणि तशीच उलट पावली ती तिच्या आई-वडिलांकडे निघुन गेली. प्रशांत अवाक् होऊन सर्व बघत बसला.

त्यानंतर अगदीच अनपेक्षित घटना घडत गेल्या. अगदी अचानक! मिनाक्षीने डिवोर्स फ़ाइल केला. प्रशांतला नोटिस आली तेव्हा तर तो चक्रावून गेला. थोड़ तिच्या मनाविरुद्ध झाल आहे म्हणून चिडली आहे, असच त्याच मत होत. शांत झाली की येईल घरी अस त्याच मत होत. तिला थोडा वेळ दिला पाहिजे, असा विचार करून तो तिच्या मागे गेला नव्हता. पण ती गेल्याच्या आठवद्याभरात एकदम डिवोर्स नोटिस बघुन तो हड़बड़ला. घाईघाईने तिच्या आई-वडिलांच्या घरी त्याच्या लाडक्या मिनुला समजावायला तो गेला. पण मिनाक्षीने भेटायला स्पष्ट नकार दिला. ती एकदाही त्याच्यासमोर एकटीने आली नाही. त्यानंतर होणा-या प्रत्येक councelling सेशनमधे ती काहीच बोलायची नाही."आमच जमत नाही आणि जमणार ही नाही. त्याचे आयुष्य जगण्याचे विचार आणि माझे विचार वेगळे आहेत.." एवढ़च आणि इतकंच ती कायम म्हणायची. प्रशांतने सुरवातीला तिला समजावण्याचा खूप पर्यंत देखील केला. पण तिने तिचा निर्णय घेतला आहे हे त्याच्या लक्षात आल आणि  मग मात्र त्याने फार ताणल नाही.

मुळात मीनाक्षीने घेतलेला निर्णय तो कायमच मान्य करत आला होता. फक्त एकदाच त्याने स्वतःचा असा वेगळा निर्णय घेतला होता. नाट्य दिग्दर्शनाचा!  तेही स्वतःच्या मनाच एकून. पण त्यामुळे त्याची मिनू त्याच्यापासून दूर गेली होती. मनातून तो खूप निराश झाला होता. दुखावला गेला होता. आता परत त्याला तिला दुखवायचं नव्हत. ती म्हणेल ते मान्य करायचं त्याने ठरवलं होत. त्यामुळे याही वेळी त्याने तेच केल. म्यूच्यूअल अक्ससेप्टन्स मुळे त्यांचा डिवोर्स पटकन झाला. मीनाक्षी फ़क्त एकदाच घरी आली होती; तिच सामान घ्यायला आणि ते ही तिचे वकील घेऊन. त्याचवेळी त्याला समजल की तिला त्याच्याशी काहीच बोलायची इच्छा नाही. मग त्यानेदेखील काही प्रयत्न केला नाही. ती तिच्या वस्तू गोळा करत होती आणि तो एका बाजूला बसून शांतपणे तिच्या हालचाली बघत होता. तिने तिच्या अशा सगळ्या गोष्टी अगदी आठवणीने गोळा करून नेल्या. त्याला त्याच्या आठवणींमध्ये जपून ठेवता येईल अस काहीही तिने तिथे ठेवल नाही.

त्यानंतर मात्र ती कायमची पुण्याला शिफ्ट झाली. तिने आयुष्यात काय निर्णय घेतला आहे, किंवा काय करणार आहे याचा प्रशांतला थांगपत्ताही लागू न देता ती त्याच्या शहरातून आणि आयुष्यातून कायमची निघून गेली.

............12 वर्ष.... एक तप! आयुष्याची अनेक वळणं त्यानंतर प्रशांतने बघितली! त्याने उत्तम चालणारी डॉक्टरी सोडली. नाट्य-सिने क्षेत्रात खूप नाव कमावल. नंतर त्याने लग्न देखील केल होत. त्याला दोन जूळी मूलं देखील होती. अर्थात त्याने  कधीही मिनाक्षीची चौकशी केली नव्हती. त्यामुळे ती आता काय करते ते त्याला माहीत नव्हत.

आणि आज समोर उभी असलेली मीनाक्षी. थोड़े केस पांढरे झाले होते आणि चष्मा लागला होता इतकेच. बाकी तिच्यात काहीच बदल नव्हता. तशीच ताठ.... आत्मविश्वासाने भरलेली नजर!

"हाय! कशी आहेस.... अं! मीनाक्षी?" प्रशांतने विचारले.

"अरे? प्रशांत तू? मस्त दिसतोस की! मी मजेत..." मिनाक्षीने हसत उत्तर दिल.

दोघांचीही परिस्थिति अवघडल्यासारखी झाली होती. बारा वर्षानंतर दोघे भेटत होते. ते ही शाळेच्या दहावीच गेटटूगेदर ठरल होत... वर्गाच पंचविसाव्या वर्षातील पदार्पण... म्हणून. प्रशांतचा पूर्ण पुढाकार त्यात नक्की असणार याची मीनाक्षीला कल्पना होती. 'आयुष्याची बारा वर्षे सतत एकत्र काढल्यानंतर पुढची बारा वर्षे एकमेकांचे तोंडही न बघणे... काय ही नाशिबाची चेष्टा होती.' प्रशांतच्या मनात आल.

गेट टुगेदर छान झाल. प्रत्येकाने आपण आता काय करतो आहोत ते सांगितल. मिनाक्षीने फ़क्त पुण्याला असते आणि डॉक्टर असल्याने तेच काम करते; असे हसत सांगितले.

अनेकांना प्रशांत-मीनाक्षी आता एकत्र नाहीत ते माहीत होत. प्रशांत सेलिब्रिटी होता. त्यामुळे त्याच्याबद्धल कायम लिहून यायच कुठे ना कुठे. त्यामुळे समंजसपणे कोणीच काहीही विचारल नाही. कार्यक्रमच्या शेवटी जेवण होत. हळू हळू एक एक जण जेवायला उठले. प्रशांत मीनाक्षी जवळ आला.

"जेवलीस?" त्याने विचारले.

"नाही रे... जेवेन." ती म्हणाली.

"आजच परत जाणार का पुण्याला?"

"नाही. रहाणार आहे. हॉटेल बुक केल आहे."

"अग कमाल करतेस. घरी का नाही आलीस? हॉटेल वगैरे काही नाही... तू आपल्या घरी चल." प्रशांत म्हणाला.

"प्रशांत... आपल्या घरी?" मीनाक्षी त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली. आणि तो एकदम शांत झाला.

"बर... मला हॉटेल वर सोडशील का?" तिने मूड हलका करत विचारले आणि तो लगेच हो म्हणाला. कार्यक्रम आटपला. सगळे एक-एक करून निघाले. तसे प्रशांत आणि मीनाक्षी देखिल निघाले. गाडीत दोघेही शांत होते. हॉटेल आल. मिनाक्षीने प्रशांतकड़े वळून विचारल,"कॉफ़ी घेऊया? वेळ आहे तुला?"

"हो..." घड्याळाकडे नजर टाकत तो म्हणाला.

दोघेही हॉटेलच्या कॉफ़ी शॉप मधे आले. एका कोप-यातल्या टेबलवर बसले.

प्रशांत थोड़ा गोंधळला होता. मीनाक्षी काही वेळ शांत होती. मग तिने प्रशांतला हाक मारली.

"प्रशांत.."

"ह?"

"कसा आहेस तू?"

"मिनु..." जणूकाही तिच्या या प्रश्नाची वाट बघत असल्यासारखा प्रशांत एकदम म्हणाला. मग मात्र स्वतःला सावरून म्हणाला,"I mean... मीनाक्षी... खर सांगू? मी खूप समाधानी आहे ग. आपण वेगळे झाल्यानंतर अनेक महिने मी दु:खात होतो. कोणाला भेटत नव्हतो... कोणाशीही बोलत नव्हतो.... पण मग कधीतरी परत एकदा एका नाटकाच्या दिग्दर्शनाची ऑफर आली. मी इच्छा नसूनही ते काम घेतल आणि जणूकाही माझ जगच बदलून गेल. मग मात्र मी कधी मागे वळून नाही ग बघितल. मी तुझ्यात खूप गुंतलो होतो. तुझी सवय होती मला. आयुष्यात तू निर्णय घेणार आणि मी तुझ्याबरोबर चालणार; असाच मला कायम वाटत होत. पण अचानक हे सगळ बदलल. तू बदलवलस. मी एकटा पडलो. पण हळूहळू माझ्या लक्षात आल की  रडत आणि दु:ख करत जगण ये आयुष्य नाही. म्हणून मग मी माझ्यासमोर जे आयुष्य आल ते हसत स्वीकारलं. खरच! आज तू समोर आलीस आणि मला आपण एकत्र घालवलेला काळ एखाद्या चित्रपटासारखा डोळ्यासमोर उभा राहिला एवढच. पण नाहीतर मी डॉक्टरी शिकलो आहे आणि आता प्रक्टिस करत नाही याच मला कधीच दु:ख झाल नाही." प्रशांत अपराधी आवाजात म्हणाला.

मीनाक्षी शांतपणे प्रशांतच बोलण ऐकत होती. तिने प्रशांतच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाली, "प्रशांत तू अपराधी वाटून घेऊ नकोस. खर सांगू? मी कायम तुझ्याबद्धल वाचत असते. पण केवळ तू कसा आहेस ते समजाव म्हणून. मला तुझ्या इंटरव्यूज मधून जाणवत की आपल्यात जे घडून गेल आहे त्याबद्दल तू कुठेतरी स्वतः ला अजूनही दोष देतोस. अस आहे का प्रशांत?" मिनाक्षीने त्याला विचारल.

"हो मिनु. मी खरच तुझ्यावर खूप प्रेम केल होत. कुठे आणि काय चुकल मला कळलच नाही. तुझ्यासारखी समंजस, विचारी मुलगी; जिने आयुष्यभर सगळ कस विचारपूर्वक केल; इतक्या तड़का-फड़की असा टोकाचा निर्णय घेईल अस कधी वाटल नव्हतं ग. तू तर एक घाव आणि दोन टुकड़े अस केलस. मी किती भेटायचा प्रयत्न केला तुला. पण तू कधीच भेटली नाहीस मला एकदा घर सोडून गेल्यावर." प्रशांत म्हणाला.

"प्रशांत... मला मान्य आहे की मी जे केल ते त्यावेळी योग्य नव्हतं. त्यावेळी मी तुला काहीच न सांगता निर्णय घेतला. जसा कायम मी आपल्या दोघांसाठी घेत आले तसाच. मात्र आज मी तुला त्याच कारण सांगते... जेव्हा नाटकाचा डायरेक्टर म्हणून तुझ नाव मी पेपरमधे वाचल तेव्हा त्याक्षणी मला खूप राग आला. मला न सांगता... माझ मत विचारात न घेता... तू आयुष्यात पहिल्यांदाच एक वेगळ पाऊल उचलल होतस. त्यावेळी मला तो माझा अपमान वाटला. मी तशीच घर सोडून गेले. पण मग आईकडे गेल्यावर आणि मन शांत झाल्यावर माझ्या लक्षात आल की डायरेक्शन हा तुझा स्वतः चा चॉइस होता. आयुष्यात पहिल्यांदाच तू स्वतःच्या मनाने एक निर्णय घेतला होतास. तोवर मीच दोघांच्या आयुष्याचे निर्णय घेत आले होते. कदाचित् आपण एकत्र राहिलो असतो तर तू तुला आवडणाऱ्या या क्षेत्राचा विचारही केला नसतास. कदाचित् आपण कायम भांडत... एकमेकांना दुखवत एकत्र राहिलो असतो. प्रशांत... मला न टिपिकल संसार करायची फारशी इच्छाच नव्हती. तुझ्यापासून दूर झाले आणि तुझा आणि माझा असा वेगळा विचार केला तेव्हा माझ्या लक्षात आल की तू फ़क्त माझ्यावर प्रेम करत होतास. आणि मी मात्र कायम माझ्या करियरचा विचार केला होता. तू हुशार होतास आणि माझ एकायचास म्हणून मी माझ्या बरोबर तुझे देखिल निर्णय घेत होते; इतकंच. मला देखील त्याची सवय झाली होती. मुळात मला संसार करायची इच्छा नाही आणि तुला मात्र हे सगळच मनापासून हव आहे; जेव्हा हे लक्षात आल तेव्हा मग मी निर्णय घेतला की आपण वेगळ होण दोघांसाठी योग्य आहे.

आणि बघ न... आज तू तुला आवडत ते करतो आहेस. अगदी मनापासून! खूप यशस्वी आहेस. लग्न केल आहेस. छान गोंड्स मूलं आहेत. सुखी आहेस. याचा मला खूप खूप आनंद आहे. आणि एक गोष्ट; अगदी प्रामाणिकपणे सांगते... मी पण खूप सुखी आहे. पूना मेडिकल कॉलेजची डीन आहे. कॉलेज मध्ये शिकवते आहे, अवघड ऑपरेशनस एक चालेंज म्हणून करते आहे. यासगळ्याच जे कौतुक होत ते मनापासून एन्जोय करते आहे. मला जे हव होत ते मी मिळवल आहे.

मग का उगाच भूतकाळाच् ओझ मनावर बाळगायच? प्रशांत खरच असाच पूर्णत्वाने जग. आपण दोस्त होतो. आणि राहु. असच कधीतरी भेटु. एखादी कॉफ़ी घेऊ... आणि आपण स्वतः च्या मनाने निवडलेल आयुष्य परिपूर्णपणे जगु. हो न?" मिनाक्षी बोलायची थांबली.

प्रशांतला तिच म्हणण अगदी पटल. अगदी पूर्वी देखील जस ती जे म्हणायची ते पटायचं तस; आणि ते मनात येऊन तो मनापासून हसला. दोघेही उठले. एकमेकांना शेक हॅंड केल.  मीनाक्षीने त्याच्या खांद्यावर थोपटलं आणि मागे वळून चालू लागली. आत्माविशावासाने आणि शांतपणे जाणाऱ्या मिनाक्शीकडे बघून प्रशांतला खूप बर वाटल. आज त्याला त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली होती. मीनाक्षीच्या पाठमोऱ्या व्यक्तिमत्वाकडे बघताना तो भारावून गेला आणि शांत मनाने त्याच्या घराकडे निघाला.


समाप्त
--------------------------------------------------------------------------------