भाग 3
हळूहळू दिवस पुढे सरकत होते. लग्नाला तीन वर्षे देखिल झाली. अलीकडे मीनाक्षी घरी वेळेत येऊ शकायची नाही. तिने एक उत्तम गायनॅक म्हणून अत्यंत थोड्या अवधित नाव मिळवले होते. तिच्या पेशंट्स तिनेच तपासावे म्हणून तिची वाट पाहात उशिरापर्यंत थांबायच्या. अशा प्रेग्नेंट बायकांना दुस-याकोणावर सोडायला मीनाक्षीचीही तयारी नसायची. अनेकदा इमर्जंसीज देखिल अनेक असायच्या. त्यामुळे तिला हॉस्पिटलमधेच राहावे लागायचे. त्यामानाने ओर्थपेडीक झालेल्या प्रशांतला अपॉइंटमेंट घेऊन पेशंट्स भेटायला येत. त्याचेदेखिल हळूहळू नाव व्हायला लागले होते. तो भारतातील सर्वात मोठ्या ऑर्थो सर्जनना असिस्ट करत होता. पण फक्त पेशंट्सना तपासणे इतकेच आयुष्य जगणारा प्रशांत नव्हता. दोघेही डॉक्टर असल्याने त्या प्रोफेशनमधे द्यावा लागणारा वेळ.. इमार्जनसीज... सगळ्याची दोघानाही कल्पना होती. दोघेही आपापल्या कामात खुश होते.... आणि तरीही काहीतरी कुठेतरी गड़बड़ होती.
अनेकदा प्रशांत घरी वेळेत यायचा. पण मिनाक्षीला उशिर होत असे. ती घरी खूप दमुन येत असे. प्रशांतने जर कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन केला असला तर 'दमले आहे', अस म्हणून ती तो हाणून पाडायची. पण 'एमर्जंसी आहे,' असा कॉल आला तर आहे तशीच पळायची. तिच इमर्जन्सीला जाणं प्रशांतला मान्यच होत... पण त्याला मीनाक्षीचा वेळ हवासा वाटायचा... तो मात्र ती त्याला देत नव्हती. मुळात मीनाक्षीने लहानपणापासून डॉक्टर बनण्याचे स्वप्न बघितले होते. प्रशांतने कधी असा प्लॅन केला नव्हता. हुशार होता आणि यश मिळत गेल मिनक्षीची सोबत होती, म्हणून तो डॉक्टर झाला होता. त्यामुळे दोघांचाही त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता.
प्रशांतला नाटकं बघायला जायची खूप इच्छा असायची. गाण्याचे कार्यक्रम. विविध फेस्टिवल्सला जावस वाटायच. पण मिनाक्षीला जमायच नाही. सुरवातीला त्याची चिडचिड व्हायची. पण मग त्याने तिच न येण स्वीकारलं आणि एकट्याने जायला सुरवात केली. मिनाक्षीला थोड़ वाईट वाटल. पण ती काही बोलली नाही. कारण एकतर त्यांचा वाद झाला असता आणि मुख्य म्हणजे... तो एकटा जायला लागल्यापासून तिला सूटल्यासारख वाटायला लागल होत. हे वाटण योग्य की अयोग्य याचा त्यावेळी तिने विचारही केला नव्हता.
एका शनिवारी ती घरी लवकर आली. त्याचं त्यादिवशी एक नाटक बघायला जायच ठरल होत. प्रशांतचा हॉस्पिटलमधे फोन देखिल आला होता.पण ती तो घेऊ शकली नव्हती. त्याला वाईट वाटल असणार हे तिला लक्षात आल होत; त्यामुळे तर ती ठरलेल्या वेळेच्या अगोदर घरी पोहोचली होती. पण प्रशांत घरी नव्हता. डायनिंग टेबलावर एक छोटी चिठ्ठी होती. 'उशीर होईल. जेउन येणार आहे. तू वेळेत झोप. मी घराच्या किल्या घेऊन गेलो आहे.'
चिठ्ठीला मायना नव्हता. खाली नाव नव्हतं. बस एक मजकूर... काही शब्द! ती चिठ्ठी वाचून मिनाक्षी मटकन खुर्चीत बसली. प्रशांत माझी वाट न बघताच गेला? खर तर मी आज ठरलेल्या वेळेच्या लवकर आले आहे. तरीही तो नाही? म्हणजे त्याने हे ठरवूनच टाकल होत की मी येणार नाही आहे. ती चिडली... हिरमूसली.... आणि तिथेच डायनिंग टेबलावर विचार करत बसली.
'कुठेतरी काहीतरी चुकत आहे. तो असा कसा मला सोडून एकटाच नाटकाला जाऊ शकतो? ठरल होत न आपण एकत्र जाऊ या अस. मग का नाही थांबला तो माझ्यासाठी?' मीनाक्षीच एक मन विचार करत होत. त्याचवेळी दूसर मन तिच तिला उत्तर देत होत... 'जेव्हा त्याने पहिल्यांदा एकट्याने जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा तू त्याला थंबवल नाहीस न? उलट तुला सुटल्या सारख वाटल होत... विसरलिस? मग आता का ही चिडचिड? आणि त्यातही आत्ता जर तुला काही इमरजेंसी आली तर तू हॉस्पिटलला जाणारच आहेस ना?'
'पण मग ते माझ कर्तव्य नाही का?' पहिल मन.
'इमर्जन्सी आली तरी तुझ्या एवजी पर्याय खरच नाही का हॉस्पिटलमध्ये? डॉक्टर्सनी त्यांच्या प्रोफेशनला प्रामाणिक असलच पाहिजे. तुला तुझ काम सर्वात जास्त प्रिय आहे. पण मुख्य म्हणजे प्रशांतसाठी तुझ काही कर्तव्य किंवा प्रेम आहे की नाही?' दुस-या मनाने सवाल केला.
'हो... पर्याय आहे हॉस्पिटलला. पण मला माझ काम खूप जास्त प्रिय आहे. माझ लहानपणापासूनच स्वप्न होत... एकच धेय.... खूप मेहेनत घेतली आहे मी त्यासाठी. आज काम करताना प्रत्येक क्षण मी एन्जॉय करते. This is what i wanted all my life! प्रशांतवर माझ प्रेम आहेच; पण माझ काम माझ पहिल प्रेम आहे' पहिल्या मनाने उत्तर दिल.
'हो न? मग आता तुला राग का आला आहे? तुझ पाहिलं प्रेम जर तुझ काम आहे तर कदाचित नाटकाला जाणं ही प्रशांतची गरज आहे. तुझ्या प्रायॉरिटीमधे प्रशांत... त्याची स्वप्न... हे कधी होत का? आजही तुला नक्की दुःख कसल झाल आहे? तो न थांबल्याच् की तुझा विचार न करता तो गेल्याच? मीनाक्षी... हीच खरी वेळ आहे. तू निट विचार करायला हवा आहेस. लग्नाला तीन वर्ष झाली आहेत. प्रशांतच्या डोळ्यात तुला संसार आणि एखाद मुलाची अपेक्षा दिसत नाही का? तू याचा काही विचार केला आहेस का?' दुस-या मनाच्या या प्रश्नांच्या भडीमाराने मिनाक्षी गळून गेली.
तिने खरच संसार.. मुलं... यासगळ्याचा विचारच केला नव्हता. शाळेत असल्यापासून ऐकत्र असल्याने तिला प्रशांतच्या असण्याची सवय झाली होती. त्यामळे शिक्षण संपल्यावर आई-वडिलांनी लग्नाचा विषय काढला तेव्हा तिने 'मी प्रशांतशी लग्न करणार आहे;' अस म्हणून तिच्यापुरता तो प्रश्न सोडवून टाकला होता. त्याच कारण देखील तसच होत. आजवर ती म्हणेल ते प्रशांत एकत आला होता... मान्य करत आला होता. त्यामुळे तिला खात्री होती की प्रशांत देखील लगेच लग्नाला तयार होईल. नवीन व्यक्तीबरोबर लग्न करून परत एकमेकांची सवय होईपर्यंत थांबण्याची तिला इच्छा नव्हती. म्हणून तिने प्रशांतशी लग्न केले होते. त्यावेळी तिला त्याच्याकडून कोणतेही प्रश्न येतिल किंवा त्याचा तो काही निर्णय घेईल याची अपेक्षा नव्हती. त्यामुळेच आतापर्यंत त्यांचा संसार सरळ सुरळीत चालू होता. पण अलीकडे तो तिला म्हणायचा..,"मिनु किती धावणार आहेस? आता थोड़ जगुया ना! मला तुला काहीतरी सांगायचं आहे...." पण मिनक्षीने कधी हसून.. तर कधी दमले आहे म्हणून त्याच बोलण थांबवाल होत... त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केल होत.
आज मात्र प्रशांत तिच्यासाठी नाटकाला जायचा थांबला नाही; या एका लहानशा घटनेने तिच तिलाच विचारात टाकल होत. तिला पटत होत की तिच कुठेतरी चुकत आहे; पण तिला ते मान्य करायच नव्हतं. विचार करता-करता तिला तिथेच टेबलाजवळ झोप लागली. मेन डोर उघडण्याच्या आवाजाने तिला जाग आली.
"अरे, मिनु तू इथे अशी अवघडून का बसली आहेस? असा अंधार का आहे घरात?" प्रशांतने दिवे लावत तिला विचारले.
"प्रशांत आपल् एकत्र जायच ठरल होत न? मग तू असा कसा गेलास एकटाच?" मिनाक्षीने त्याच्या बोलण्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करत एकदम भांडण्याचा पवित्रा घेतला. तिला तिच्या मनातल्या विचारांपासून दूर जायच होत. त्यावर एकच उपाय होता... प्रशांतला कोर्टात उभ केल्याप्रमाणे प्रश्न विचारायचे .. आणि ती तेच करत होती.
"अग, मी तुला तेच तर सांगायला कॉल केला होता. पण तू घेऊ शकली नाहीस." प्रशांत जाम खुशीत होता. त्याच मिनाक्षीकडे लक्षच नव्हतं. "ओळख बघू मला कोणाचा फोन आला असेल? अग, तुला रेश्मा आठवते? अकरावी, बारावी मधे आपल्याच बरोबर होती. दोन्ही वर्ष नाटकाची हिरोईन होती... तिचा मला आज अचानक फोन आला होता. मिनु अग आजच्या नाटकाची हिरोईन पण तिच होती. तिला समजल मी नाटक बघायला येणार आहे तर तिने लवकर येण्याचा आग्रह केला. तुला माहित आहे; बारावी नंतर तिने साध बी. एससी. केल. तिला त्याच काळात लक्षात आल म्हणे की अभिनय हिच तिची आवड आहे. मग तिने कॉलेज बदलल. जिथुन नाटकं आणि स्पर्धात्मक कार्यक्रम जास्त होते अशा कॉलेजला अडमिशन घेतली. मेहेनत घेतली. आणि आता एक उत्तम नटी म्हणून तिने नाव कमवल आहे. कमाल आहे न?"
काय बोलाव मिनाक्षीला सुचेना. कारण तिच्या चिडण्याचा प्रशांतवर काहीही परिणाम झालेला नाही हे तिच्या लक्षात आल होत. तिने फ़क्त ""हम्" एवढाच प्रतिसाद दिला आणि गप्प बसली. पण आज प्रशांतच एकूण लक्षच नव्हतं. "दमली आहेस का? मग उगाच जागु नकोस ह. जेउन घे अन् झोप वेळेत. माझ जेवण झाल आहे. दमलो पण आहे. उद्या थोड लवकर पण निघायचं आहे त्यामुळे मी झोपायला जातो. गुड नाईट." प्रशांत आपल्याच तंद्रित बोलत बोलत आत गेला आणि कपडे बदलून पाच मिनिटांत झोपला देखिल. मिनाक्षीला खरतर खूप भांडायच होत... तो तिला सोडून आणि तिची वाट न बघता एकटाच नाटकाला गेला... बाहेर जेवून आला... एक दोन ओळींची चिठ्ठी तेवढी ठेवली... तिला यासागळ्याचाच राग आला होता. पण तिचा राग काय... तिच असणही प्रशांतनी रजिस्टर केल नव्हतं.
हताशपणे ती उठली आणि जाऊन झोपली. तिने प्रशांतच्या अंगावर हात ठेवला. पण झोपतच कुस बदलत तिच्या हातावर क्षणभर थोपटुन प्रशांत परत शांत झोपुन गेला.
त्या संध्याकाळनंतर मीनाक्षी खूप डिस्टर्ब झाली. आपल्या करियरमुळे आपण आपल्या संसाराला फारसा वेळ देत नाही आहोत हे तिला समजत होत... पण हे सत्य तिला स्विकारता येत नव्हतं. असाच एक एक दिवस जात होता.
एकदिवस प्रशांत संध्याकाळ आठ वाजताच घरी आला. पाहतो तर मीनाक्षीपण घरीच होती. तिला बघुन एकदम खुश झाला तो. दोघांच जेवण आटपल आणि दोघे गॅलरीमधे येऊन बसले. घराला गॅलरी असावी हा प्रशांतचाच आग्रह होता. पण आत्ता अस मोकळेपणी आकाशाकडे बघत असताना मीनाक्षीला देखील त्याचा आग्रह योग्यच होता अस वाटल. कारण तिथे प्रशांत बरोबर बसून तिला खूप बर वाटत होत.
"मिनु..." प्रशांतने हलकेच तंद्री लागलेल्या मीनाक्षीला हाक मारली.
"हम्.."
"डिस्टर्ब आहेस?" त्याने हलकेच तिचा हात हातात घेत विचारलं.
"नाही रे.. का?"
"असच. तू अशी इतक्या लवकर घरी येत नाहीस. चुकून आलिस तरी अशी गॅलरी मधे येण्यापक्षा एखाद्या कॉम्लीकेटेड केस चा अभ्यास करत बसतेस. म्हणून विचारल." प्रशांत तिच्याकडे बघत म्हणाला.
"अरे... आज लवकर आटपल म्हणून आले. इतकेच. रोज नाही ह येऊ शकणार." तिने त्याच्याकडे बघत आपला हात सोडवून घेतला आणि हसत म्हंटल. त्याच्या ओलावलेल्या भावूक आवाजामुळे ती उगाच सावध झाल्यासारखी झाली होती.
"मिनु एक विचारू?" प्रशांतने तिच्याजवळ सरकत म्हंटल. तिच सावरून बसण त्याच्या लक्षात आलं नव्हत.
"अरे अस विचारतोस काय? बोल न राजा..." मिनाक्षीने त्याचा हात धरत म्हंटल.
"मिनु आता सगळच् कस छान चालु आहे. We r very well settled too. तुला नाही का अस वाटत?" प्रशांत म्हणाला.
"अरे छान तर कायमच चालु होत आपल्. आजवर कधी कुठे प्रॉब्लम आला आहे का?" मुद्दाम विषय बदलायचा प्रयत्न करत मिनाक्षी म्हणाली. ती बेसावध असताना जणुकाही प्रशांतने तिला खिंडीत पकडले असल्याचा फील आला. "चल... झोपुया. कधी नव्हे ते लवकर झोपता येणार आहे आज." अस हसत म्हणत ती उठायला लागली.
प्रशांतने तिला हात धरून तिला परत बसवले. "मिनु किती दिवस अस टाळणार आहेस मला? तू हुशार आहेस. आतापर्यंत तुला माझ्या मनातले प्रश्न माझ्या डोळ्यातून दिसले नाहीत का?" त्याने अगदी मनापासून तिच्या नजरेत नजर अड़कवत विचारले.
"काय म्हणतो आहेस तू प्रशांत? आपण घरात आहोत. कसले नाटकातले डायलॉग्स मारतो आहेस..." मिनाक्षी उठायचा प्रयत्न करत तुटक आवाजात म्हणाली.
प्रशांत आत खोल कुठेतरी दुखावला. पण आज स्पष्ट बोलायचच् अस त्याने ठरवले होते. तिला बसवत त्याने स्पष्ट शब्दात विचारले.."मिनु तुला स्पष्ट हव आहे न... मग मला सांग आता आपण बाळाचा चान्स कधी घ्यायचा? आपण आता तिशीला आलो. सगळ छान आहे. मग काय हरकत आहे?"
"प्रशांत मी अजुन याचा विचार नाही केला." मीनाक्षी शांतपणे म्हणाली.
"मग आता कर. प्लीज... माझ्यासाठी... आपल्यासाठी... मिनु अग शिक्षण... करियर... याच्यापालिकडे देखिल आयुष्य आहे ग. अस काय करतेस? तुला नाही का वाटत आपल् बाळ असाव? अग तू स्वतः गायनकोलॉजिस्ट आहेस न ग?" प्रशांत काकुळतीला येऊन म्हणाला.
"प्रशांत मी गायनॅक आहे म्हणूनच आई होण्याचा विचार सध्यातरी माझ्या मनात नाही. तुला हे अस काय सुचत ते मला समजत नाही. तुला हव ते शिक्षण आणि उत्तम करियर सहज मिळाल आहे; म्हणून तुला याच्या पालिकडच् आयुष्य वगैरे दिसत आहे. ज्याना हुशारी असूनही काही मिळत नाही त्यांना विचार याच महत्व." मीनाक्षीच्या या वक्तव्यने मात्र प्रशांतला पुरत दुखावल.
त्याने मान खाली घातली आणि शांतपणे म्हणाला,"खर आहे तुझ; ज्याना हे सहज मिळत नाही त्यांना यासर्वाच खुप अप्रूप असेल. अगदी मान्य.पण मिनु तुला आणि मला देवाच्या दयेने सगळच कस सहज मिळाल आहे. मग आपण का नाही संसाराचा मुला-बाळांचा विचार करायचा?"
आता मात्र मिनाक्षीने प्रशांतला स्पष्टपणे सांगितल... "प्रशांत हे बघ... मला मुल नको आहे... निदान आत्ता... अजून काही वर्ष तरी. मला माझ काम अत्यंत प्रिय आहे. तेच माझ मुल आहे अस समज. त्यामुळे मी अजुन पुढचा विचार नाही केला."
अस म्हणून ती उठली आणि जाऊन बेड वर आडवी झाली. प्रशांत तिच्या या कोरडया उत्तराने खूप खूप दुखावला गेला. तिला संसारात... मुल होण्यात.... इंटरेस्ट नाही आहे हे त्याच्या लक्षात आल. त्याला मात्र एक छानस कौटुंबिक आयुष्य हव होत. तो तसाच तिथेच विचार करत बसून राहिला.
त्या दिवसानंतर दोघांमधे एक तणाव निर्माण झाला. दोघेही एकमेकांना टाळायला लागले. दोघानीही एकमेकांशी अबोला धरला. असेच अजुन काही दिवस गेले.
मिनाक्षीने स्वतः ला अजुनच गाढुन घेतले कामात. तिला खूपच उशीर होऊ लागला घरी यायला. अलीकडे ती यायच्या वेळी प्रशांत जेऊन गॅलरीमधे काहीतरी लिहित किंवा वाचत बसलेला असायचा. त्यांच्यात एकूणच संवाद नसल्याने ती तिच उरकुन झोपुन जायची. तो कधी झोपायचा... सध्या काय करतो आहे... याचा तिला काहीच पत्ता नव्हता. असेच काही दिवास गेले. प्रशांतने हॉस्पिटलमधून सुट्टी घेतली होती. त्याने स्वतःहून मीनाक्षीला ते सांगितल नव्हत. पण मात्र त्याने पंधरा दिवसांची सुट्टी घेतली आहे हे तिला त्याच्या हॉस्पिटल मधून समजल होत. तिने त्याविषयी ही त्याला काहीच विचारल नव्हत. कारण जर त्याने परत भाऊक होत संसार आणि मुल होण्याबद्धलचा विषय काढला असता तर या वेळी परत काय उत्तर द्यायचे असा तिला प्रश्न पडला होता.
एक दिवस ती नेहमीप्रमाणे घरी आली, पण घर बंद होते. डायनिंग टेबलावर परत एकदा चिठ्ठी होती... 'उशीर होईल. वाट बघू नये.' त्यादिवशी मात्र तिचा बांध फुटला. खूप खूप रडली मिनाक्षी आणि तशीच न जेवता झोपुन गेली. सकाळी तिला उशिराच जाग आली. प्रशांत घरात दिसत नव्हता. तिने स्वतःचा चहा करून घेतला आणि पेपर उघडला. दुसऱ्याच पानावरची बातमी वाचून मिनाक्षीला मोठ्ठा धक्का बसला. एका नविन नाटकाचा शुभारंभ झाला होता... आणि नाटकाच्या डायरेक्टरच नाव डॉ. प्रशांत प्रधान होत. प्रशांतच्या स्तुतीने रकानेच्या रकाने भरले होते. M. D. सर्जन असणा-या प्रशांतच्या 'सर्जनशीलतेचे' खूप कौतुक केले होते.
मिनाक्षीने प्रशांतला फोन लावला. पण त्याने उचलला नाही. 'म्हणजे गेले काही दिवस तो रात्र रात्र नाटकाचा अभ्यास करत होता तर!' तिच्या मनात विचार आला. तिला खूप असहाय्य, हताश वाटायला लागल. भयंकर राग आला... पण नक्की कोणाचा राग आला आहे हे मात्र तिला समजत नव्हतं. स्वतःचा की प्रशांतचा की एकूण परिस्थितीचा! तिने तशीच तयारी केली आणि ती हॉस्पिटलमधे गेली. दिवसभर लोक तिच्याकडे प्रशांतच कौतुक करत होते आणि त्यांच्यासाठी अभिनंदनाचा निरोप देत होते. का कोण जाणे... पण तिला तेसर्व आवडत नव्हतं.
ती त्यादिवशी कधी नव्हे ते हॉस्पिटलमधुन लवकर निघाली. मिनाक्षी घरी पोहोचली. प्रशांतने तिचे हसत-हसत स्वागत केले. "कस वाटल सरप्राइज?" त्याने तिला विचारल.
"सरप्राइज? मूर्खपणा आहे हा. अरे प्रशांत तू डॉक्टर आहेस. एक नावाजलेला डॉक्टर! हा काय खुळचटपणा लावला आहेस? हे अस अचानक नाटकाच डायरेक्शनच काय सुचल तुला? आणि मला अजिब्बात कल्पना दिली नाहीस? मी तुझी कोणी आहे की नाही? आज अचानक न्यूज़ पेपर मधून मला समजल. कमाल करतोस तू. दिवसभर लोकांना तोंड देऊन कंटाळले आहे. हे अस परस्पर कस करू शकलास तू?" मीनाक्षी चिडून प्रशांतवर ओरडत होती. तिच तिला भान नव्हतं.
प्रशांतने तिचा हात धरून तिला बसवल आणि शांतपणे विचारल,"मीनाक्षी तुला नक्की कसला राग आला आहे? मी तुला न सांगितल्याचा? की मी नाटक डायरेक्ट केल त्याचा?"
"मला तुझाच राग आला आहे. मला काय खेळण समजतोस का? तुझ्या आयुष्यात काय चालल आहे हे तू आता मला सांगणारही नाहीस का? मला न्यूज़ पेपर्स मधून आणि लोकांकडूनच जर तुझ्याबद्दल समजणार असेल तर मग आपण एकत्र का राहायच प्रशांत? Its better we separate. Even otherwise i have realized that my way of life and your way of life is different. Let's get divorced prashant." एवढ़ बोलून त्याच्या हातातला हात झटका देऊन सोडवून मीनाक्षी बेडरूममधे गेली. तिने रागाच्या भरात स्वतः ची बॅग भरली आणि तशीच उलट पावली ती तिच्या आई-वडिलांकडे निघुन गेली. प्रशांत अवाक् होऊन सर्व बघत बसला.
त्यानंतर अगदीच अनपेक्षित घटना घडत गेल्या. अगदी अचानक! मिनाक्षीने डिवोर्स फ़ाइल केला. प्रशांतला नोटिस आली तेव्हा तर तो चक्रावून गेला. थोड़ तिच्या मनाविरुद्ध झाल आहे म्हणून चिडली आहे, असच त्याच मत होत. शांत झाली की येईल घरी अस त्याच मत होत. तिला थोडा वेळ दिला पाहिजे, असा विचार करून तो तिच्या मागे गेला नव्हता. पण ती गेल्याच्या आठवद्याभरात एकदम डिवोर्स नोटिस बघुन तो हड़बड़ला. घाईघाईने तिच्या आई-वडिलांच्या घरी त्याच्या लाडक्या मिनुला समजावायला तो गेला. पण मिनाक्षीने भेटायला स्पष्ट नकार दिला. ती एकदाही त्याच्यासमोर एकटीने आली नाही. त्यानंतर होणा-या प्रत्येक councelling सेशनमधे ती काहीच बोलायची नाही."आमच जमत नाही आणि जमणार ही नाही. त्याचे आयुष्य जगण्याचे विचार आणि माझे विचार वेगळे आहेत.." एवढ़च आणि इतकंच ती कायम म्हणायची. प्रशांतने सुरवातीला तिला समजावण्याचा खूप पर्यंत देखील केला. पण तिने तिचा निर्णय घेतला आहे हे त्याच्या लक्षात आल आणि मग मात्र त्याने फार ताणल नाही.
मुळात मीनाक्षीने घेतलेला निर्णय तो कायमच मान्य करत आला होता. फक्त एकदाच त्याने स्वतःचा असा वेगळा निर्णय घेतला होता. नाट्य दिग्दर्शनाचा! तेही स्वतःच्या मनाच एकून. पण त्यामुळे त्याची मिनू त्याच्यापासून दूर गेली होती. मनातून तो खूप निराश झाला होता. दुखावला गेला होता. आता परत त्याला तिला दुखवायचं नव्हत. ती म्हणेल ते मान्य करायचं त्याने ठरवलं होत. त्यामुळे याही वेळी त्याने तेच केल. म्यूच्यूअल अक्ससेप्टन्स मुळे त्यांचा डिवोर्स पटकन झाला. मीनाक्षी फ़क्त एकदाच घरी आली होती; तिच सामान घ्यायला आणि ते ही तिचे वकील घेऊन. त्याचवेळी त्याला समजल की तिला त्याच्याशी काहीच बोलायची इच्छा नाही. मग त्यानेदेखील काही प्रयत्न केला नाही. ती तिच्या वस्तू गोळा करत होती आणि तो एका बाजूला बसून शांतपणे तिच्या हालचाली बघत होता. तिने तिच्या अशा सगळ्या गोष्टी अगदी आठवणीने गोळा करून नेल्या. त्याला त्याच्या आठवणींमध्ये जपून ठेवता येईल अस काहीही तिने तिथे ठेवल नाही.
त्यानंतर मात्र ती कायमची पुण्याला शिफ्ट झाली. तिने आयुष्यात काय निर्णय घेतला आहे, किंवा काय करणार आहे याचा प्रशांतला थांगपत्ताही लागू न देता ती त्याच्या शहरातून आणि आयुष्यातून कायमची निघून गेली.
............12 वर्ष.... एक तप! आयुष्याची अनेक वळणं त्यानंतर प्रशांतने बघितली! त्याने उत्तम चालणारी डॉक्टरी सोडली. नाट्य-सिने क्षेत्रात खूप नाव कमावल. नंतर त्याने लग्न देखील केल होत. त्याला दोन जूळी मूलं देखील होती. अर्थात त्याने कधीही मिनाक्षीची चौकशी केली नव्हती. त्यामुळे ती आता काय करते ते त्याला माहीत नव्हत.
आणि आज समोर उभी असलेली मीनाक्षी. थोड़े केस पांढरे झाले होते आणि चष्मा लागला होता इतकेच. बाकी तिच्यात काहीच बदल नव्हता. तशीच ताठ.... आत्मविश्वासाने भरलेली नजर!
"हाय! कशी आहेस.... अं! मीनाक्षी?" प्रशांतने विचारले.
"अरे? प्रशांत तू? मस्त दिसतोस की! मी मजेत..." मिनाक्षीने हसत उत्तर दिल.
दोघांचीही परिस्थिति अवघडल्यासारखी झाली होती. बारा वर्षानंतर दोघे भेटत होते. ते ही शाळेच्या दहावीच गेटटूगेदर ठरल होत... वर्गाच पंचविसाव्या वर्षातील पदार्पण... म्हणून. प्रशांतचा पूर्ण पुढाकार त्यात नक्की असणार याची मीनाक्षीला कल्पना होती. 'आयुष्याची बारा वर्षे सतत एकत्र काढल्यानंतर पुढची बारा वर्षे एकमेकांचे तोंडही न बघणे... काय ही नाशिबाची चेष्टा होती.' प्रशांतच्या मनात आल.
गेट टुगेदर छान झाल. प्रत्येकाने आपण आता काय करतो आहोत ते सांगितल. मिनाक्षीने फ़क्त पुण्याला असते आणि डॉक्टर असल्याने तेच काम करते; असे हसत सांगितले.
अनेकांना प्रशांत-मीनाक्षी आता एकत्र नाहीत ते माहीत होत. प्रशांत सेलिब्रिटी होता. त्यामुळे त्याच्याबद्धल कायम लिहून यायच कुठे ना कुठे. त्यामुळे समंजसपणे कोणीच काहीही विचारल नाही. कार्यक्रमच्या शेवटी जेवण होत. हळू हळू एक एक जण जेवायला उठले. प्रशांत मीनाक्षी जवळ आला.
"जेवलीस?" त्याने विचारले.
"नाही रे... जेवेन." ती म्हणाली.
"आजच परत जाणार का पुण्याला?"
"नाही. रहाणार आहे. हॉटेल बुक केल आहे."
"अग कमाल करतेस. घरी का नाही आलीस? हॉटेल वगैरे काही नाही... तू आपल्या घरी चल." प्रशांत म्हणाला.
"प्रशांत... आपल्या घरी?" मीनाक्षी त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली. आणि तो एकदम शांत झाला.
"बर... मला हॉटेल वर सोडशील का?" तिने मूड हलका करत विचारले आणि तो लगेच हो म्हणाला. कार्यक्रम आटपला. सगळे एक-एक करून निघाले. तसे प्रशांत आणि मीनाक्षी देखिल निघाले. गाडीत दोघेही शांत होते. हॉटेल आल. मिनाक्षीने प्रशांतकड़े वळून विचारल,"कॉफ़ी घेऊया? वेळ आहे तुला?"
"हो..." घड्याळाकडे नजर टाकत तो म्हणाला.
दोघेही हॉटेलच्या कॉफ़ी शॉप मधे आले. एका कोप-यातल्या टेबलवर बसले.
प्रशांत थोड़ा गोंधळला होता. मीनाक्षी काही वेळ शांत होती. मग तिने प्रशांतला हाक मारली.
"प्रशांत.."
"ह?"
"कसा आहेस तू?"
"मिनु..." जणूकाही तिच्या या प्रश्नाची वाट बघत असल्यासारखा प्रशांत एकदम म्हणाला. मग मात्र स्वतःला सावरून म्हणाला,"I mean... मीनाक्षी... खर सांगू? मी खूप समाधानी आहे ग. आपण वेगळे झाल्यानंतर अनेक महिने मी दु:खात होतो. कोणाला भेटत नव्हतो... कोणाशीही बोलत नव्हतो.... पण मग कधीतरी परत एकदा एका नाटकाच्या दिग्दर्शनाची ऑफर आली. मी इच्छा नसूनही ते काम घेतल आणि जणूकाही माझ जगच बदलून गेल. मग मात्र मी कधी मागे वळून नाही ग बघितल. मी तुझ्यात खूप गुंतलो होतो. तुझी सवय होती मला. आयुष्यात तू निर्णय घेणार आणि मी तुझ्याबरोबर चालणार; असाच मला कायम वाटत होत. पण अचानक हे सगळ बदलल. तू बदलवलस. मी एकटा पडलो. पण हळूहळू माझ्या लक्षात आल की रडत आणि दु:ख करत जगण ये आयुष्य नाही. म्हणून मग मी माझ्यासमोर जे आयुष्य आल ते हसत स्वीकारलं. खरच! आज तू समोर आलीस आणि मला आपण एकत्र घालवलेला काळ एखाद्या चित्रपटासारखा डोळ्यासमोर उभा राहिला एवढच. पण नाहीतर मी डॉक्टरी शिकलो आहे आणि आता प्रक्टिस करत नाही याच मला कधीच दु:ख झाल नाही." प्रशांत अपराधी आवाजात म्हणाला.
मीनाक्षी शांतपणे प्रशांतच बोलण ऐकत होती. तिने प्रशांतच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाली, "प्रशांत तू अपराधी वाटून घेऊ नकोस. खर सांगू? मी कायम तुझ्याबद्धल वाचत असते. पण केवळ तू कसा आहेस ते समजाव म्हणून. मला तुझ्या इंटरव्यूज मधून जाणवत की आपल्यात जे घडून गेल आहे त्याबद्दल तू कुठेतरी स्वतः ला अजूनही दोष देतोस. अस आहे का प्रशांत?" मिनाक्षीने त्याला विचारल.
"हो मिनु. मी खरच तुझ्यावर खूप प्रेम केल होत. कुठे आणि काय चुकल मला कळलच नाही. तुझ्यासारखी समंजस, विचारी मुलगी; जिने आयुष्यभर सगळ कस विचारपूर्वक केल; इतक्या तड़का-फड़की असा टोकाचा निर्णय घेईल अस कधी वाटल नव्हतं ग. तू तर एक घाव आणि दोन टुकड़े अस केलस. मी किती भेटायचा प्रयत्न केला तुला. पण तू कधीच भेटली नाहीस मला एकदा घर सोडून गेल्यावर." प्रशांत म्हणाला.
"प्रशांत... मला मान्य आहे की मी जे केल ते त्यावेळी योग्य नव्हतं. त्यावेळी मी तुला काहीच न सांगता निर्णय घेतला. जसा कायम मी आपल्या दोघांसाठी घेत आले तसाच. मात्र आज मी तुला त्याच कारण सांगते... जेव्हा नाटकाचा डायरेक्टर म्हणून तुझ नाव मी पेपरमधे वाचल तेव्हा त्याक्षणी मला खूप राग आला. मला न सांगता... माझ मत विचारात न घेता... तू आयुष्यात पहिल्यांदाच एक वेगळ पाऊल उचलल होतस. त्यावेळी मला तो माझा अपमान वाटला. मी तशीच घर सोडून गेले. पण मग आईकडे गेल्यावर आणि मन शांत झाल्यावर माझ्या लक्षात आल की डायरेक्शन हा तुझा स्वतः चा चॉइस होता. आयुष्यात पहिल्यांदाच तू स्वतःच्या मनाने एक निर्णय घेतला होतास. तोवर मीच दोघांच्या आयुष्याचे निर्णय घेत आले होते. कदाचित् आपण एकत्र राहिलो असतो तर तू तुला आवडणाऱ्या या क्षेत्राचा विचारही केला नसतास. कदाचित् आपण कायम भांडत... एकमेकांना दुखवत एकत्र राहिलो असतो. प्रशांत... मला न टिपिकल संसार करायची फारशी इच्छाच नव्हती. तुझ्यापासून दूर झाले आणि तुझा आणि माझा असा वेगळा विचार केला तेव्हा माझ्या लक्षात आल की तू फ़क्त माझ्यावर प्रेम करत होतास. आणि मी मात्र कायम माझ्या करियरचा विचार केला होता. तू हुशार होतास आणि माझ एकायचास म्हणून मी माझ्या बरोबर तुझे देखिल निर्णय घेत होते; इतकंच. मला देखील त्याची सवय झाली होती. मुळात मला संसार करायची इच्छा नाही आणि तुला मात्र हे सगळच मनापासून हव आहे; जेव्हा हे लक्षात आल तेव्हा मग मी निर्णय घेतला की आपण वेगळ होण दोघांसाठी योग्य आहे.
आणि बघ न... आज तू तुला आवडत ते करतो आहेस. अगदी मनापासून! खूप यशस्वी आहेस. लग्न केल आहेस. छान गोंड्स मूलं आहेत. सुखी आहेस. याचा मला खूप खूप आनंद आहे. आणि एक गोष्ट; अगदी प्रामाणिकपणे सांगते... मी पण खूप सुखी आहे. पूना मेडिकल कॉलेजची डीन आहे. कॉलेज मध्ये शिकवते आहे, अवघड ऑपरेशनस एक चालेंज म्हणून करते आहे. यासगळ्याच जे कौतुक होत ते मनापासून एन्जोय करते आहे. मला जे हव होत ते मी मिळवल आहे.
मग का उगाच भूतकाळाच् ओझ मनावर बाळगायच? प्रशांत खरच असाच पूर्णत्वाने जग. आपण दोस्त होतो. आणि राहु. असच कधीतरी भेटु. एखादी कॉफ़ी घेऊ... आणि आपण स्वतः च्या मनाने निवडलेल आयुष्य परिपूर्णपणे जगु. हो न?" मिनाक्षी बोलायची थांबली.
प्रशांतला तिच म्हणण अगदी पटल. अगदी पूर्वी देखील जस ती जे म्हणायची ते पटायचं तस; आणि ते मनात येऊन तो मनापासून हसला. दोघेही उठले. एकमेकांना शेक हॅंड केल. मीनाक्षीने त्याच्या खांद्यावर थोपटलं आणि मागे वळून चालू लागली. आत्माविशावासाने आणि शांतपणे जाणाऱ्या मिनाक्शीकडे बघून प्रशांतला खूप बर वाटल. आज त्याला त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली होती. मीनाक्षीच्या पाठमोऱ्या व्यक्तिमत्वाकडे बघताना तो भारावून गेला आणि शांत मनाने त्याच्या घराकडे निघाला.
समाप्त
--------------------------------------------------------------------------------

खूप छान
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDelete