Friday, November 11, 2022

माझा विठोबा (कविता)

 माझा विठोबा


माउली शब्दात..
आईची सय..
विठाई माझी..
जगाची माय!

नरहरि, तुका,
गोरा कुंभार..
ज्ञाना, मुक्ताचे..
प्रेम विठोबावर;

चिलयाची हाक...
ऐकता कानी...
विठाई म्हणुनी आई..
गळा भेट घेई!

आई-बाप निजले...
थांब बाप्पा तू...
हसे विठोबा सावळा..
कर सेवा तू!

सर्वस्व तुझ्या रुपात...
नको दूर लोटू...
माझ्यातच तू तरी...
मन कसं जिंकू?


No comments:

Post a Comment