माझा... आणि शोधलास तर कदाचित तुझा देखील.... कृष्ण!!!
असंच कधीतरी एकदा एक कविता whatsapp वर वाचली. फारच भावस्पर्शी आहे ही कविता. वाचली आणि अगदी खोल मनाला स्पर्शून गेली; आणि मग मनात घोळत राहिली. वाटलं या कवितेनंतर मनात आलेले विचार तुमच्यासोबत शेअर केलेच पाहिजेत....
(कविता.....
कृष्ण भेटायलाच पाहिजे.
आयुष्यात प्रत्येक वळणावर
कृष्ण भेटायलाच पाहिजे.
मनातलं बोलायला,
लिहिलेलं वाचायला,
रेखाटलेलं दाखवायला,
अन् कधी गायलेलं ऐकवायला ....
हक्काचा सवंगडी पाहिजे
आणि म्हणूनच प्रत्येकाला
एक कृष्ण भेटायलाच पाहिजे
मुळात नात्यांच्या पलिकडचे
भावबंध जोडणारा
एक हक्काचा सवंगडी पाहिजे.....
लहानपणापासून जपलेल्या
अनेक नात्यांचीही वयं वाढत असतात
त्या नात्यांचे काळाप्रमाणे
अर्थ बदलंत असतात
तस्संच....ते...पूर्वीचं...निर्व्याज.... अबोध नातं
पुन्हा जमायला पाहिजे
आणि याकरताच
आयुष्यात कृष्ण भेटायला पाहिजे......
"तो" कृष्ण "ती" ही असु शकते.
आपल्या मनातलं सारं जाणणारी ती असते
कधीही आपलं खोलवर मन
रीतं करता आलं पाहिजे
असा हक्काचा...विश्वासाचा
कृष्ण भेटलाच पाहिजे........
आपल्या आजुबाजुला तो सापडेलंच
असं नाही
जोडीदारामध्ये तो गवसेलंच
असंही नाही
कुणीतरी जवळचं कृष्ण असण्याची भावनाही
उर्मी देणारी पाहिजे
मात्र कधी मनाचा पेंद्या
झाला नाही पाहिजे....
सुंदर विचारांची
रम्य मुरली छेडणारा तो......
आयुष्यात प्रत्येकाला
कृष्ण भेटला पाहिजे.
खरंच त्या मुरलीधराकडे
मुरली होती का?
की अनेकांच्या मनात रुंजणारी
त्याची ती आश्वस्त मैत्री होती का?
त्याच्या अस्तित्वाने
अनेक मनांतून उमटत असाव्या आनंदलहरी
आणि त्यांचीच ऐकु येत असावी
रुंजणारी मुरली...
अनेकांच्या मनामधे मुरणारा
तो मुरलीमनोहर
प्रत्येकाला भेटायला पाहिजे
आयुष्यात प्रत्येक वळणावर
कृष्ण भेटायला पाहिजे......
कवी कोण आहे ते मला माहित नाही)
ही कविता वाचली आणि वाटलं.....उगाचंच आपणच निर्माण केलेल्या बांधनांमधून मन मोकळं करून थोडं इकडे-तिकडे बघितलंत तर असा कृष्ण तुम्हाला भेटू शकतो. तसं बघितलं तर तो त्याच्या संसारात सुखी असतो आणि तुम्ही तुमच्या... आणि मग कधीतरी अचानक एखाद्या नाजूक, भावनिक वळणावर किंवा अगदी सहज मारलेल्या गापांमधून कसाही पण तो तुम्हाला भेटतो... त्याच्या सोबत तुम्ही बोलत असता... हसत असता... तुमच्या नकळत आनंदी होत असता... पण तरीही तुम्हाला माहीत नसतच की हाच तुमचा कृष्ण आहे. आतून काहीतरी वेगळं जाणवत असत... जे तुमच तुम्हाला देखील सांगता येत नाही...... मग तुमच्याही नकळत तुम्ही त्याच्याकडे व्यक्त व्हायला लागता. हे व्यक्त होणं कायमच भावनिक असत असं नाही; किंवा सांसारिक-व्यवहारिक अडचणी तुम्ही सांगता अस तर मुळीच नाही. उलट त्याच्याकडे/तिच्याकडे (तुमच्या त्या कृष्णकडे) तुम्ही तुमच्या अमूर्त कल्पना.... अवघड वाटणारी तरीही मनात जपलेली स्वप्न मनमोकळेपणी सांगायला लागता.
नदी किनारी पाण्यात पाय सोडून समोरच्या हिरवळीकडे बघत बसावं; किंवा सूर्यास्ताच्या किरणासोबत सागर लाटातून पाय भिजवत चालावं; अगदी एखादा मस्त पेग हातात घोळवत बर्फाळ डोंगरमाथ्याच्या सोनपिवळ्या रंगाकडे टकलावून बघावं.... उबदार सूर्य किरणात लांबवर पसरलेल्या कुरणातून चालावं... अशी एरवी कधीही न बघितलेली स्वप्न देखील मग तुम्ही बघायला लागता. लता-आशा-रफी-नौशाद.... ज्यांचं नाव घ्याल ते तुमच्या मोबाईलच्या किंवा टेपच्या तबकडीवर मग तुम्हाला रिझवायला लागतात. तो/ती (तुमचा तो कृष्ण) तुमच्या नकळत तुमचा जीवाभावाचा सखा होऊन जातो/जाते. अगदी कवितेत म्हंटल्यासारखं. मग कधीतरी तो देखील व्यक्त व्हायला लागतो तुमच्याकडे.... त्याच्या आणि तुमच्याही नकळत. तो तुमचा कृष्ण होतो आणि तुम्ही त्याचे कृष्ण होता....
काय आहे हा कृष्ण? माझ्या मते ते एक निर्व्याज नातं आहे! शब्दांच्या पलीकडचं! तुमचं सर्वस्वाने व्यक्त होणं समजतो तो... आणि त्याच्या अव्यक्त भावना तुम्हाला देखील समजायला लागतात. कवितेत म्हंटल्या प्रमाणे, या नात्यात अपेक्षा नसतात; त्यामुळे अपेक्षाभंग नसतो.... म्हणूनच कदाचित मग दुःखाला जागा नसते. मान-अपमान नसतो. एक निर्व्याजता असते... भेटता-भेटता राहिलं म्हणून नाराजी नसते... आणि भेटल्यानंतर वेळेची मोजणी नसते! असं नातं समजून घेण्याची आणि ते जपण्याची मन:शक्ती ज्यांच्याकडे असते; ते स्वतः कृष्ण होतात आणि कोणालातरी कृष्ण करतात...
कुणीतरी जवळचं कृष्ण असण्याची भावनाही
उर्मी देणारी पाहिजे
मात्र कधी मनाचा पेंद्या
झाला नाही पाहिजे....
या चार ओळी खूपच महत्वाच्या वाटतात मला. हे जे कृष्ण रुपी नातं आहे हे आयुष्यभर कृष्ण रूपातच जपता आलं पाहिजे; हे समजून घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे. कृष्ण असतो आणि असावाच... पण त्याच्यावर अवलंबून नसलं पाहिजे आपण. एक ऊर्जा... उर्मी... देण्याइतकच असतं हे कृष्णनातं! श्रीकृष्णाच्या मागे आंधळेपणाने फिरणारा आणि तो म्हणेल ते मान्य करणारा पेंद्या आपण होऊ दिला नाही पाहिजे. थोडक्यात सांगायचं तर हे नातं तुमच्या जीवनात अडचण होऊ न देणं ही तुमची जवाबदारी असते.
असा कृष्ण आयुष्यात आला की मग आयुष्य सोपं होऊन जातं. मग लहानपणापासून ज्या नात्यांच्या बरोबरीने आपण मोठे होत असतो आणि अपेक्षा वाढवत असतो... त्या अपेक्षाच थांबतात. आयुष्य कसं सोपं वाटायला लागत. जवाबदाऱ्यांना आणि बंधनांना कंटाळलेले आपण त्या कृष्णाच्या सानिध्यातल्या काही क्षणात स्वतःला परत उर्जित करून घेतो.... मग रोजच्या जवाबदऱ्या आणि नात्यांमधील बंधनं जड वाटत नाहीत. एकटे असताना देखील आपण लहानपणी पाहायचो तशी छानशी स्वप्न परत बघायला लागतो.... त्याच्याकडे व्यक्त करण्यासाठी काहीतरी हवं या भावनेतून मनाला रोजच्या त्याच त्या रुटीनमधून मोकळे करतो..... थोडक्यात आपणच आपलं आयुष्य सप्तरंगी करून टाकतो........ म्हणूनच.............
अनेकांच्या मनामधे मुरणारा
तो मुरलीमनोहर;
प्रत्येकाला भेटायला पाहिजे!
आयुष्यात प्रत्येक वळणावर कृष्ण भेटायला पाहिजे......
खरच शोधून तर बघा असा कृष्ण. कदाचित तुमच्या आजूबाजूलाच तुमचीच वाट बघत थांबला असेल तो. थोडं बघा की शोधून... कदाचित तो देखील तुम्हालाच शोधत असेल.
-------------

फार सुंदर विचारधारा
ReplyDeleteफारच सुंदर वहिनी,सुप्रसिद्ध संगीत समीक्षक रामूभैय्या दाते (गायक अरूण दातेंचे वडील) यांची एक आठवण पुलं नी लिहून ठेवलीय,रामुभैय्या एकदा सुप्रसिद्ध गझल गायिका बेगम अख्तरांचे गाणे ऐकायला गेले आणि बेगमनीं पहिला साssलावला आणि रामुभैय्या म्हणाले बस्स्स...गाणं पावलं!!! पहिल्या "सा" एव्हढा अप्रतिम होता की त्यांच्याजवळ असलेली सर्व कौतुकाची पूंजी तिथेच संपली...नंतरचे गाणे म्हणजे केवळ अमृतानुभव...तशीच आज मनाची अवस्था झालीय..तुमच्या लेखाचे "कृष्णमित्र" या कल्पक शिर्षक वाचताच कौतुकाची पूंजी तेथेच संपली....नंतर उरला तो केवळ अमृतानुभव आणि पुढच्या ब्लॉग ची उत्सुकता....
ReplyDeleteचुकून कृष्णमित्र असे लिहिले गेलेय मला कृष्णनातं असे म्हणावयाचे आहे
Deleteमनापासून धन्यवाद अमित
Deleteखूप सुदंर...कृष्ण
Deleteएकच अभिप्राय ...कृष्ण
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDeleteअप्रतिम!
ReplyDeleteखरंच मनाला आपापल्या कृष्णाची ओढ लावणारी व आठवण करून देणारी.
धन्यवाद
ReplyDeleteतुम्हाला या लेखामुळे जर तुमच्या कृष्णाची आठवण झाली असेल तर लेख खरच सुफळ संपूर्ण
कृष्णाची ओढ लावणारी व आठवण करून देणारी कथा.
ReplyDeleteफार सुंदर.
धन्यवाद अजय
Deleteप्रत्येकाच्या आयुष्यात एक कृष्ण नात असणारा हवाच आहे कारण कठीण प्रसंगी त्या कृष्णाच्या मी आहेना या शब्दांनी खूप धीर येतो व कठीण समय लवकर संपतो
ReplyDeleteअगदी खरं संतोषजी.
ReplyDeleteएक अपेक्षा रहित आणि तरीही आश्वस्त नातं असावंच!