नका होऊ नतमस्तक
मी कोणी देवता नाही..
नका म्हणू अष्टभुजा;
मी काली-भवानी नाही!
कधी मखरात... कधी वेश्यागारात...
मान मात्र कधीच नाही!
मनुष्य जन्म माझा ही;
एवढंच स्वीकारणं का शक्य नाही?
जग तुझ्या मनासारखं...
तुला कोणतंही बंधन नाही!
एकदा तिला हे सांगून तर बघा...
अवकाशला गवसणी घालणं खरंच अशक्य नाही!!!
(एक वेगळा प्रयोग केला आहे. ही कविता मी स्वतः विडिओ स्वरूपात देखील सादर केली आहे. त्याची लिंक खाली दिली आहे. तिला स्पर्श करताच विडिओ चालू होईल)
स्त्रिची महानता,तिचा आत्मविश्वास जागृत करणारी कविता. मनाला भिडणारी.
ReplyDeleteधन्यवाद
Delete