प्रेमाची भाषा
प्रेमाची दोघांचीच अशी भाषा असते...
झुकलेल्या पापण्यात ती रुजवायची असते...
शब्दांशिवाय हृदयात उतरवायची असते...
प्रेमाच्या हितगुजात घोळवायची असते!
ती कधी कविता होऊन शब्दात विरघळते...
कधी गुलजार.. कधी जगजीत.. कधी मेहँदी हसन बनते;
लता-आशाच्या गळयातुन... ए. आर. रेहेमानच्या संगीतातुन...
घरंगळते, मोहवते; दोघांचं हितगुज दोघांना सांगते!
प्रेमाची भाषा स्पर्शातुन देखील फुलते;
भावनांचे खत-पाणी मात्र तिला लागते...
रुजुन, बहरुन, मग ती उमलते....
दोघांचे हितगुज दोघांना सांगते!
प्रेमाची दोघांचीच अशी भाषा असते...
झुकलेल्या पापण्यात ती रुजवायची असते...
शब्दांशिवाय हृदयात उतरवायची असते...
प्रेमाच्या हितगुजात घोळवायची असते!
ती कधी कविता होऊन शब्दात विरघळते...
कधी गुलजार.. कधी जगजीत.. कधी मेहँदी हसन बनते;
लता-आशाच्या गळयातुन... ए. आर. रेहेमानच्या संगीतातुन...
घरंगळते, मोहवते; दोघांचं हितगुज दोघांना सांगते!
प्रेमाची भाषा स्पर्शातुन देखील फुलते;
भावनांचे खत-पाणी मात्र तिला लागते...
रुजुन, बहरुन, मग ती उमलते....
दोघांचे हितगुज दोघांना सांगते!
छान
ReplyDeleteधन्यवाद
Deletemast...
ReplyDeleteधन्यवाद
Delete