खिडकी पलीकडचं जग
भाग १
गौरी नावासारखीच गोड, मोहक आणि बड़बडया स्वभावाची मुलगी होती. लाघवी आणि मित्र-मैत्रिणींचा मोठा परिवार असलेली. पहिला नंबर वगैरे नाही... पण तशी हुशार म्हणण्यासारखी. आई-बाबांची एकुलती आणि लाडकी लेक. गौरी उत्तम चित्र काढायची. त्यामुळे शाळेतून तिला वेगवेगळ्या स्पर्धांना देखील पाठवालं जायचं. अनेकदा तिने शाळेला बक्षीस मिळवून दिलं होतं.
त्या दिवशी गौरीची 10वी च्या परीक्षेचा शेवटचा पेपर होता. त्यामुळे गौरी आणि तिच्या मैत्रिणी खूप खुशीत होत्या. सगळ्या मैत्रिणी मिळून जुहुला भटकायला जाणार होत्या. आता आपण कॉलेजमध्ये जाणार म्हणजे थोडे मोठे झालो असं सगळ्यांच्याच मनात होत. त्यामुळे घरून सर्वांनीच बाहेर खाण्यासाठी पैसे घेतले होते. हसत-खिदळत सगळा ग्रुप बीच वर पोहोचला. पाण्यातली धम्माल... भेळ... गोळा... धावाधाव... एकदम खुशीचा माहोल होता. एकूण यासगळयामधे कधी अंधार झाला ते मुलींना कळलच नाही. उशीर झाला आहे हे लक्षात आल्यावर मात्र सगळ्याजणी गड़बडल्या. ज्या मुली एकमेकींजवळ राहणाऱ्या होत्या त्यांनी सोबतीने जाण्याच्या दृष्टीने एकत्र रिक्शा केल्या आणि दुसऱ्या दिवशी भेटायचं ठरवून निघाल्या. गौरी आणि अक्षरा जवळ जवळ रहायच्या त्यामुळे त्यांनी दोघींनी एकच रिक्षा केली होती. अक्षरा अगोदर उतरणार होती; तिला सोडून गौरीची रिक्शा पुढे गेली त्यावेळी साधारण साडे सात वाजले होते.
"हॅलो अक्षरा आहे का? मी गौरीची आई बोलते." रात्रीचे नऊ वाजले होते आणि अक्षराच्या घरी गौरीच्या आईचा धास्तावलेल्या आवाजातला फोन आला.
"हॅलो काकू.. मी अक्षरा. काय झाल काकू?" अक्षराने फोन घेतला.
"अक्षरा, अग मी आत्ता मितालीला फोन केला होता. ती म्हणाली तू आणि गौरी एकत्र निघालात. मग गौरी तुझ्याकडे थांबली आहे का? अजुन ती घरी नाही आलेली." काकुंचा आवाज अस्वस्थ होता.
"असं कसं होईल काकु? अहो काकू उशीर झाला होता ना आम्हाला जुहुहून निघताना त्यामुळे आम्ही दोघींनी एकच रिक्षा केली. घरीच गेलेलं बर असं आम्ही ठरवलं. म्हणून मी रिक्षातून उतरले आणि गौरी तीच रिक्शा घेऊन पुढे गेली. आम्ही उद्या दुपारी भेटायचं ठरवलं आहे. काय झाल काकू?" अक्षरा गोंधळून गेली.
"ठीके... काही झाल नाही ग. पण तुला जर गौरीचा फोन आला तर तिला अगोदर मला फोन करायला सांग." असं म्हणून गौरीच्या आईने फोन ठेवला.
अक्षराचा फोन ठेवून गौरीची आई अस्वस्थपणे विचार करत बसली. कारण गौरी अजूनही घरी पोहोचली नव्हती. गौरीचे बाबा कधीचेच तिला शोधायला बाहेर पडले होते. शेवटी काही न सुचुन गौरीची आई पोलिस स्टेशनमधे गेली.
"अहो, माझी मुलगी अजुन घरी नाही आलेली. आजच 10वी ची परीक्षा झाली आणि सगळ्या मैत्रिणी जुहू बीचवर फिरायला गेल्या होत्या. तिने तिच्या मैत्रिणीला रिक्षाने सोडलं आणि ती पुढे गेली; असं तिची मैत्रीण म्हणते. पण माझी मुलगी घरी नाही हो आली." पोलीस स्टेशनला पोहोचल्या पोहोचल्या गौरीच्या आईने बोलायला सुरवात केली. ती फारच रडवेली झाली होती.
त्यांना बसवत आणि हातात पाण्याचा ग्लास देत एका पोलिस अधिकाऱ्याने विचारलं," कुठे रहाता तुम्ही? काय वय आहे तुमच्या मुलीचं?"
गौरीच्या आईने दिलेला ग्लास नाकारला आणि म्हणाली, "खार पूर्वेला. 16 वर्षाची आहे हो. गौरी नाव आहे. मी तिचा फोटोसुद्धा आणला आहे. हा बघा." आणि फोटो काढून दाखवला.
फोटो बघताच त्या पोलिस अधिकाऱ्याने गौरीच्या आईला विचारले,"रिक्षात होती का ती?"
"हो साहेब. तुम्हाला काही माहिती आहे का हो?" आता मात्र आईचा धीर सुटायला लागला होता. त्यांचे डोळे वाहायला लागले.
"अहो मॅडम असं रडु नका. तुमच्या मुलीचे वडील कुठे आहेत? हा घ्या फोन आणि त्यांना बोलवा बघू. काळजी करु नका. आपण शोधु तुमच्या मुलीला." पोलीस अधिकारी चांगला होता. त्याने गौरीच्या आईला बसायला सांगितलं आणि तिच्या हातात फोन दिला.
गौरीच्या आईने वडीलाना फोन केला. आपली पत्नी पोलीस स्टेशन मधून बोलते आहे आणि पोलिसांनी लग्गेच बोलावले आहे समजले तसे गौरीचे वडील धावत पळत पोलिस स्टेशनला पोहोचले. पोलीस अधिकारी त्यांना घेऊन बाजूला गेले. थोड्या वेळाने गौरीचे बाबा आईजवळ आले आणि म्हणाले,"विजया, एका रिक्षाचा संध्याकाळच्या वेळी आपल्या घराजवळच अपघात झाला आहे. रिक्षात एक मुलगी होती. साधारण आपल्या गौरीच्याच वयाची. असं हे साहेब म्हणत आहेत. तिला जवळच्याच् हॉस्पिटल मधे नेले आहे. चल आपण जाऊन बघू या."
हे ऐकून गौरीची आई मटकन खाली बसली. बाबांनी तिला हाताला धरून उठवलं आणि ते हॉस्पिटलच्या दिशेने निघाले.
या घटनेला आज तीन महीने झाले होते. गौरीचा रिजल्ट होता. पण तो घ्यायला गौरी जाऊ शकणार नव्हती. त्या अपघातामधे गौरीचे दोन्ही पाय निकामी झाले होते. तिच्या पायांमधली शक्तीच जणूकाही कोणीतरी काढून घेतली होती. ती कमरेखाली पूर्ण अधु झाली होती. खळ-खळ वाहणाऱ्या झऱ्यासारखी गौरी गंभीर डोहासारखी शांत झाली होती.
अगोदर सतत येणाऱ्या मित्र-मैत्रिणींचा ओघ रिजल्ट नंतर कमी झाला. सगळे आपापल्या पुढच्या मार्गाला लागले. गौरी त्या अपघातातून पूर्ण सावरली नव्हती आणि आता या नव्या परिस्थितीत पुढे काय करायचं याचा विचारही तिने केला नव्हता. तिच्या मित्र-मैत्रिणींचे गप्पांचे विषय आता बदलले आणि गौरीचा एकाकीपणा वाढला.
खूप दिवसांनंतर त्या दिवशी बाबा घरी आले ते एकदम उत्साहात. त्यांनी गौरीसाठी नवीन ड्रॉइंग बोर्ड आणला होता. गौरी तिच्या सोयीप्रमाणे तो पलंगावर उभा किंवा आडवा ठेऊ शकणार होती. पण तो बघुनही गौरी शांतच होती. रात्री जेवायची वेळ झाली होती. आई-बाबा अलीकडे तिच्या पलंगाजवळच जेवायला बसायचे. त्याप्रमाणे तिघे जेवायला बसले. त्यावेळी मात्र बाबांनी एक मोठी बातमी दिली.
"बेटा... मी माझी बदली करून घेतली आहे. आपण नाशिकला जातो आहोत." बाबांनी गौरीच्या मूडचा अंदाज घेत तिला सांगितले. हे एकताच मात्र गौरीचा चेहेरा बदलला. "खरंच बाबा? खूप बरं होईल हो. इथे न मला सारखं असहाय्य आणि एकटं वाटतं हो." गौरी अगदी मनापासून म्हणाली आणि खूप दिवसांनी तिच्या चेहेऱ्यावर हसू फुटलं. तिला हसताना बघून गौरीच्या आईचे डोळे भरून आले. तिने गौरीला जवळ घेतलं.
नाशिकचं घर खरंच खूप सुंदर होतं. पण गावाच्या एका बाजूला. शेवटच घर होते ते. जरी हे घर शेवटचं होत तरी आजूबाजूला भरपूर वस्ती होती. हे घर म्हणजे एक इटुकली बंगली होती ती. एक हॉल, दोन बेड रूम्स, हॉल, स्वयंपाक घर. एक लहानशी सामान साठवण्याची खोली. बस्.. मात्र घराला मोठ्या मोठ्या खिड़क्या होत्या. पुढे एक मोठासा व्हरांडा होता आणि छानसं आवार होतं, पण मागे वेगळं असं आवार मात्र नव्हतं. मास्टर बैडरूम घराच्या मागिल अंगाला होती. गौरीने स्वतःसाठी मास्टर बेडरूम निवडली. कारण खिड़कीला अगदी लागुनच मोठ्ठ मैदान होतं. संध्याकाळी त्या मैदानावर मुलं खेळायला येत असतील असा विचार करून गौरीने स्वतःसाठी मास्टर बेडरूम मागून घेतली होती. मैदानात खेळणाऱ्या मुलांना बघत संध्याकाळचा वेळ चांगला जाईल असा विचार तिने केला होता. तिची खोली अगदी तिच्या सोयीप्रमाणे तिने लावून घेतली. तिची कॉट मोठ्या खिड़कीच्या शेजारी ठेवली गेली. तिचा हात पोहोचेल असा तिचा नविन ड्रॉइंग बोर्ड ठेवला होता.
गौरीला आणि तिच्या आई-बाबांना तिथे रहायला लागून आठ दिवस झाले होते. खिडकी समोरचं मैदान मोठं आणि झाडांची मस्त सावली असलेलं असूनही गौरीला तिथे कोणी खेळायला आलेलं अजून तरी दिसलं नव्हतं. त्यामुळे गौरी थोड़ी हिरमुसली होती. नवीन जागा असल्याने तिची कोणाशी ओळख झाली नव्हती. त्यात गौरी आपणहून कुठेही बाहेर पडू शकत नव्हती. त्यामुळे तिला त्या मैदानाचा खूपच दिलासा वाटला होता सुरवातीला. मात्र त्या मैदानामध्ये कधीच कोणीही खेळायला येत नाही हे पाहून तिला फारच वाईट वाटायला लागलं होतं. तिने आईला सांगून आजू-बाजूला चौकशी करायला लावली की त्या मैदानावर कोणी खेळायला का येत नाही. एक दोघांनी सांगितलं की तसं काही कारण नाही तिथे न जाण्याचं... पण त्या बाजूला गेलं की मुलं अस्वस्थ होतात असा इथल्या लोकांचा अनुभव आहे; म्हणून तिथे जाण्याचं सगळे टाळतात आणि मुलांना सक्त ताकीद आहे की तिथे एकटं अजिबात जायचं नाही. सवयीचं नसल्याने मुलं देखील त्या मैदानात जात नाहीत. हे समजल्यावर मात्र गौरी अजूनच हिरमुसली.
असेच एक-दोन दिवस गेले. त्यादिवशी गौरीचा मूड तसा चांगला होता. त्यामुळे ती तिच्या चित्रकलेचा जामाजीमा उघडून चित्र काढत बसली होती. संध्याकाळचे पाच वाजले होते. पण तसा छान उजेड होता. गौरीच्या वडिलांना यायला अजून वेळ होता. घरातल्या काही वस्तू संपल्या होत्या म्हणून त्या आणायला गौरीची आई तिला सांगून कोपऱ्यावरच्या वाण्याकडे गेली होती. आणि अचानक गौरीला त्या मैदानाच्या बाजूने बऱ्याच मुलांचा आवाज ऐकायला आला. तिने आश्चर्याने त्या दिशेने नजर वळवली.
त्याबाजूला बघताच गौरीचे डोळे विस्फारले गेले. कारण अगदी अचानक ते मैदान जीवंत झालं होतं. तिथे खूपशी मूलं वेगवेगळे खेळ खेळताना दिसत होती. काही मोठी माणसं एका बाजूला रांगेने लावलेल्या बाकड्यांवर बसून गप्पा मारत होती. अगदी जिवंत झाल होत ते मैदान. जणू काही जमिनीतून उगवले होते ते सर्वजण. गौरी मंत्रमुग्ध होऊन तो जीवंत नजारा बघत होती. हळू-हळू अंधार पडायला लागला; मूलं एक-एक करून घरी जायला लागली. मोठी माणसं देखील उठून जायला निघालेली गौरीला दिसली. बहुतेक तास-दिड तास गौरीची तन्द्रि लागली होती, अस तिला वाटलं.
तेवढ्यात गौरीच्या आईने तिला हाक मारली. "गौरी.. सॉरी ह बेटा... थोडा उशीर झाला यायला. शेजारच्या मावशी भेटल्या त्यांच्याशी बोलत होते. कंटाळली नाहीस न?"
आईच्या हाकेने गौरीने वळून दाराकडे बघितले. आई हसत आत येत होती. "अग आई अज्जिब्बात कंटाळले नाही. अग, इथे ये. गम्मत बघ. आज मैदानावर अचानक जत्रा भरली आहे बघ." गौरीचा आवाज एकदम आनंदी होता.
तिची आई आश्चर्याने आणि उत्सुकतेने पुढे आली. तिने आणि गौरीने वळून एकत्रच मैदानाच्या दिशेने बघितले. आणि...... तिथे तेच ते मैदाना होते... भरपूर झाडांची सावली असलेले पण तरीही शांत आणि रिकामे!
गौरीचे डोळे आश्चर्याने विस्फारले गेले.
"अग आई... आत्ता... तू हाकमारेपर्यंत माझी नजर त्या मैदानावरच खिळलेली होती. अग काही सेकंदांपूर्वी इथे खूपशी मूलं खेळत होती. मोठी माणसं तिथे त्या बाजूला असलेल्या बाकड्यांवर बसली होती." गौरीच्या आवाजात आश्चर्य आणि अविश्वास होता. आपल्याला भास झाला की काय असा विचार तिच्या मनाला चाटून गेला.
"पण बेटा... आत्ता तरी तिथे असं काहीच दिसत नाही मला. अग तुला भास झाला असेल. मी फ़क्त अर्ध्या तासासाठी गेले होते ग. तू म्हणजे ना.. तुला झोप लागली असेल आणि स्वप्न पड़लं असेल..." आईने गौरीच्याच मनातला विचार बोलून दाखवला. त्यामुळे गौरी थोडी शांत झाली.
"अ........हम....असेलही....." ती थोड़ी गोंधळून गेली होती. एकीकडे तिला वाटत होतं की तो भास नाही तर खरंच आपण त्या मैदानावर खूपशी मुलं आणि मोठी माणसं बघितली. आणि त्याचवेळी ते क्षणात रिकामं झालेलं मैदान बघून आपल्यला भासच झाला असावा अस वाटत होतं. या विचारांच्या गोंधळामुळे गौरीचा चेहेरा अगदी उतरून गेला. तिचा उतरलेला चेहेरा बघून तिच्या आईला देखील वाईट वाटलं. तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिची आई म्हणाली,"बरं ग बेटा... जर तू आज तिथे इतकी मूलं बघितली आहेस तर मग ती मूलं उद्या पण येणारंच न? मग उद्या बघू आपण. चल तुझी व्ययामाची वेळ झाली." गौरीने देखील मनातला उदासपणा बाजूला ठेवत आईच्या मदतीने व्यायाम करायला सुरवात केली.
क्रमश:

पुढे काय होणार आहे, याची उत्सुकता लागली आहे.
ReplyDeleteThank u! पुढच्या शुक्रवारी पुढील भाग नक्की
Deleteखूपच गुंतवून ठेवणारी कथा आहे!!पहिल्यांदा तुमची माफी मागतो कि मागच्या काही तुमच्या कथा वाचता आल्या नाहीत,आज सगळ्या एकत्रच वाचल्या;त्यावरून एक गोष्ट जाणवली की तुम्ही तुमच्या मोबाईल डीपी मध्ये तुमचा फोटो ठेवला आहे त्याप्रमाणे तुम्ही हातात घेतलेल्या मावळतीच्या सूर्याप्रमाणेच तुमची लेखनशैली मला वाटते जी तेजस्वी,स्वयंप्रकाशी आणि संधीकालाप्रमाणे आल्हाददायक आहे खूप अभिनंदन...🙂🙏👍
ReplyDeleteधन्यवाद अमित! तुझे अभिप्राय खूपच छान असतात. त्यासाठी मनापासून आभार
ReplyDeleteछान। धनंजय गांगल
ReplyDelete