लहानपण देगा देवा!
सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात आणि विशेषतः आता जेव्हा हळू हळू सगळं पूर्व पदावर येत आहे आणि तरीही सर्वच वर्गातील शहाण्या-सुरत्या लोकांना आर्थिक ताण जाणवायला लागला आहे; भविष्याचा विचार करून मानसिक ताण जाणवतो आहे. अशा वेळी अनेकांच्या मनात येत असेल......
लहानपण देगा देवा। मुंगी साखरेचा रवा।।
परत एकदा लहान व्हावं आणि सध्याचे हे ताणाचे दिवस निघून जावेत; ही भावना असूच शकते. विशेषतः आता या काळात जेव्हा आपण आपल्या जुन्या मित्र-मैत्रिणींना संपर्क केला आहे आणि त्यांच्याशी गप्पा मारल्या आहेत; तेव्हा परत एकदा लहान व्हावं आणि या जवाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन परत लहानपणीचं निरागस आणि जवाबदारी नसणारं आयुष्य जगावं असं वाटत असणार.
पण मला काय वाटतंं सांगू का? प्रामाणिकपणे विचार केला तर आपल्याला खरंच आपलं लहानपण हवं असतं का? की फक्त त्यावेळचा निरागसपणा आणि जवाबदारी नसणं जास्त भावतं? कारण लहानपण म्हंटल की प्रत्येक निर्णयासाठी मोठ्यांवर अवलंबून राहाणं आलच न? शाळा आली; अभ्यास आला... नावडते विषय परत एकदा आलेच की. गृहपाठ.... निबंध..... शास्त्र विषयाचे व्यवसाय पूर्ण करणं आलं. संध्याकाळचा सवंगड्या बरोबरचा खेळ रंगात आलेला असताना परीक्षा जवळ आली म्हणून आईने लवकर बोलावलं की काही एक न बोलता घरात येऊन अभ्यासाला बसणं देखील आलंच. आपल्या आयुष्यातले अनेक निर्णय आपल्या पालकांनी घेतलेले असतात त्यावेळी.... आपल्याला पटो किंवा न पटो. आपण कसे शहाणे-समंजस आहोत.... पुढे जाऊन वाया जाणार नाही.... याची आई वडिलांना सतत खात्री द्यावी लागतेच न?
त्यामुळे लहानपण मागताना आपण हा विचार नक्की करायला हवा की आपल्याला लहानपण हवं आहे की या वयाची जवाबदारी नको आहे. आता आपण तुकाराम महाराजांच्या या संपूर्ण अभंगाचा थोडा विचार करूया.
लहानपण देगा देवा! मुंगी साखरेचा रवा!!
ऐरावत रत्न थोर! त्यासी अंकुशाचा मार!!
जया अंगी मोठेपण! तया यातना कठीण!!
तुका म्हणे बरवे जाण! व्हावे लहानाहून लहान!!
महापुरे झाडे जाती! तेथे लव्हाळे वाचती!!
यात खरं तर तुकाराम महाराजांनी असं कुठेही म्हंटलेलं नाही की आपण परत लहान व्हावं. या अभंगातून त्यांनी लहान मुलांच्या मनाचा कोवळेपणा आपण कायम अंगी बाणवावा असं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही जसजसे मोठे होत जाता तसतशा जवाबदाऱ्या वाढणारच आहेत आणि त्यातून जे निर्णय घेतले जाणार आहेत त्याच्या चांगल्या/वाईट परिणामांची जवाबदारी देखील आपलीच असणार आहे.(जया अंगी मोठेपण! तया यातना कठीण!!) त्यामुळे आपण आपलं मन लहान मुलांप्रमाणे लवचिक ठेवावं असा देखील या अभंगाचा अर्थ होतो. (महापुरे झाडे जाती! तेथे लव्हाळे वाचती!!)
त्यामुळे परत एकदा लहान व्हावं असं म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू की आपल्या मनात एक कोवळं, लवचिक आणि लहानपणाच्या स्वच्छ मनासारखं एक मन जपू. वय आणि जावाबदाऱ्या कितीही वाढल्या तरी हेच निरागस मन आपल्याला यासर्वातून निभावून जाण्याची शक्ति देईल.

It is ok
ReplyDeleteInteresting
ReplyDeletethank u
Delete