गूढ (भाग 3)
चंद्रभान विचार करायला लागला. काय झाल असेल नक्की? निशा म्हणजे नक्की कोण आहे? ती राजनकडे कामाला होती. याचा अर्थ ती खरच एक जिती-जागती मुलगी आहे. पण मग तिचा त्या गावाशी आणि त्या वाड्याशी काय संबंध आहे? असं अचानक चांगली नोकरी सोडून ती तिथे का निघून गेली? बरं या सगळ्याचा माझ्याशी काय संबंध असावा? कॉलेजमध्ये असताना त्या बाजूने जात असताना काहीतरी ऐकलं होतं त्यावरून आपण एक कथा लिहीली. पण आपण जी कथा लिहिली आहे तसंच काहीसं तिथे घडलं आहे असं या मीराताई आत्ता आपल्याला सांगत आहेत. पण तरीही मी लिहिलेल्या कथेचा आणि निशाचा काय संबंध? ती आपल्यकडे मदत मागते आहे; हे तरी कशावरून? खूप विचार करूनही चंद्रभानला त्याच्या कोणत्याही प्रश्नांचे उत्तर सापडले नाही. म्हणून मग त्याने उमरगावला जाण्याचा निर्णय घेतला... त्याला आता उत्सुकता होती ती त्याने लिहिलेली कथा आणि निशा यांचा संबंध काय असेल? आणि जरी तिथे पोहोचल्यावर दुसरं काही नाही समजलं तरी अजून एखाद्या कथेसाठी काहीतरी सुचू शकेल; असा विचार त्याने केला. अर्थात त्याने याबद्धल कोणालाही काहीही सांगायचे नाही असं ठरवलं आणि तसाच झटपट आवरून आणि केवळ एक लहानशी बॅग घेऊन तो निघाला. त्याला असं तडकाफडकी निघताना बघून मीराताईंना आश्चर्य वाटले.
"साहेब उमरगावला निघालात? उगाच न्हाई म्हनू नका. दुधखुली न्हाई मी. जाता तर जावा. पन एक सांगते... दुसऱ्याला मदत करताना आपन कोन हाओत ते ईसरायचं नसतं. भले तुमाला कुणीबी कायबी सांगू दे. हे कायम मनात जागवा की तुमी मोठे लेखक हात. हित मुंबईत तुमचं खरं आयुष्य हाय. हिथ तुमाला परत यायाचं हाय. दुसरं म्हंजी गावात जाल तर पयले मंदिरात जा. पुजाऱ्याला भेटा. त्यो तुमाला चार शानपनाच्या गोष्टी सांगलं; त्या पण ऐकून घ्या. मंग हव ते करा." मीराताई म्हणाल्या.
"काळजी करू नका मीराताई. मी काहीही विसरणार नाही आहे. आणि तुम्ही म्हणता आहात तर अगोदर देवळात नक्की जाईन आणि मगच काय करायचं ते ठरविन. येऊ मी?" चंद्रभान म्हणाला.
"या साहेब. अंधारून जाईल न्हाईतर. वेळेत जावा तुमी." इतकेच उत्तर देऊन मीराताई त्यांच्या कामाकडे वळल्या. आता त्या अजून काही बोलणार नाहीत हे लक्षात येऊन चंद्रभानदेखील निघाला. त्याने स्वतःच गाडी चालवत उमरगावाला जायचं ठरवलं आणि गाडी सुरु केली.
सूर्य मावळतीला लागला होता. थंडीचे दिवस असल्याने खूपच लवकर अंधारून आलं होतं. चंद्रभान गाडीने गावात शिरला तोवर चांगलाच उशीर झाला होता. पारावर आता कोणीच दिसत नव्हतं. मात्र दूर देवळात आरती चालू असल्याचा आवाज येत होता. त्या आवाजाच्या दिशेने चंद्रभानने गाडी वळवली. देवळाजवळ पोहोचून त्याने गाडी थांबवली आणि पायातले बूट काढून देवळात प्रवेश केला तोवार आरती संपली होती. लोकं प्रसाद घेऊन आपापल्या घराकडे वळले होते. चंद्रभान गाभाऱ्याजवळ गेला आणि त्याने हात जोडले.
"शहराकडून आलात वाटतं?" त्याचा नमस्कार आटपला आणि तो मागे वळला तर प्रसाद घेऊन समोरच उभ्या असणाऱ्या पुजारीबुवांनी चंद्रभानला विचारलं.
"हो!' चंद्रभान म्हणाला.
"इथे कसे काय? काही काम होतं की कोणाकडे पाहुणे म्हणून आला आहात?" पुजारीबुवांनी विचारलं.
"काम आहे असंच म्हणावं लागेल." चंद्रभान थोडा विचार करून म्हणाला. मग पुजारीबुवांकडे बघत त्याने म्हंटलं,"तुम्ही या देवळातले पुजारी का?" पुजारीबुवांनी मान होकारार्थी हलवली. त्यावर चंद्रभान म्हणाला,"पुजारीबुवा, मी एक लेखक आहे." अजूनही त्याला काय आणि कसं सांगावं ते समजत नव्हतं. कारण तो नक्की कशासाठी आला होता ते त्याचे त्याला देखील माहित नव्हतं. त्यामुळे तो शब्दांची जुळवाजुळव करत होता.
"अरे वा! म्हणजे आज शहराकडचे कोणी मोठे पाहुणे आले आहेत आमच्या गावात. कोणाकडे आला आहात आपण? काय काम आहे?" पूजारीबुवांनी हसत हसत विचारलं.
"मी...... म्हणजे..... कोणाकडे आलो आहे असं नाही. पण मी भय किंवा रहस्य कथा लिहितो." असे म्हणून चंद्रभान मुद्दाम थांबला. 'भय' आणि 'रहस्य' हे दोन शब्द ऐकून पुजारीबुवा एकदम ताठ झाले. "हे बघा लेखक महाशय, इथे या गावात तुम्हाला कथा लिहिता येईल असं काही नाही. लोकं काहीही बोलतात. तुम्ही आपले आल्यासारखे आजची रात्र रहा आणि उद्या निघा कसे. कोणाकडे उतरणार आहात?" पुजारीबुवांनी विषय आवरता घेत विचारलं.
"कोणाकडे असा नाही हो. आणि मी कथेचं सूत्र मिळावं म्हणून आलोच नाही." चंद्रभानने घाई-घाईने उत्तर दिलं.
"मग? असं अचानक उठून इथे का आलात राव? काही कामाने यायचं होतं तर वेळेत आला असतात ना... दिवसा-उजेडी. हे असं आड वेळी आला आहात आणि म्हणता आहात काही कारण नाही इथे येण्याचं! बरं, कोणी ओळखीचं नाही म्हणता. कोणाकडे आलेला नाहीत म्हणता. अहो, आम्ही गावातली माणस साधी असतो वेडी नाही." आता पूजारीबुवांचा स्वर रुक्ष व्ह्यायला लागला होता. त्यांना अचानक चंद्रभानशी बोलण्याची इच्छा राहिली नव्हती आणि ते त्यांच्या एकूण देहबोलीतून दिसत होतं.
"पुजारीबुवा....." त्यांना हाक मारून क्षणभर चंद्रभान थांबला. आणि मग आर्जवी स्वरात म्हणाला,"काका.... प्लीज माझ म्हणणं ऐकून घ्या आणि मग ठरवा मी नक्की काय केलं पाहिजे. तुम्ही म्हणाल तसं करेन; तुमच्या शब्दाबाहेर जाणार नाही. मी वाचन देतो." आणि त्याने उठणाऱ्या पूजारीबुवांचा हात धरला.
पुजारीबुवांनी एकदा अंधारात विरघळणाऱ्या गावाकडे बघितलं आणि मग चंद्रभानकडे! चंद्रभान आशेने त्यांच्याकडे बघत होता. क्षणभर विचार करून पुजारीबुवा त्याच्या शेजारी बसले. चंद्रभान पुजारीबुवांकडे बघत म्हणाला;"मी खूप गोंधळून गेलो आहे काका. काय बरोबर आहे... किंवा खरं आहे मला समजत नाही आहे. बरं, घरात कोणी वडील माणूस देखील नाही की मी त्यांना काही विचारीन." चंद्रभान अस्वस्थ आणि दु:खी आवाजात म्हणाला.
चंद्रभानचं बोलणं ऐकून पूजारीबुवांचं मन थोड पाझरलं. त्यांनी चंद्रभानचा हात हातात घेतला आणि म्हणाले,"बोल बाळा. अरे मी उठून निघून जात होतो ते तुझ्याच भल्यासाठी. आता गावात तूला कोणीच भेटणार नाही. मला वाटलं, मी गेलो की तूदेखील निघून जाशील. जे तुझ्याचसाठी चांगलं होतं. पण भगवंताच्या मनात दुसरंच दिसतं." असं म्हणून त्यांनी देव्हाऱ्याच्या दिशेने हात जोडले आणि चंद्रभानकडे वळून ते म्हणाले,"बरं... ते राहुदे. सांग तुला काय सांगायचं आहे?"
"काका.... काल माझा इंटरव्हू होता. माझा एक मित्र या क्षेत्रात आहे; त्यानेच मला बोलावलं होतं. हे काहीसं वेगळं होतं म्हणून मी थोडा लवकरच पोहोचलो. तिथे मला एक निशा नावाची मुलगी भेटली. माझा मित्र मला म्हणाला तिच माझा इंटरव्यू घेणार होती. अजून तयारी होत होती. म्हणून मग मी आणि निशा आम्ही दोघे गप्पा मारत बसलो काही वेळ. नंतर माझ्या मित्राचा असिस्टंट बोलवायला आला आम्हाला. निशाला तयारी करायची होती म्हणून मी त्याच्या बरोबर गेलो. मला एका सेटजवळ नेऊन तो मुलगा गायब झाला. मी त्या मुलाची आणि माझ्या मित्राची बराचवेळ वाट बघितली. पण कोणीच दिसेना तेव्हा मग मी मित्राला हाका मारायला लागलो. त्यात मी धडपडलो आणि बरेच लोक आले. माझा मित्र देखील तिथे आला. त्याला मी म्हंटलं की मी आणि निशा तुझ्याच केबिनमध्ये गप्पा मारत बसलो होतो. तर तो माझ्याकडे विचित्र नजरेने बघायला लागला. मी एकूण घडलेला प्रसंग त्याला सांगितला तर त्याने मला सांगितलं की निशा पूर्वी त्याच्याकडे काम करत होती, पण मग तिने राजीनामा दिला आणि त्याचं कारण सांगितलं की ती कोणाचा तरी शोध घेत होती; तिला नुकतंच कळलं होतं की ती व्यक्ती इथे उमरगावात आहे; म्हणून ती उमरगावाला जायला निघणार होती.. ती परत येणार की नाही तेदेखील तिला माहित नव्हतं. त्यामुळे सुट्टी घेण्याएवजी तिने राजीनामाच दिला होता. ते ऐकून मला मोठा धक्का बसला. काही सुचेनासं झालं. कारण काही वेळापूर्वी मी निशाशी बोलत बसलो होतो ते माझ्या दृष्टीने तरी अगदी खरं होतं. त्यामुळे मी खूपच अस्वस्थ झालो. इंटरव्हू देणं मला अवघड वाटायला लागलं. म्हणून मग तसं सांगून मी तिथून निघालो आणि घरी परत आलो. मित्राला काही कळू दिलं नाही.... रात्री मित्र घरी आला तेव्हा परत एकदा त्याच्या बोलण्यातून या गावाचा उल्लेख झाला आणि मला आठवलं की या गावाबद्दल मी पूर्वीदेखील ऐकलं होतं. खूप पूर्वी! त्या अफवेवरून मी एक गोष्ट देखील लिहिली होती तेव्हा. पण मी नक्की काय गोष्ट लिहिली होती ते मला आठवत नव्हतं. म्हणून मग मी ती गोष्ट शोधून काढली आणि वाचायला लागलो. गोष्ट वाचता वाचताच मला झोप लागली; आणि परत एकदा माझ्या स्वप्नात निशा आली आणि म्हणाली की मला माझ्या कथेची आठवण व्हावी म्हणून ती मला सकाळी भेटली होती. मी जागा झालो तेव्हा माझ्याकडे काम करणाऱ्या मीराताई आल्या होत्या. त्यांनी मला जे सांगितलं ते एकून तर मी पुरता हडबडलो काका..." असं म्हणून चंद्रभान क्षणभर थांबला.
"काय सांगितलं त्यांनी तुला?"पुजारीबुवांनी त्याच्या पाठीवर थोपटत अगदी शांत आवाजात त्याला विचारलं.
"काका........... मीराताई म्हणाल्या की त्या घरी येत होत्या तेव्हा त्यांना निशा भेटली होती. त्यांना देखील तिने सांगितलं की तिला माझ्या मदतीची गरज आहे. याचा अर्थ मला भास नव्हता झाला काल सकाळी. हो नं काका?" चंद्रभानने आवंढा गिळला.
चन्द्रभानची हकीकत एकून पुजारीबुवादेखील विचारात पडले. चंद्रभान पुजारीबुवांकडे आशेने बघत होता. पुजारीबुवा बोलावं की नाही अशा विचारात होते. त्यांनी चंद्रभानकडे बघितलं आणि त्याच्या डोळ्यातल्या आशेकडे बघून त्यांना वाटलं की त्यांना जे माहित आहे ते त्यांनी सांगितलंच पाहिजे. त्यांनी गाभाऱ्याच्या दिशेने बघून परत एकदा हात जोडले आणि "शंभो... शंकरा... पाठीशी रहा रे भक्तांच्या" असं म्हणून चंद्रभानशी बोलायला सुरवात केली.
"बेटा, मला तुझं नाव नाही माहित आणि आत्ता तू जे सांगितलं आहेस ते ऐकल्यानंतर तू काय करावंस ते मी सांगू शकत नाही. खरं तर मी तुझ सगळं म्हणणं ऐकून घेणार होतो आणि मग तुला इथून निघून जायला सांगणार होतो. पण आता वाटतं की मला जे माहित आहे ते मी तुला सांगितलंच पाहिजे. तू म्हणतोस ते खरं आहे. ती मुलगी.. निशा... ती खरंच काही महिन्यांपूर्वी इथे या गावात आली होती. कर्मधर्म संयोगाने ती आली ती थेट इथेच याच देवळात आली होती. या गावात तिची पहिली भेट झाली ती माझ्याशीच. तुझं नाव जरी मला माहित नसलं तरी तू लिहिलेली कथा मला माहित आहे....." असं म्हणून पुजारीबुवा थांबले.
त्याची कथा पूजारीबुवांना माहित आहे हे ऐकून चंद्रभानला आश्चर्य वाटलं. "तुम्हाला मी लिहिलेली कथा माहित आहे? अहो; खूप पूर्वी लिहिली होती मी ती कथा. तुम्हाला कशी माहित ती?" चंद्रभानने विचारलं.
"कारण... ती कथा मला निशाने सांगितली. इथेच याच देवळात! ती आली तेव्हा टळटळीत दुपार होती. मी आत गाभाऱ्यात जप करत बसलो होतो. तिने मला हाक मारली. मी बाहेर आलो. थोडावेळ इथल्या तिथल्या गप्पा मारल्यानंतर तिने मला तुझी कथा दाखवली आणि विचारलं की 'असा कोणता वाडा आहे का इथे? असं कोणी कधी आलं होतं का इथे?' ती कथा ऐकून मला थोड आश्चर्य वाटलं. कारण खरातांचा वाडा आहे या गावात आणि वेगवेगळ्या दंतकथा देखील आहेत त्या वाड्याबद्धल. म्हणूनच तर त्या वाड्याकडे कधीच कोणी जात नाही. आता त्या वाड्याच्या आत कोण रहातं.. ते काय करतात.. कोणालाही माहित नाही. हा... पण आत कोणीतरी रहातं हे मात्र खरं. आता कसं म्हणशील तर वाड्यातला वावर जाणवतो बाहेर. पण त्या जाणवणाऱ्या वावरामुळेच त्या वाड्याबद्धल जास्त अफवा निर्माण झाल्या आहेत. आणि हो... काही वर्षांपूर्वी असा कोणी मुसाफिर आला होता म्हणे गावात. असाच संध्याकाळच्या वेळी आणि थेट वाड्याकडे गेला, असं देखील म्हणतात. मात्र तो आलेला कोणालाच कधीच दिसला नाही. एकट्या वेड्या म्हादुने त्याला पहिलं होतं. पण म्हादुला गावातले लोकं वेडा म्हणतात. त्यामुळे त्याच्यावर कोण विश्वास ठेवणार. मी निशाला हेच सांगितलं. तिने त्या म्हादुला भेटायची इच्छा व्यक्त केली. मी तिला म्हादू कुठे राहतो ते सांगितलं. पण त्याचवेळी हे देखील तिला विचारलं की उगाच उत्सुकतेपोटी कशाला अशा आपल्या आवाक्यापलीकडच्या गोष्टींमध्ये पडते आहे. त्यावर ती क्षणभर काहीच बोलली नाही. पण तिची नजर हरवली होती. माझ्या प्रश्नाचं उत्तर तिने दिलं नाही पण ती म्हणाली,'जर ही कथा खरी असेल तर अजून या कथेचा शेवट झालेला नाही पुजारी काका.' मला कळलंच नाही तिला काय म्हणायचं आहे. पण तिच्या चेहेऱ्यावरचा निर्धार बघून मी काहीच म्हंटलं नाही. तिने म्हादुच्या घराचा रस्ता समजून घेतला आणि निघून घेली. त्यानंतर मात्र मला माहित नाही तिचं काय झालं. दुसऱ्या दिवशी म्हादुला भेटून तिच्याबद्दल विचारवं असं मनात आलं होत माझ्या. पण मुळात तो वेडा आहे. त्यामुळे तो काय सांगेल याचा भरवसा नव्हता. त्यात आमच्या गावातले लोक त्या वाड्याबद्दल बोलायला तयार नसतात. त्यामुळे म्हादुला कोणा मुलीबद्दल आणि त्या वाड्याबद्दल मी विचारतं होतो हे जर त्यांना कळलं असतं तर मला त्याचा त्रास झाला असता. म्हणून मग मी तो विषय मनात मागे टाकून दिला. आणि मग तू आत्ता तिच्याबद्धल बोलेपर्यंत मी तिला विसरूनही गेलो होतो." पुजारीबुवा बोलायचे थांबले.
क्रमशः

परत एकदा उत्कंठावर्धक.
ReplyDeleteछान
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDelete