गूढ (भाग 2)
गूढ (भाग 2)
...................................उमरगाव कोकणातलं एक लहानसं गाव. इतकं लहान की जेम-तेम पाच-सहाशेच कुटुंब असतील. ताडा-माडांनी नटलेलं, सुंदरसा समुद्रकिनारा लाभलेलं एका कोपऱ्यातलं स्वतःमधेच सुखी असलेलं असं गाव होत ते. गावात एक मंदिर होतं. खूप जुन बांधकाम होत त्याच. मंदिरात अनेक देव होते पण शंकराची पिंडी गाभाऱ्याच्या मध्यावर असल्याने ते मंदिर शंकराचं मंदिर म्हणून ओळखलं जायचं. प्रचंड मोठा मंडप होता मंदिराचा. आजूबाजूला आवार देखील होतं. गावातले मोठे समारंभ या मंडपातच व्हायचे. गावात तशी मोजून पाच-पन्नास ख्रिश्चन कुटुंब देखील होती. पण म्हणण्यापुर्ती ख्रिश्चन... बाकी त्यांचे सगळे व्यवहार इतर गावकऱ्यांसारखेच होते. देवळात वेगवेगळ्या दिवशी त्या-त्या दिवसांप्रमाणे कीर्तनं-भजनं चालायची; पण कोणाचा कोणाला त्रास होत नव्हता. सगळं गाव आनंदाने मिळून-मिसळून रहात होत.
गावाच्या उत्तरेला मंदिरा इतकाच जुना एक वाडा होता. त्याच जुन्या धाटणीच्या बांधणीचा. मोठं आवार असलेला वाडा एकलकोंडा वाटायचा कारण आवारात आंबा फणसाबरोबरच वड पिंपळाची झाडे देखील खूप होती. चिंचा, नारळ, पोफळी... म्हणाल ती झाडं. आणि गिनती एक किंवा दोन नाही तर दहा-वीस च्या संख्येत सहज. दोन विहिरी देखील होत्या. एक वाड्याच्या मागल्या अंगाला आणि एक पुढे. वाडा कौलारू होता. दुमजली! पक्क बांधकाम. भिंतींची जाडीच मुळी तीन-चार फुट असेल. खोल्या प्रशस्त. वेगळ्या कपाटांची गरजच नव्हती. भिंतीतली अंगची कपाटंच खूप होती. त्यामुळे ती प्रशास्तता अंगावर यायची. मोठ्या खिडक्या. पुरुष-पुरुष उंचीच्या. चौपदरी वाडा. मागील अंगणात चार फुटी सुंदर तुळशी वृंदावन.
प्रत्येक प्रदेशाचा आपला असा एक स्वभाव असतो. तसा कोकणाचा आहे. एकूण जगात होणाऱ्या उलाढाली-राजकारण यावर चावडीवर बसून खूप काथ्याकुट होत असतो. पण शेजारच्या घरात कधी आवाज चढला तर त्याकडे मात्र सगळे दुर्लक्ष करतात. म्हणून असेल.......... किंवा गावातल्या प्रत्येकालाच माहित असेल की तो वाडा आणि त्यात रहाणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे नसते, त्यामुळे मनात अनेक प्रश्न असूनही गावकरी कधी वाड्याचा किंवा त्यात राहणाऱ्या लोकांचा उल्लेखही करत नव्हते. जणूकाही तो वाडा गावात असूनही नव्हता.
थंडीचे दिवस होते. अंधारून लवकर येत असे. त्यात उंच-उंच माड असल्याने काळोख अजून गडद भासायचा. गावाकडे येणारी एसटी तीन कोसावारच थांबायची. तिथून मग बांधांवरून चालत गावाकडे यावं लागायचं. गाव कोकणातलं असल्याने 'वेशी तितक्या गोष्टी' म्हणी प्रमाणे त्या गावातसुद्धा अनेक वंदता होत्याच. त्यामुळे संध्याकाळी पाच नंतर उमरगावाकडे कोणी येत नसे. अगदी गावातलं माणूस असलं तरी निघायला उशीर झालाच तर आहे तिथेच वस्तीला राहून दुसऱ्या दिवशीची गाडी पकडून येत.
पण हे झालं गावातल्याच लोकांसाठी. नवीन येणाऱ्या प्रवाशाला हे कस माहित असणार? संध्याकाळचे सात वाजून गेले होते. बांधावरून तोल सांभाळत येणारा शहरी बाबुसुद्धा नवीनच होता. शेताला दुपारीच पाणी पाजलेलं होतं. पण थंडीचे दिवस असल्याने बांधाकडे चिखल तसाच होता. बाबूचे बूट चिखलाने पार माखून घेले होते. चिखलातून चालताना फच-फच असा मोठा आवाज होत होता. त्यामुळे बरोबर अजूनही कोणीतरी चालत आहे असा भास होत होता. बाबू थांबून सारखं मागे वळून बघत होता. पण तसं कोणीच दिसत नव्हतं त्याला. स्वतःवर वैतागत अंधारातून धडपडत बाबू गावात पोहोचला तेव्हा चावडीच्या गप्पा आटपत आल्या होत्या. घरा-घरातून सुरमई-कोलमिच्या रश्याचा आणि रटरटणाऱ्या भाताचा सुगंध दरवळायला लागला होता. त्यामुळे पुरुष मंडळी मुलांना हाकून घराकडे चालती झाली होती. एकटा म्हादू चीलीमिचा झुरका घेत पारावर बसला होता. दोन-चार झुरके मारून तो देखील खोपटीकडे वळणार होता. तितक्यात बाबू तिथे पोहोचला.
"नमस्कार" बाबूने म्हादुकडे बघत म्हंटले.
"राम राम." म्हादूने प्रतिउत्तर दिले आणि बाबूचे निरीक्षण करायला लागला. गुढग्यापर्यंत असलेले आणि आता चिखलाने भरलेले बूट. हातात मोठी पेटी. खाकी विजार आणि बुशर्ट. डोक्यावर इंग्रजासारखी टोपी. ते रूप बघून म्हादुला आश्चर्य वाटलं आणि हसायला देखील आलं. "कोनिकडचं पाहुनं तुमी?" त्याने बाबुला विचारलं.
'मी शहरातून आलो आहे. उमरगाव ते हेच ना?" बाबूने हातातली पेटी खाली ठेवत विचारले.
म्हादू हसला आणि म्हणाला,"हो हो! हेच उमरगाव. कोणाकडे आलात जणू?"
"खरातांकडे." बाबूने म्हंटले आणि सैलावून बसलेला म्हादू दचकला. त्याने चीलीमिचे झुरके मारणे बंद केले आणि एकूणच आपलं बस्तान आवरायला सुरवात केली.
"कुठे आहे हो वाडा? तुमच्या गावात अजिबात उजेड नाही. मी नवीन आहे. जरा सोबत कराल का? मला वाड्यावर वेळेत पोहोचायचे आहे. फारच उशीर झाला आहे मला." बाबू आपल्याच नादात होता. त्याला अजून म्हादूची लगबग लक्षात आली नव्हती.
"वाडा ना? त्या तिकडे पार गावाच्या पल्याडच्या अंगाला. बर मी येतो पावन. वाईच घाई होती." अस म्हणून म्हादू बसली घोंगडी खांद्यावर मारून चालुदेखील पडला.
बाबू एकदम गोंधळून गेला म्हादुच्या गडबडीने. म्हादू जात असलेल्या दिशेने तोंड करून तो मोठ्याने म्हणाला,"अहो.. अहो.... मागल्या अंगाला म्हणजे नक्की कुठे?"
पण उत्तर द्यायला म्हादू थांबलाच नव्हता. बाबू अजूनच वैतागला आणि अचानक त्याला मागून आवाज आला....
"खरातांच्या वाड्याकडे जायचं आहे का तुम्हाला? चला मी तिथेच जात आहे."
अचानक मागून आलेल्या आवाजामुळे दचकून बाबूने मागे वळून बघितले. किनऱ्या आवाजातले ते वाक्य म्हादुने देखील ऐकले होते. पण मागे वळून बघायची त्याची हिम्मत झाली नाही. तो तसाच पुढे पुढे चालत अंधारात त्याच्या घराकडे निघून गेला. बाबूच्या मागे एक अप्रतिम सुंदर तरुणी उभी होती. तिने ख्रिश्चन लोकांसारखा काळा झगा अंगात घातला होता. हातात एक कंदील होता. असं अचानक एका सुंदर तरुणीला अशा गावात इतकं उशिरा स्वतःहून मदतीला आलेलं पाहून बाबू बावचळला आणि दोन पावलं मागे सरकला.
"चिंता करू नका. या माझ्या मागून." ती तरुणी शांतपणे म्हणाली आणि बाबू येतो आहे की नाही हे न बघता वळून चालूही पडली.
बाबू तिच्यामागून चालताना विचार करत होता. खरातांचा वाडा दाखवायला या बाईला आपल्या बरोबर येण्याचे कारण काय असेल? रस्ता सांगितला असता तरी आपल्याला जाता आलच असत की. जणूकाही बाबूचे विचार ऐकायला यावेत अशा प्रकारे ती मागे वळली आणि म्हणाली, "माझं म्हणत असाल तर मी तिथेच असते. त्यामुळे मुद्दाम नाही येत तुम्हाला रस्ता दाखवायला." बाबू तिच्या बोलण्याने भलताच दचकला. पण काहीच झाल नाही अश्या प्रकारे म्हणाला,"अहो पण मी काहीच म्हणत नाही आहे. उलट तुम्ही मला इतकी मदत करता आहात त्याबद्दल धन्यवाद."
परत पुढे बघून चालायला सुरवात करत ती म्हणाली,"तुम्ही आभार मानून घ्या आताच. नंतर वेळ मिळेल-नाही मिळेल."
तिच ते गूढ वागणं आणि बोलणं बाबुला अस्वस्थ करत होतं. पण आता बरंच अंधारून आलं होतं. काहीच दिसत नव्हतं. गावातही पुरतं सामसूम झाल होतं. त्यामुळे तिच्याशिवाय कोणी मदत करणं शक्य नव्हतं. त्यामुळे तो काही बोलत नव्हता. सवयीचा रस्ता असल्याने असेल बहुतेक पण ती मात्र भराभर चालत होती. त्यामुळे तो मुकाट तिच्यामागे चालत राहिला.
बराच वेळ चालल्यानंतर ती अचानक थांबली. बाबुला कळेना ती अशी अचानक का थांबली. पण क्षणभराने डोळे सरावले आणि त्याला तिच्या पुढे असलेले लाकडी गेट दिसले.
"हाच खरातांचा वाडा. जा तुम्ही आत. अंधार असला तरी फर्लांगभर चाललात की वाड्याचा दरवाजा लागेल." ती त्याच्या वाटेतून बाजूला होत म्हणाली.
"अरे तुम्ही नाही येत आत?" बाबूने गोंधळून विचारले. एव्हाना त्याचं असं मत झालं होतं की ती तरुणी खरातांच्याकडे कामाला असावी आणि त्याच वाड्यात राहात असावी. त्याने आजूबाजूला बघितले पण कोणतेही घर दिसत नव्हते. 'मग ही अशी इथून कुठे जाणार?' त्याच्या मनात आले.
"मी वाड्याच्या मागच्या अंगाला असते. तुम्हाला माझी गरज न लागलेलीच बरी." ती म्हणाली आणि त्याला गेट उघडून दिले.
काही न बोलता बाबू आत शिरला आणि वाड्याच्या दिशेने चालू पडला. वाडा तसा आतच होता. त्यात आता गुडुप्प अंधार झाला होता. कुठेही नावालाही उजेड नव्हता. आजूबाजूला मोठ-मोठी झाडं होती. त्यामुळे बाबूला अस्वस्थ वाटायला लागले. परत मागे वळून गावात कोणाकडेतरी रात्र काढावी आणि सकाळी वाड्यावर जावे असे त्याच्या मनात आले. पण असा विचार करेपर्यंत तो वाड्याच्या दरवाज्यासमोर उभा होता. दारावर एक कंदील लटकत होता. त्याच्या उजेडात त्याने एकदा त्या भल्यामोठ्या दरवाज्याचे निरीक्षण केले आणि कोयंडा हलवून दार वाजवले. केवढातरी मोठा आवाज झाला. आतून खोल कुठूनतरी "कोssssण?" असा आवाज आला आणि त्याबरोबरच दरवाज्याच्या दिशेने कोणीतरी येत असल्याचा आवाज आला.
"मी बाबू. शहरातून आलो आहे." नक्की काय उत्तर द्यावे हे न कळून बाबूने जे सुचले ते उत्तर दिले.
दरवाजा उघडला गेला; आत कंदील घेऊन एक मध्यम वयातली स्त्री उभी होती. तिच्या चेहेऱ्यावर भलताच गोंधळलेला आणि घाबरलेला भाव होता. तिने कंदील वर केला खरा पण बाबुला बघण्यापेक्षा त्याच्या मागे कोणी आहे का याचा ती अंदाज घेत होती असं बाबुला वाटलं. जेमतेम क्षणभर त्याच्याकडे बघितल-न बघितल्यासारखं करून तिने खरखरीत आवाजात बाबुला विचारलं, "कोण हवाय तुम्हाला?"
"मी बाबू." काय उत्तर द्यावे हे न सुचून बाबू म्हणाला.
"बर! मग?" तोच खरखरीत आवाज.
"मग? मग काही नाही. उमरगाव मधल्या खरातांच्या वाड्यासाठी व्यवस्थापक हवा आहे अशी जाहिरात वाचली. म्हणून मी आलो आहे." बाबूने माहिती दिली.
"हो. हवा आहे हे खरं. मग?" त्याच आवाजातला प्रश्न. नजर मात्र बाबुच्या पल्याड लागलेली. "नोकरी मला मिळेल का ते बघायला आलो आहे. फार गरज आहे हो मला नोकरीची. मी जाहीरात आणली आहे." बाबू म्हणाला. अजून काही प्रश्न येऊ नयेत म्हणून त्याने पटकन जाहिरातीचा कागद काढून पुढे केला. बाबूने पुढे केलेला कागद तिने हातात घेतला पण त्याकडे बघितले देखील नाही. आता तिचा आवाज थोडा बदलला होता. तिने बाबुला म्हंटले,"हे बघा.. मला व्यवस्थापक हवा आहे पण त्याने बाहेर राहूनच सगळी व्यवस्था बघायला हवी. तुम्ही कधीही या वाड्याच्या आत यायचे नाही. तसा विचर देखील करायचा नाही. तुमच्या पगाराची काळजी करू नका. तो तुम्हाला महिन्याच्या पहिल्या तारखेला मिळत जाईल." इतकं सगळं ती बोलली तरीही अजूनही तिने बाबुकडे निट बघितले देखील नव्हते. तिची नजर बाबूच्या मागेच लागली होती. त्यामुळे बाबू पुरता गोंधळून गेला होता. हे अस दाराच्या बाहेर उभं राहून बोलत रहाण्याचा त्याला आता वैताग आला होता. त्यात ती बाई त्याला आत घ्यायला तयार नसावी हे त्याच्या लक्षात आले होते. 'बाहेर राहूनच सगळी व्यवस्था बघायची;' म्हणजे नक्की काय आणि कसे करायचे... या विचाराने तो गडबडला होता. बाहेर राहायचे म्हणजे गावात का? तो तर गावात कोणालाही ओळखत नव्हता. आता उशीर देखील इतका झाला होता की परत मागे वळून गावात जागा शोधणं त्याच्या जीवावर आलं होतं. दिवसभर प्रवास आणि त्यानंतरच्या पायपिटीने तो खूप दमला होता.
त्याने आर्जवी आवाजात म्हंटले,"वाहिनी, मला आत येऊ द्या हो. आता इतक्या उशिरा मी गावात कुठे जागा शोधायला जाऊ?"
त्याच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत त्या बाई दरवाजा बंद करायला लागल्या. त्याबरोबर न कळत भांभावलेल्या अवस्थेतल्या बाबूने बंद होणाऱ्या दरवाजात पाय घातला. त्याबरोबर मागून कोणीतरी मोठ्याने हसल्याचा आवाज ऐकू आला. वाड्याच्या आतल्या त्या बाईंच्या डोळ्यात मूर्तिमंत भिती उभी राहिली आणि मग काही न बोलता त्यांनी बाबुला आत घेतले आणि दरवाजा लावून घेतला.
बाईंची इच्छा नसताही आत गेलेला बाबू कधीच बाहेर आला नाही. म्हादू आता म्हातारा झाला आहे. तो आजही पारावर बसून बाबुला भेटल्याची कहाणी सगळ्यांना सांगत असतो. तो घराकडे जायला वळला आणि तीच ती सगळ्या गावाला माहित असलेली पण आता दिसत नसलेली नाजूक आवाजातील मुलगी बाबुशी बोलायला लागली, हे देखील सांगतो तो. खरातांचा वाडा बाबू आत गेल्यापासून बंद आहे आणि कोकणातल्या इतर खऱ्या-खोट्या वंदतांमध्ये या गोष्टीची देखील भर पडली आहे. म्हादू किती खरं सांगतो आहे आणि किती नाही याची गावातल्या लोकांना खात्री नाही. पण त्या घटने नंतर मात्र खरातांच्या वाड्याच्या दिशेने जाणंच काय पण कोणीही गावकरी बघतसुद्धा नाही.......
कथा वाचून संपली आणि चंद्रभान भानावर आला. रात्रीचा एक वाजून गेला होता. कथा वाचताना नकळत त्याने दोन पेग्स घेतले होते आणि पोटात अन्नाचा एक कणही नव्हता. त्यामुळे चंद्रभानचे डोके फारच जड झाले होते. तो तसाच सोफ्यावर आडवा झाला आणि त्याला झोप लागली.
"तुम्ही तुमची ही कथा शोधून वाचावित म्हणूनच मी काल सकाळी तुम्हाला येऊन भेटले होते. कराल ना मदत मला? चंद्रभान! उठा ना! मी तुम्हाला चहा करून देकू का?" निशा चन्द्रभानच्या शेजारी बसून त्याला हलवत विचारात होती.
चंद्रभान दचकून जागा झाला. त्याच डोकं गरगरत होत. क्षणभर आपण कुठे आहोत आणि काय होत आहे हेदेखील त्याच्या लक्षात आलं नाही. त्याने आजूबाजूला बघितलं. पण त्याच्या जवळ कोणीही नव्हत. डोकं गच्चं धरून तो बसून राहिला. आपण खरच आत्ता स्वप्न बघितलं की ती निशा आपल्या बाजूला बसली होती? तो सोफ्यावर बसून विचार करत होता. इतक्यात दाराची बेल वाजली आणि चंद्रभान पुन्हा एकदा दचकला. त्याने घड्याळाकडे बघितले. नऊ वाजून गेले होते. त्याने दार उघडले. दारात मीराताई होत्या. गेली अनेक वर्ष त्याच त्याच्या घरातलं सगळं काम करायच्या. त्याच्यासाठी स्वयंपाकही करून जायच्या.
आत आल्या आल्या त्यांची बडबड सुरु झाली. "साहेब मी नेहेमीसारखी आठला येऊन गेली की. पण तुम्ही आज दार आतून लावून घेतलं होतं. म्हनून माझी चावी लागली न्हाई. बर घंटी वाजवली तरी तुम्ही दार उघडलं न्हाई. मंग मी पुढचं काम करून परत आले." मीराताईंचे हाताने काम आणि तोंडाने बडबड असं चालू झालं होतं. चंद्रभान सोफ्यावर डोकं धरून बसला होता. मीराताईंनी त्याच्याकडे बघितलं. "साहेब बरं नाही का वाटत?" त्यांनी आस्थेने विचारलं.
"ताई जरा कडक चहा करून देता का मला? डोकं दुखत आहे खूप." चंद्रभान म्हणाला.
"हो साहेब." अस म्हणून मीराताई स्वयंपाकघराकडे वळल्या. त्यांनी आत जाताच आतून चंद्रभानला विचारलं,"साहेब, कुनी आलंत का?"
चंद्रभान त्या प्रश्नाने दचकला. "का हो?" त्याने विचारलं.
"न्हाई... चहाची तयारी हित हाय ना. म्हणून म्हंनल. आलंबी बाहेर काढून ठेवलेलं दिसतय न." मीराताई म्हणाल्या.
त्यांचं बोलणं ऐकून चंद्रभान अस्वस्थ झाला. "नाही हो ताई. मीच करत होतो चहा." अस म्हणून तो आत खोलीत गेला. खोलीत त्याच्या पलंगावर काल तो वाचत असलेली कथा उघडी पडली होती आणि पानं फडफडत होती. चंद्रभानला ती कथा आत पलंगावर कोणी ठेवली हे कळत नव्हते. कारण त्याला आठवत होते त्याप्रमाणे तो कथा वाचत बाहेर सोफ्यावर बसला होता. नकळत तो त्या दिशेने वळला आणि फडफडणारी पानं त्याने हातात घेतली.
कथेचं शेवटचं पान चंद्रभानच्या समोर आलं. आणि तो शेवट वाचून चंद्रभानच्या हातातून कथा गळून पडली. तो खूप घाबरला आणि धडपडत परत बाहेर आला. कारण काल रात्री त्याने वाचलेल्या शेवटच्या ओळीच्या पुढे अजून काही शब्द उमटले होते. कितीही प्रयत्न केला तरी ते शब्द चंद्रभानच्या नजरेसमोरून हलत नव्हते...........
...........आत गेलेला बाबू कधीच बाहेर आला नाही. म्हादू आता म्हातारा झाला आहे. तो आजही पारावर बसून बाबुला भेटल्याची कहाणी सगळ्यांना सांगत असतो. तो घराकडे जायला वळला आणि तीच ती सगळ्या गावाला माहित असलेली पण आता दिसत नसलेली नाजूक आवाजातील मुलगी बाबुशी बोलायला लागली, हे देखील सांगतो तो. खरातांचा वाडा बाबू आत गेल्यापासून बंद आहे आणि कोकणातल्या इतर खऱ्या-खोट्या वंदतांमध्ये या गोष्टीची देखील भर पडली आहे. म्हादू किती खरं सांगतो आहे आणि किती नाही याची गावातल्या लोकांना खात्री नाही. पण त्या घटने नंतर मात्र खरातांच्या वाड्याच्या दिशेने जाणंच काय पण कोणीही गावकरी बघतसुद्धा नाही.......
खरं तर चंद्रभानची कथा इथेच संपली होती. पण............. त्यापुढे उमटलेले शब्द असे होते.......आणि तरीही ती तिथे जायला निघाली होती. बाबूचं नक्की काय झालं हे तिला माहित करून घ्यायचं होतं आणि जमलं तर त्याला परत आणायचं होतं. म्हणून एकटीच निघाली होती ती... पण तिला खात्री होती तिच्या मदतीला तो येईल!!!
कोण असेल ही 'ती'? चंद्रभान विचार करत होता. 'का बरं तिला त्या बाबूचं काय झालं ते समजून घ्यायचं आहे? आणि ही जी कोणी ती आहे तिला कोणाबद्दल अशी खात्री आहे की तो तिच्या मदतीला जाईलच?'
"साहेब चहा." मीराताईच्या आवाजाने चंद्रभान केवढ्यांदा तरी दचकला. त्याचे ते दचकणे बघून मीराताई हसायला लागली. "साहेब, तुम्ही पन दचकता? न्हाई म्हंनल भुताखेताच्या कथा लिहिता... घरात एकटे रहाता आन खऱ्या मानसाच्या आवाजाने दचकता..... म्हंजी कमाल म्हणायची."
"ताई भय किंवा गूढ कथा लिहिणारा माणूस दचकत नाही असं तुम्हाला का वाटलं? मीसुद्धा एक माणूसच आहे ना?" चंद्रभान मिराताईंकडे बघत म्हणाला आणि त्याक्षणी आपण असाचं काहीसं निशाला म्हणालो होतो ते त्याला आठवलं.
"अवो मानुस आहात तर मानसांची मदत करा की साहेब." अस म्हणून मीराताई परत आत गेल्या.
त्या गेलेल्या दिशेने चंद्रभान काही क्षण बघत बसला. आणि मग त्याने मोठ्याने ताईंना विचारलं,"काय म्हणता आहात तुम्ही ताई? आज हे असं कोड्यात का बोलता आहात तुम्ही माझ्याशी?"
आतून काहीच उत्तर आलं नाही म्हणून चंद्रभानने अजून एकदा अजून थोड्या मोठ्या आवाजात तोच प्रश्न केला. तरी आतून शांतता. आता मात्र तो गडबडला आणि ताई गेलेल्या दिशेने दबकत दबकत जायला लागला. तेवढ्यात ताई झपकन बाहेर आल्या आणि चंद्रभान अजून एकदा दचकला. त्याच्याकडे बघत मीराताई मोठ्याने हसायला लागल्या आणि चंद्रभानला देखील हसू आले.
"काय साहेब? मी पार आत होते म्हनून एकू न्हाई आलं. काय म्हणत होतात?" मिराताईंनी हातातल्या वाळलेल्या कपड्यांच्या घड्या घालत चान्द्रभानला विचारले.
"तुम्ही कोणाच्या मदतीबद्दल म्हणत होतात ताई?" चंद्रभानने परत सोफ्यावर बसत विचारले.
"ती कोनी बया आली होती ना सक्काळी सक्काळी. तिला तुमची मदत हवी म्हन. मी आत येत हुतु आन ती बाहेर उभी हुती. तर मी म्हन्ली कुनाकडं? तर म्हनली तुमच्या सायबाकडं. आन मी काही बोलायच्या आत म्हन्ली सांगा सायबांना मला मदत करायला वो... एकटीच हाय आन अडकली हाय. मी म्हन्ल कोन तुम्ही बाई आन कूट अडकल्या. तर म्हन्ली सायबांना माहित हाय तुमच्या.... सांगा निशाला मदत करा. ती वाट बघती हाय. मी बर म्हनून पुढे आली." मीराताई आपल्याच नादात कपड्यांच्या घड्या घालत बोलत होत्या. पण त्यांच्या प्रत्येक वाक्यागणिक चंद्रभान अस्वस्थ होत होता. त्यांनी निशाचे नाव घेताक्षणी तो ताडकन उभा राहिला.
आज आपला साहेब हे असं का वागतो आहे त्याचा उलगडा काही केल्या मिराताईंना होत नव्हता. "काय झालं साहेब?" त्यांनी चान्द्रभानला विचारलं.
"काही नाही मीराताई. बर ते जाऊ दे. तुम्ही कोकणातल्या ना ताई?" त्याने अचानक मिराताईना विचारल.
"हो.. पार रत्नागिरीच्या पन फुड्च गाव हाय नव्ह" त्यांनी हसून चंद्रभानला म्हंटलं.
"तुम्हाला उमरगाव माहित आहे का हो ताई?" चंद्रभानने सावधपणे चेहेऱ्यावर कोणतेही भाव न दाखवता मीराताईंना प्रश्न केला. पण तो प्रश्न एकताक्षणी कपड्यांच्या घड्या घालणाऱ्या मीराताईंचा हात थांबला. त्यांनी चन्द्रभानकडे मोठ्ठे डोळे करत बघितलं.
"तुम्हाला काहून उमरगाव माहित वो साहेब?" त्यांनी चंद्रभानच्या प्रश्नचं उत्तर द्यायचं टाळत त्यालाच उलटा प्रश्न केला.
"ते महत्वाचं नाही ताई. सांगा ना तुम्हाला माहित आहे का ते गाव?" चंद्रभानने परत एकदा प्रश्न केला.
"हो! पन माझ्या गावाकडं जातानाचा तो एक थांबा आहे या पलीकडं मला कायबी माहित न्हाई. बरं तुम्ही चाय संपवा मी दुसऱ्या कामाला जाते. नंतर यीन मी." अस म्हणत मीराताईंनी तो विषय तिथेच निदान त्यांच्यापुरता तरी संपवला. "ताई ती निशा त्याच गावची आहे. तुम्ही म्हणता आहात की मी तिला मदत केली पाहिजे. पण जर मी तिला मदत करायची तर मुळात मला तिचं आणि त्या गावाचं काय नातं आहे ते समजून घेतलं पाहिजे. जर मला तिची मदत करायला त्या उमरगावाला जावं लागणार असेल तर त्यासाठी मला त्या गावाबद्दल पण समजलं पाहिजे ना?" चंद्रभान म्हणाला.
त्याचं बोलणं ऐकून मीराताई विचारात पडल्या. चंद्रभानने त्यांना कळू दिले नाही की त्याला उमरगावाबद्दल अगोदरच माहिती आहे. कारण त्याला मीराताईंकडे काय माहिती आहे ते समजून घ्यायचे होते.
"साहेब गाव तस झ्याक हाये वो. पन म्हणतात तिथं एक वाडा हाय. गावाच्या मागल्या अंगाला. एकटाच... मोठ्ठा... कधी कुणाला तिकड गेलेलं कोणी बघिटलंच न्हाई. म्हन कोणी शहराकडचा बाबू ग्येला होता तिथं आन कधी परत आलाच न्हाई. मंग तवापासून त्या वाड्याबद्दल कोनी बोलत न्हाई. ती पोरगी तिकडची हाय व्हय? नका लागू तिच्या नादी मंग. तुम्हाला काय कराचं हाय? एक तर भूता-खेताच्या गोस्ती लिवता. नकोच ते." मीराताई म्हणाल्या. त्यांना शांत करायला म्हणून चंद्रभान 'बरं' म्हणाला. त्याच्या त्या एका 'बरं' म्हणण्याने मीराताईंचे समाधान झाले आणि त्या त्यांच्या कामाला लागल्या.
क्रमशः

उत्कंठावर्धक
ReplyDeleteधन्यवाद
DeleteVery interesting
ReplyDeleteधन्यवाद
Delete