Friday, January 11, 2019

नमस्कार,

गेल्या शुक्रवारी मी माझ्या मनस्पंदन या ब्लॉगची सुरवात केली. तुमच्यासारख्या रसिक वाचकांचा माझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद लाभला त्याबद्दल मनापासून धन्यवाद! यापुढे दर शुक्रवारी एखादी कविता किंवा एखादा लेख किंवा कथा या ब्लॉगवर लिहिण्याचा मानस आहे.

खरंतर लिहायला कधी लागले ते आठवत नाही; पण साधारण 2013च्या सुमारास जे काही लिहीत होते ते save करून ठेवायला लागले. साधारण त्याचकाळात ही कविता लिहिली. आपल्याला सर्वांनाच आपल्या शाळा-कॉलेजमधले मित्र-मैत्रिणी प्रिय असतात. पण एकदा संसाराला लागलं की हीच दोस्त मंडळी अचानक भेटली की घर किंवा ऑफिस आठवून आपण उगाच उडत काहीतरी बोलून पळ काढतो. असं मनात असूनही थांबून बोलता येत नसल्याची खंत मनात बाळगणाऱ्या सर्वांसाठी ही कविता....

एकदा एका वळणावर;
जुनी मैत्री भेटली...
आठवणी घेउन थांब ना... ऐक ना...
हट्ट धरून बसली!

ऑफिसची वेळ; नव-याचा डबा...
पोरांची शाळा; बॉसचा चेहरा..
आठवल क्षणात सारं;
अन् पाठ केली तिच्याकड़े...

थोड़ी हिरमुसली-थोड़ीशी फुगली...
निघून गेली दुसरीकडे...
जाणवलं तिच हिरमुसणं फुगणं...
पण वेळ नव्हता मला...
मनात होत ऑफिसला वेळेत पोहोचणं!

संध्याकाळी परत ट्रेनच्या डब्यात दिसली..
ओळख दाखवू की नको... या कन्फ्युजनमध्ये होती;
मी हसले... तशी ती पण हसली...
पटकन् जवळ येउन कुशीत शिरली..

'कळत ग मला तुझ्या असण्याच महत्व...
सुटत नाही पण हे संसाराच देण..’
तिला मिठीत घेउन मी मनातच म्हंटल;
स्टेशन आलं म्हणून स्वतःला आवरलं.

ती हसली ... समजूतदार आहे पठ्ठी;
तिच हो ती.......
कुमारी मैत्री विश्वास आठवणी!!!

(कविता कशी वाटली ते प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रियांनी लेखनाचा हुरूप येतो)

27 comments:

  1. खुप छान अप्रतीम

    ReplyDelete
  2. Replies
    1. मनापासून लिहिली आहे न!

      Delete
  3. Very nice ������.

    ReplyDelete
  4. कविता वाचली आणि आवडली. कारण मैत्री या नात्याला दिलेलं मूर्त रुप भावलं. कवितेतल्या वक्तीच्या मनाची हुरहुरही वाचताना जाणवते.

    ReplyDelete
    Replies
    1. ही कविता जरी स्त्रीच्या भावनेने लिहिली असली तरी लग्नानंतर पुरुषांना देखील काही प्रमाणात हे जाणवतच

      Delete
  5. लेखणी ला expiry date नसते,
    खूप दिवसांनी एक छान कविता वाचली....!

    ब्लॉग मध्ये आमनत्रीत केल्या बद्दल धन्यवाद.

    ReplyDelete
  6. खुप छान...
    अगदी बोलकी आणि आपल्या प्रत्येकाची कविता...

    ReplyDelete
  7. मस्त हा एकच शब्द।काही महिन्यांपूर्वी तुझे लेखन मिसळपाव वर वाचले होते.

    ReplyDelete
  8. Cchhan jhaliye kavita. Mhanala bhavli

    ReplyDelete
  9. वहिनी तूम्ही ऐव्हड छान लिहिता कि थोड्याच दिवसात हा ब्लाॅग वाचणारे वाचक ह्यांची संख्या खूप वाढेल असे मला वाटते.
    अभिनंदन

    ReplyDelete
  10. आपण सर्वांनीच आवर्जून ब्लॉग वाचलात आणि प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल मनापासून आभार,

    ReplyDelete
  11. कविता खूप छान...मनाला भावली.

    ReplyDelete
  12. खुप छान कविता!
    छानशा कथेची वाट पाहतोय लवकरच इच्छा पुर्ण होयील अगदी आपल्या पाचवीच्या तू सांगितलेल्या असंख्य गोष्टीं सारख्या.
    अभिनंदन!
    म्हस्कू शिंगाडे.

    ReplyDelete
  13. नक्की कथा लिहिणार आहे इथे. तुला लग्गेच ब्लॉग लिंक पाठवीन. आठवणीने प्रतिक्रिया दिलीस म्हणून बर वाटल म्हस्कु

    ReplyDelete
  14. कविताही छान आहे आणि उपक्रमही छान आहे.....खूप खूप शुभेच्छा.....

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद. दर शुक्रवारी काही ना काही लिहिण्याचा मानस आहे

      Delete