अँड्रॉपॉज एक दुर्लक्षित विषय!
('अँड्रॉपॉज' म्हणजे नक्की काय? ते सांगते आणि माझ्या लेखाला सुरवात करते. ज्याप्रमाणे महिलांना चाळीशी-पंचेचाळिशीमध्ये थोडे शारीरिक बदल आणि मानसिक बदलांना सामोरं जावं लागतं; त्याप्रमाणे पुरुषांमध्ये देखिल असेच बदल होत असतात; त्यालाच 'अँड्रॉपॉज' असं म्हणतात.)
अलीकडच्या काळात किमान शहरांमध्ये मेनोपॉजबद्दल हळूहळू चर्चेला सुरवात झाली आहे. स्त्रियांच्यात साधारण चाळीशी नंतर होणारे बदल; त्यांचे ऋतुचक्र बदलणे आणि त्यामुळे त्यांच्यात होणारे शारीरिक आणि मानसिक बदल याची अलीकडे काही प्रमाणात दखल घेतली जात आहे; आणि हे चित्र समाधानकारक आहे यात प्रश्नच नाही. पण ज्याप्रमाणे मेनोपॉजबद्दल मोकळेपणी बोलले जाते त्याचप्रमाणे अँड्रॉपॉज देखील थोडी चर्चा झाली पाहिजे. कारण स्त्रियांप्रमाणेच पुरुषदेखील या विशिष्ट शारीरिक आणि मानसिक संक्रमणातून जात असतात.
अँड्रॉपॉजचे कारण पुरुषांमधील hormone testosterone कमी होणे हे असते. अर्थात हे टेस्टोस्टेरोन कमी होणे हा वाढत्या वयात शरीरात होणारा नैसर्गिक बदल असतो. काही मतांप्रमाणे हे टेस्टोस्टेरोन साधारणपणे वयाच्या तिशीनंतर प्रत्येक दशकात दहा टक्यांनी कमी होत असते. काही अभ्यासकांच्या मते साधारणपणे वयाच्या पन्नाशीमध्ये तीस टक्के पुरुष कमी होणाऱ्या टेस्टोस्टेरोनच्या प्रमाणामुळे अँड्रॉपॉज अनुभवतात. यामुळे अनेकजण शारीरिक आणि मानसिक बदल अनुभवतात. अँड्रॉपॉजचा परिणाम अनेक प्रकारे होऊ शकतो. शक्ति कमी होणे, mood swings, चीडचीडेपणा, hot flashes, अस्वस्थपणा, depression, अतिरिक्त वजन वाढणे (पोट सुटणे), स्मरणशक्ती कमी होणे, केस गळणे आणि शरीरसुखाची इच्छा कमी होणे असे काही ठळक बदल पुरुषांना जाणवतात. टेस्टोस्टेरोन कमी होण्यामुळे हृदयविकाराचा झटका येणे किंवा हाडांची ठिसूळता वाढणे हे काहीसे सिरीयस त्रास देखील होऊ शकतात. यावर योग्य प्रमाणात व्यायाम करणे, योग्य आहार घेणे हे उपाय प्रत्येक डॉक्टर सांगतात. त्याशिवाय डॉक्टर्सच्या सल्ल्याने टेस्टोस्टेरोन replacement देखील करता येते.
अर्थात हे सगळे उपाय आपण विविध माध्यमातून वाचू किंवा समजून घेऊ शकतो. मात्र मेनोपॉज काय किंवा अँड्रॉपॉज काय हे स्त्री आणि पुरुषांमध्ये होणारे शारीरिक आणि पर्यायाने मानसिक बदल आहेत. जे वयापरत्वे होणारच आहेत. यावर डॉक्टर्सकडून मदत घेणे, योग्य व्यायाम आणि योग्य आहार घेणे हे उपाय तर आहेतच. पण त्याचप्रमाणे एक चांगली lifestyle सुरु करणे हे आहे. कारण जर सुदृढ मन असेल तर शरीरात होणारे बदल आणि त्यामुळे होणारे त्रास सहन करणे कदाचित् थोडे सोपे जाईल.
सर्वसाधारणपणे वयाच्या चाळीशी किंवा पंचेचाळीशीपर्यंत स्त्री-पुरुष दोघांनी त्यांच्या एकूण करियरमध्ये बऱ्यापैकी जम बसवलेला असतो. मुलं देखील तशी मोठी झालेली असतात. पण तरीही सतत पुढे पळण्याची इच्छा प्रत्येकातच असते. मग अजून चांगले काम... पुढची पोस्ट मिळवण्यासाठीची मेहेनत... यामुळे एक चांगले आयुष्य जगण्याचे राहून जाते आहे हे मात्र कोणाच्या लक्षात येत नाही. लग्नानंतरचे गुलाबी दिवस सगळेच अनुभवतात. मग कधीतरी मुलं होतात आणि प्रपंच वाढतो. करीयरची घोडदौड आणि घरच्या वाढत्या जवाबदाऱ्या यामुळे जगणे मात्र राहून जाते. वर्षातून एकदा कुटुंबाला एक झकास टूर करून आणली की जवाबदारी संपली असा काहीसा दृष्टीकोन होतो. हळूहळू वाढत्या वयाबरोबर मधुमेह, रक्तदाब, कोलेस्ट्रोल वाढणे हे जगजाहीर आजार दोस्ती करायला लागतात. एकूणच वाढणाऱ्या ताणामुळे चिडचिड, अस्वस्थता वाढते. यातून एकमेकांना समजून घेणे कमी होते आणि मग संसार चालू राहातो पण मनं कायमची दुखावली जातात. याचं एक महत्वाच कारण म्हणजे मेनोपॉज आणि/किंवा अँड्रॉपॉज हे देखिल आहे; हा विचार मात्र कोणी करत नाही.
पण जर खरच चाळीशी नंतर आपल्यात होणारे बदल आपण समजून घेऊन आपल्या साथीदाराबारोबरचा संवाद वाढवला आणि लहान लहान गोष्टींमधून आयुष्यातला आनंद मिळवायला लागलो तर कदाचित् आयुष्य जास्त सुंदर आणि परिपूर्ण असेल. त्यामुळे एकमेकांबरोबर वेळ घालवणे, थोड्या अवांतर गप्पा मारणे जास्त महत्वाचे आहे. आपण तरुण वयात आठवणीने एकमेकांच्या आवडी लक्षात ठेऊन एकमेकांना गिफ्ट्स देतो. तेच वयाच्या पंचेचाळीशीनंतर करायला काय हरकत आहे. surprise काय फक्त तरुणांना आवडते? मुरलेल्या नात्याला देखिल नव्हाळीचे गोड भाव आवडतात.
म्हणून एक प्रेमळ सल्ला देते! पत्नीला/पतीला I LOVE YOU चाळीशी नंतरच्या वयात म्हणून तर बघा... मुरलेल्या लोणच्या प्रमाणे त्याची चव ओठांवर रात्रभर रेंगाळेल.

हा मुद्दा जो बर्याच लोकांना अनभिज्ञ आहे त्या मूद्याचे नेमक्या शब्दात विवेचन आहे.चाळीशीकडे वाटचाल करणार्या प्रत्येकाने हे वाचले पाहिजे
ReplyDeleteधन्यवाद.माझं म्हणणं इतकंच आहे की पुरुषांनी स्वतःकडे थोडं डोळे उघडून बघायला हवं.प्रत्येक व्यक्तीचा शरीरधर्म असतोच. ते बदल स्वीकारले तर आयुष्य सोपं होतं.
ReplyDeleteछान लेख आहे. ज्ञान वाढवणारा आणि ४०शी नंतरचा सुखी संसारा जपणारा.
ReplyDeleteधन्यवाद, खुप खुप शुभेच्छा.
धन्यवाद अजय.
DeleteExcellently worded this critical topic. Keep it up.
ReplyDeletethank u
ReplyDeleteJyotiji,
ReplyDeleteNamaskar,
Excellent article, very well penned & an topic par excellence very well executed.
Only an intelligent, bold & broad-minded lady like you can actually initiate such an brainstorming subject...
Kudos to the penning power of the lady dye Jyoti Alavani..
Looking forward next Friday....
Regards,
Kunal Ratnaprabha Tate
thank you Kunal ji
DeleteIt's a very nice sharing. In day to days life, people running away to earn money and forgets to earn love with it.
ReplyDeleteखुपच छान!
ReplyDeleteनव्याने स्वत:ची भेट झाल्यासारखं वाटलं. लहान लहान गोष्टींमधुन आनंद व्यक्त करण्याची कल्पना खुप आवडली.
आम्ही दोघांनी एकत्रच वाचली आणि आम्हाला खूप आवडली.
अभिनंदन!
म्हस्कू आणि उषा.
धन्यवाद म्हस्कु आणि उषा
ReplyDeleteखूप छान विचार मांडले आहेत. विषय ही वेगळा निवडला. Looking forward to your next blog.
ReplyDeleteSmita Tawde
Thank u smita ji
ReplyDeleteखूप छान माहिती दिलीत आपण. हि माहिति शक्यतो डाॅक्टर कडे गेल्या शिवाय कळत नाहि.
ReplyDeleteधन्यवाद
Deleteज्योती, हा पुरुषांच्या शारीरिक बदलाबद्दल तुला लिहावस वाटलं त्याबद्दल तुझं अभिनंदन. पुरुषांनाही अश्या बदलातून जाव लागतं हे तस तसं बर्याच जणांना माहीत नसतं. बर्याचदा अश्या बदलांच्या अज्ञानापोटी कौटुंबिक कलह होवू शकतात. अश्या प्रकारे समाज प्रबोधन करण्यात leading from front असण्यासाठी तुझं कौतुकंच
ReplyDeleteधन्यवाद. भारतीय संस्कृती पुरूषप्रधान असल्याने दुर्दैवाने पुरुषांच्या मानसिकतेचा फारसा विचार होत नाही;असे माझे मत आहे. मुलगा लहानपणी रडला तर मुलींसारखे काय रडतोस अशी सुरवात होऊन पुढे एखादे काम जर पुरुषांकडून झाले नाही तर त्यांना बांगड्या भर असे सांगितले जाते.... यातूनच मन मोकळेपणी बोलणे म्हणजे बायकीपणा अशी नकळत पुरुषांची भावना होते.
ReplyDeleteत्यामुळे असे विषय मुद्दाम चर्चिले गेले पाहिजेत असे माझे मत आहे. जेणेकरून आपणही मनातले भाव बोलून दाखवले पाहिजेत हा विचार पुरुषांच्या मनात येईल.
नक्कीच चर्चिले गेले पाहिजे व पुरुष असे विचार मित्रानं मध्ये पण चर्चा फार कमी करतात करण पुरुषी पणा आड येतो
ReplyDelete