मेनोपॉज.... एक संक्रमण!
स्त्री साधारण चाळीशीच्या पुढे सरकली की तिच्यात अनेक बदल व्हायला लागतात. मुलं स्वतःचं शाळा/कॉलेज स्वतःच सांभाळायला लागलेली असतात. नवरा नोकरी/धंद्यात सेट झालेला असतो. ती स्वतः नोकरी करत असली तर ती देखील काम, पगार आणि होणारी धावपळ यात adjust झालेली असते. नोकरी नसली तर घर सांभाळत तिने स्वतःला थोडं बिझी केलेलं असतं. सासू-सासरे असले तरी आता एकमेकांचं काय पटत आणि काय नाही ते एकमेकांना बरोबर माहीत असतं. त्यामुळे एक सुखी-संसारी स्त्री तिच्या अंगा-प्रत्यांगातून आणि वागण्या-बोलण्यातून दिसायला लागलेली असते.
पण मग या सुखात देखील तिला काहीतरी खुपायला लागतं. ते नक्की काय असत ते तिला देखील कळत नाही. पण वयात येणाऱ्या मुलांनी कधीतरी थोडसं जरी उलट उत्तर दिलं तरी तिच्या डोळ्यात पाणी उभं राहतं. ती नेहेमीप्रमाणेच मनापासून काहीतरी सांगत असते आणि नवरा देखिल नेहेमीप्रमाणेच दुर्लक्ष करतो आणि तिला वाटायला लागतं 'याला मी नकोशी झाले आहे.' हिने ठरवलेला मेनू सासूने बदलला आणि त्या बदललेल्या मेनूचं घरात सगळ्यांनी कौतुक केलं की तिला वाटत आता आपली गरजच संपली आहे.
तिला हे बदल मनातून जाणवत असतात; कळत असतात. त्याची कारणं कदाचित ती समजत देखिल असते. शरीरात होणारे बदल तिला जाणवत असतात. दर महिन्याला येणारी पाळी अलीकडे स्वतःच्या मनाप्रमाणे तारखा बदलायला लागलेली असते. कधी स्त्राव जास्त; तर कधी फारच कमी झाल्याने अजून गोंधळ माजलेला असतो मनात. वाढत्या वयाची जाणीव व्हायला लागलेली असते. अलीकडे आरशासमोर थोडा जास्त वेळ ती उभी राहायला लागते. वाढणारं वजन आणि चेहेऱ्यावरच्या इतराना न कळणाऱ्या सुरकुत्या तिला मात्र जाणवायला लागलेल्या असतात. एरवी 'घाई आहे'; म्हणून जेमतेम पावडर-टिकली आणि लिपस्टिक लावणारी ती आवर्जून एखादं क्रीम आणते स्वतःसाठी. मनात होणारी खळबळ तिला कळत असते देखील आणि नसते देखील.
'मेनोपॉज सुरु झाला असेल का ग?' अस्वस्थ मनाने मैत्रिणीला प्रश्न विचरला जातो. 'अग, याला प्रि-मेनोपॉज म्हणतात. मी वाचलं आहे इंटरनेटवर.' मैत्रिणीचं उत्तर. मग रात्री काम आटोपल्यावर आणि घरातले सगळे झोपल्यावर गूगलबाईला जागं करून ती देखील या 'प्रि-मेनोपॉज आणि मेनोपॉज'बद्दल माहिती गोळा करायचा प्रयत्न करते. होणारे बदल... घ्यायच्या काळज्या... गायनॉकॉलॉजीस्टची भेट घेण... सुरू होतं; आणि हे सगळं ती आपलं आपण करत असते. अस्वस्थ मनातला एक कोपरा तिला सांगत असतोच,'तू उभी राहिलीस तर घर उभ राहील. त्यामुळे मनातून अस्वस्थ असलीस तरी त्याचा त्रास करून घेऊ नकोस.' आणि तरीही...... ती मनातून खूप घाबरलेली असते आणि एकटी देखिल असते. या एकटेपणात नवऱ्याच्या एका प्रेमळ कटाक्षासाठी तिचे डोळे आसुसलेले असतात. एक हात मुलांना जवळ घेण्यासाठी अस्वस्थ असतो; तर दुसरा हात संसार हातातून सुटत तर नाही न या भितीने सगळं घट्ट जवळ ओढत असतो. एकाच वेळी तिला सगळ हवं देखिल असतं आणि नको देखील.
आणि तिचं मन! ते मात्र एकूणच संक्रमणात अडकलेलं असत. तरीही या संक्रमाणाला सामोरं जाण्याची तिने तिच्या मनाची तयारी केलेली असते. अर्थात हे सगळं तिला कोणालातरी सांगायचं असतं; आणि तिला तिच्या आपल्यांनी फक्त इतकंच म्हणायला हव असतं.... "मला कळतय ग... तू बोल मनातलं! मी घेईन समजून."