एक संध्याकाळ... सागराची...
वहात्या वाऱ्याची...
ओघवत्या गप्पांची...
ओठावर रेंगाळणाऱ्या... हुरहुरीची...
एक संध्याकाळ सागराची...
गुंतलेल्या बोटांची...
हसलेल्या ओठांची...
वाढलेल्या... ओळखिची...
एक संध्याकाळ... सागराची...
ओल्या वाळुतल्या पावलांची...
मनात उठलेल्या लाटांची...
निघतानाच्या... घालमेलीची...
व्वा!
ReplyDeletekhupach sunder
ReplyDeleteछोटीशीच पण मोठा अर्थ सांगणारी...खूप छान...
ReplyDelete