Friday, March 6, 2020

#खजुराहो दर्शन भाग 2

#खजुराहो दर्शन भाग 2

#खजुराहो दर्शन भाग एक मध्ये #खजुराहो संदर्भातील मला माहीत असलेली ऐतिहासिक आणि पौराणिक माहिती मी दिली. तरीही मला हे सतत वाटतंय की अजूनही खूप काही सांगायचं बाकी आहे. मला वाटतं की मागील भागात जे फोटो राहिले आहेत; ते या भागात देते आणि त्याअनुषंगाने माझ्या मनातले विचार मी व्यक्त करते.


खरंच या शिल्पाचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच. स्त्री आणि पुरुषाच्या चेहेऱ्यावरील तृप्ततेचे भाव दाखवत असतानाच दोघांचेही एक पाय वर आणि एका पायाचे आलिंगन इतक्या उत्कृष्ट रीतीने कोरणे अवघडतच आहे.



या शिल्पातील स्त्रीच्या पारदर्शक आणि मांडीपर्यंतच असलेल्या वस्त्राचा आभास कितीतरी सुदंर प्रकारे दाखवला आहे. त्याचबरोबर कदाचित अंघोळ करून बाहेर आल्यानंतर ती तिचे अंग पुसते आहे त्यामुळे तिच्या गळ्यातील हार मानेच्या बाजूला उलटा झाला आहे; हे देखील प्रतीत केले आहे



प्रियकर आणि प्रेयसीची प्रणायक्रिडा चालू असताना चोरून बघणाऱ्या पुरुषाला देखील प्रणय इच्छा झाली असल्याने तो हस्तमैथुन करत आहे. अस तर नसेल ना की हजारो वर्षांपूर्वी प्रणय केवळ बंद दाराआडच करावा असे नाही हा विचार मान्य असेल?





बहुदा त्याकाळात मोठ्या गुन्ह्याची शिक्षा ही हत्तीच्या पाई देणे ही असावी असं वाटतं आणि मनात येतं आजच्या काळात स्त्रियांवर जे अन्याय करतात त्यांना देखील हीच शिक्षा झाली पाहिजे


या शिल्पामध्ये दोन खास वैशिष्ट्य दिसून येतात. एकतर या स्त्रीने परिधान केलेले वस्त्र पारदर्शी आहे हे अत्यंत सुंदर पद्धतीने तिच्या पायाकडील नाजूक रेषेवरून दिसून येते. दुसरी खास गोष्ट म्हणजे या स्त्रीच्या उजव्या मांडीवरील विंचवाचे कोरीव काम. याचा अर्थ त्या काळात देखील टॅटू म्हणजेच शरीरावर गोंदवून घेण्याची पद्धत असावी. असे म्हणतात की विंचू हा उत्तम शरीरसौख्याचे प्रतीक आहे. कदाचित असे तर नसेल ना की त्याकाळात स्त्रिया अत्यंत मोकळेपणी आपली इच्छा अशाप्रकारे शरीरावर गोंदवून घेत असतील!




एका श्रीमंत सुखी कुटुंबाचे शिल्प! त्यांच्या बसण्याच्या आसनावरून त्यांची सांपत्तिक स्थिती लक्षात येते. त्याचप्रमाणे चेहेऱ्यावरील सुखी आणि आनंदी भाव देखील उत्तम रीतीने कोरलेले आहेत

याशिल्पकला बघताना माझ्या मनात सारखा एकच विचार येत होता की कसे असेल त्याकाळातील आयुष्य? या शिल्पांमधून एक गोष्ट खूपच स्वच्छ प्रतीत होते की त्याकाळात स्त्रीला आणि तिच्या भावनांना अनन्यसाधारण महत्व होते. त्याचबरोबर तिला बरोबरीची वागणूक मिळत असावी. समाजातील तिचे स्थान दुय्यम नव्हते. तिला तिची मते सांगण्याचा पूर्ण अधिकार होता आणि कदाचित त्याकाळात आपला शरीरसुखासाठीचा जोडीदार निवडण्याचा मोकळेपणा देखील तिला होता.

पण मग हा प्रश्न खरच मनात सतत येतो की पुढे जाऊन आपला इतिहास का बरं बदलला? आजदेखील आपण स्त्रीला दुय्यम दर्जा देतो. तिच्या घराबाहेरील कर्तृत्वाचा खूप गाजावाजा होत असला तरी तिचं घरातच असणं; घर आणि संसार सांभाळणं यात टी काही कौतुकास्पद करते आहे असं आपल्याला वाटतच नाही; हे किती दुर्दैवी! एक 'की और का' सिनेमा येऊन जातो.... आणि शेवटी केवळ लिंग बदलून तोच प्रश्न तोच विचार आपल्यासमोर ठेऊन जातो. स्त्री स्वातंत्र्याबद्दल बोलताना देखील तिने समजून उमजून योग्य कपडे घालावेत; असं मत स्त्रियांचं असतच न! मुलींना सलसपणे वागण्याचे वेगळे धडे नाही दिले जात.... मात्र दुर्दैवाने मुलांना स्त्रीसन्मान केला पाहिजे हे सांगावं लागतं!!!

आज आपली संस्कृती पुढारलेली आहे असं आपण मानतो.... हे खरं आहे की हजार वर्षांपूर्वी कदाचित आजच्यासारखे मोबाईल्स नसतील, गाड्या किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू नसतील.... मात्र मला वाटतं की ती संस्कृती विचारांनी आणि आचारांनी आपल्यापेक्षा जास्त प्रगत होती.

2 comments:

  1. उत्तम !

    मी पहिल्यांदाच एका स्त्रीच्या नजरेतून खजुराहो पाहिले. मला नेहमीच ते देवी देवतांचे पवित्र मंदिर वाटते. अध्यात्मिक सुख आणि समाधान जाणवते.

    त्या काळात "काम" आणि त्या ही पेक्षा "स्त्री" या दोन्ही विषयाना एक सन्मान होता. "काम" खुलेआम करण्याचे स्वातंत्र्यही असावे. असे स्वातंत्र्य जे आज आपण पाश्चात्य देशात पाहतो खरे परंतु खजुराहो मधील पावित्र्य आणि कलात्मकता पाश्चात्य देशात नाही.

    खजुराहोचा काळ, समाज, संस्कृती अश्लीलता किंवा बीभत्सतापणापासून मैलो दार होती. त्या काळी हे शब्दसुद्धा नसावेत. पण या पातळीपर्यंत पोचायलाही खजुराहोने अनेक शतकांचा प्रवास केला असावा.

    रस्त्यावर खुलेआम घाण करणारा आणि प्रेम मात्र लपून छपून करणारा आपला दुटप्पी समाज - खजुराहो पर्यंत पोचायला , त्याला वेग नको तर एक योग्य दिशा हवी. पालकच ही योग्य दिशा आपल्या मुलांना संस्कारातून देऊ शकतात. घरा घरातूनच याची योग्य सुरुवात व्हायला हवी.

    ReplyDelete
  2. आपल्या प्रतिसदाबद्दल धन्यवाद.

    अगदी खरं म्हणालात. जेव्हा पाश्चात्य किंवा ख्रिश्चन आणि मुस्लिम विचार अस्तित्वात देखील नव्हते त्याकाळातील हिंदू विचार संस्कृती या खजुराहोच्या शिल्पातून व्यक्त झाली आहे; याचा विचार आणि आदर आजच्या so called उदारमतवादी लोकांनी केला पाहिजे असं मला वाटतं

    ReplyDelete