Being *ALONE* n not *LONELY*!
एक सांगू का? आपण सगळेच एक साचेबंद आयुष्य जगत असतो. आपले आई-वडील हौसेने आपल्याला जन्माला घालतात... लहानपणी शाळा... तरुणपणी कॉलेज... मग एखादी चांगलीशी नोकरी किंवा व्यवसाय.... यथावकाश लग्न. असा सरधोपट मार्ग आपल्यापैकी बहुतांशी सगळेच जगतो. पुढे आपण देखील हौसेचे आई-वडील होतो. साधारण एवढ सगळ होईपर्यंत आपण पस्तिशीत पोहोचलेलो असतो. अर्थात अजून आर्थिक स्थिरता मनासारखी साधलेली नसतेच.... मग थोडं सुखासीन आयुष्य जगण्याच्या इच्छेने म्हणा किंवा नोकरी-व्यवसायातल्या कॉम्पिटीशनला तोंड द्यायचं असत म्हणून म्हणा आपण पळत असतो. अचानक कधीतरी आपल्या लक्षात येत की आपण पंचेचाळीशी गाठली देखील. आता थोडं सोपं झालय आयुष्य. मुलं मोठी झाली आहेत. त्यांचं असं एक विश्व आहे. मात्र आपण त्या विश्वाचा एक लहानसा भाग आहोत फक्त. आपली बायको/नवरा देखील काहीसे त्यांच्या आयुष्यात रमले आहेत. हळूहळू कुठेतरी मनात एकटेपणा जाणवायला लागतो. BEING LONELY feel!
मग आपण देखील कधीतरी हळू हळू जुने मित्र-मैत्रिणी शोधायला लागतो. क्वचित् कधीतरी होणारे फोन्स अधून-मधून व्हायला लागतात. ग्रुप्स तयार होतात. भेटी ठरायला लागतात. मुलाचं चाललेलं शिक्षण, त्यांचे आणि आपले देखील पुढील करियर प्लान्स हे विषय सुरवातीला हमखास असतात. हळूहळू आपल्याला या जुन्या मैत्रीतला मोकळेपणा आवडायला लागतो. भेटी वाढायला लागतात; आणि जुने दिवस गप्पांच्या ओघात येतात. मग चर्चा काहीशी बदलते....
"यार तू कसला झक्कास गायचास रे शाळेत. शिकत देखील होतास न? मग पुढे काय झालं?"
"सोड यार. दहावीत चांगले मार्क्स हवे होते. म्हणून मग सोडल गाण-बिण. आणि नंतर वेळच नाही मिळाला. पण तानसेन नसलो तरी आपण पक्के कानसेन आहोत हा. solid collection आहे आपल्याकडे. ये एकदा दाखवतो."
"ए तू कायम नाटकांमध्ये भाग घ्यायचीस ग. तेव्हा तर असच काहीतरी करायचं आहे अस म्हणायचीस? पुढे काहीच नाही केलंस?"
"पुढे काय करणार ग? कर्म माझ! अग ते त्या वयातले बालिश विचार होते. बी. कॉम. नंतर बँकेत लागले... आता ऑफिसर आहे. नाटक-बिटक बहुतेक नसत जमल मला. पण आता एकही चांगल नाटक सोडत नाही ह बघायचं. किमान अशी तरी हौस भागवून घेते."
"अबे तू शाळेत एम. एफ. हुसेनला लाजवेल अशी चित्र काढायचास. आता काय फक्त खर्डेघाशी?"
"यार! इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली आणि मग राहूनच गेल हे सगळ."
हे असे विषय होतात. आणि मग कधीतरी आपल्याला वाटायला लागत खरच आपल्याला काहीतरी छंद होतेच की. मग बायकोशी/नवऱ्याशी गप्पा मारताना किंवा ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी बोलताना आपण सांगतो आपली ती लहानपणी बघितलेली स्वप्न. अशा गप्पांमध्ये कोणीतरी सहज म्हणून जातं;" अरे वेळ नाही गेली अजून. त्यात करियर नाही केलस तरी चालेल, पण छंद आहे तर आता चालू कर की." त्याक्षणी ऐकून न ऐकल्यासारखं करत असलो तरी खोल मनात आपण देखील तो विचार करायला लागतो. नकळत कधीतरी आवडणाऱ्या छंदाचा क्लास जवळपास शोधतो आणि जमेल तसं... जमेल तेव्हा आपली हौस पुरवून घ्यायला लागतो. अलीकडे अचानक जाणवायला लागलेला एकटेपणा अचानक नाहीसा होतो. स्वतःत हरवून जायला लागतो आपण... कदाचित जागायला शिकतो आपण.... अगदी नकळत!
.... आणि मग पुढच्यावेळी जेव्हा तेच जुने मित्र-मैत्रिणी भेटतात तेव्हा हौसेने त्यांना या नवीन हौसेची माहिती देतो. एक वेगळाच आनंद असतो या परत एकदा सुरु केलेल्या छंदात. हरवून जायला लागतो आपण त्यात. मग आपल्यातच हरवून जातो आपण. खूप खुश राहायला लागतो. मनातला एकटेपणा नकळत कमी झालेला असतो.... आणि अनेकदा सोबत नसूनही आपण दुःखात नसतो.
THAT'S WHAT I CALL BEING ALONE AND NOT LONELY!!!
स्वतःत हरवून जाणं................... एकटेपणात नाही!!!
मग? तुमचा काय छंद आहे? केलीय का सुरवात? नाही? मग कधी करणार?
हे खरं आहे.असच होतं सगळ्यांच. मस्त
ReplyDeleteधन्यवाद
DeleteBeing alone and not lonely अतिशय भावले
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDeleteKhup Sundar 👌👌
ReplyDeleteधन्यवाद प्रतीक
ReplyDeleteप्रत्येकाच्या मनाचा आरसा तुम्ही दाखवलात!!!हो हे अगदी खरं आहे ह्या परिस्थितीतून सगळेच जातात काहींना स्वतःचा शोध लागतो कही ह्या आरश्याच्या प्रतिबिंबात गुरफटतात.पण ह्या आरश्यात स्वतःला बघणे सोडू नये हेच खरं...खुप छान!!!
ReplyDelete