लिव इन आणि समाजाची मानसिकता
"अग ते माझ्या शेजारच्या फ्लॅटमध्ये राहायला आलेलं जोडपं आहे ना त्याचं लग्न नाही झालेलं."
"काय सांगतेस काय? तुला बऱ्या असल्या बातम्या मिळतात."
"अग, काल मी घरी येत असताना ती भेटली जिन्यात. मी विचारलं तुझा नवरा काय करतो? म्हणाली तो माझा नवरा नाही काही. आम्ही अजून लग्न नाही केलेलं असंच राहातो. कमाल आहे न? काय बोलणार यावर? मी आपली गपचूप घरात शिरले माझ्या."
"काय सांगतेस? स्पष्ट सांगितलं तिने?"
दोन मैत्रिणी बागेत आपापल्या मुलांना खेळायला सोडून गप्पा मारत बसल्या होत्या. मी नेमकी त्यांच्या बाजूच्याच बाकावर बसले होते त्यामुळे त्यांचा संवाद एकू आला आणि मनात विचार आला.. हे लिव इन नातं इतक का बरं अस्वीकारार्ह्य असावं अजूनही? या दोघींची मुलं लहान आहेत म्हणजे या देखील जेमतेम पस्तिशीच्या आतल्या असणार. ती नवीन आलेली शेजारीण देखील साधारण तिशीच्या वयातली असू शकते. म्हणजे तसा वयात फार फरक नसावा. मग तरीही तिची इच्छा म्हणून ती अशी लिव इन मध्ये राहात असावी; असा विचार या का नाही करत. थोडे नकारार्थी विचार का आहेत यांचे?
समजा एक मुलगा आणि एक मुलगी यांनी लग्न न करता रहायचे ठरवले तर त्या बाबतीत एकूणच समाजाची सर्वसाधारणपणे नकारार्थी भावना का असावी? अर्थात त्यांच्या या निर्णयात त्या मुलांच्या पालकांचे मत खूपच महत्वाचे असणार. पण मग तो त्या दोन कुटुंबांचा प्रश्न ठरतो. अनेक सोसायटीजमध्ये लिव इन नातं असणाऱ्या जोडप्याला घर भाड्याने द्यायला कोणी तयार नसते. अस का असावं? जर ते जोडपं सभ्यता पूर्वक रहात असेल तर त्या जोडप्याचा लग्न झालं आहे किंवा नाही याविषयी इतरांना हरकत घेण्यासारखं काय असाव?
एक महितीतली घटना... एका मुलीने प्रेम केलं आणि वर्षभरातच लग्न केलं. तीन वर्ष झाली असतील-नसतील आणि तिचं आणि तिच्या नवऱ्याच पटेनास झालं. अगदीच सतत आणि टोकाची भांडण व्हायला लागली तेव्हा तिने घटस्फोट घेण्याचं ठरवलं. तशी ती चांगल्या कंपनीमध्ये काम करत होती आणि भरपूर पगार देखील होता. पण खुद्द तिच्या आई-वडिलांनी सांगितलं अग अस एकदम घटस्फोट नको घेउस. सुधरेल तो हळूहळू. लग्न केलं आहेस न? मग थोडं सहन करायला शिक. तिच्या निर्णयात तिला फक्त मानसिक बळ हवं होत. पण तिच्या बाजूने तेव्हा कोणीच उभं राहिलं नाही. पुढे मुलगा झाला त्यांना. आज तिच्या लग्नाला चौदा वर्ष झाली आहेत. दहा वर्षाचा मुलगा आहे. ती आणि नवरा एकमेकांशी अजिबात बोलत नाहीत. मात्र केवळ लग्न केलं आहे म्हणून एका छताखाली रहातात. ती अनेकदा म्हणते की जर त्याच्या बरोबर लग्नाअगोदर राहात असते तर कदाचित लग्नच नसत केलं अशा माणसाबरोबर.
एक अजून घटना... दोघ मुलगा-मुलगी एकमेकांच्या प्रेमात होते. मुलगी अजून शिकत होती त्यामुळे त्यांना तितक्यात लग्न करायचं नव्हतं. मात्र कुटुंबाच्या आग्रहामुळे दोघांनी लग्न केलं. शिक्षण चालू असेपर्यंत मुलीने पुढे काय करायचं याचा फारसा विचार केला नव्हता. कॉलेजच्या शेवटच्या वर्षी तिने एका जाहिरात कंपनीत इंटरव्ह्यू देला आणि तिला खूप चांगली नोकरी मिळाली. तिचा performance इतका चांगला होता की तिला तिच्या कंपनीने वरची पोस्ट दिली. मात्र त्यासाठी तिला दुसऱ्या शहरात जावं लागणार होतं. मात्र सासरच्यांनी नाही म्हंटल त्यामुळे तिला ती ऑफर घेता आली नाही.
अशा काही घटना पहिल्या किंवा ऐकल्या की वाटत की लग्नाअगोदर एकमेकांना समजून घेण कितीतरी महत्वाचं असत. दोघांचे स्वभाव, आवडी-निवडी, पुढील करीयर प्लान्स सगळ समजून घेण आवश्यक असत. केवळ 'आवडला/आवडली' म्हणून लग्न करून टाकलं; हे अलीकडच्या काळात थोडं अवघड आहे.
अर्थात इतकं प्रक्टीकल असावं का? हा देखील चर्चेचा विषय होऊ शकतो. लिव इन मधील मुला-मुलीच्या पालकांचा याबद्दल विचार/मत देखील महत्वाच आहे. मुख्य म्हणजे लिव इन म्हणजे 'लग्न न करता एकत्र राहाण'. मग जर पुढे पटलं नाही तर मग दुसरा पार्टनर का? एखादं जोडपं लिव्ह इन पार्टनर्स नसतील कदाचित पण प्रेम असेल एकमेकांवर आणि प्रेमाच्या आणा-भाका झाल्या; कदाचित दोघे शरीराने जवळ आले आणि समजा पुढे नाही पटलं म्हणून त्यांनी विचारपूर्वक नातं संपवलं; त्यानंतर त्या दोघांनाही दुसरे कोणीतरी मिळाले; तर केवळ ते दोघे एका घरात लिव्ह इन सारखे राहात नव्हते म्हणून त्यांचे 'break up' मान्य कारायचे का? अर्थात हा विचार देखील व्हायला हवा की पटेपर्यंत किती लिव्ह इन नाती जोडायची आणि तोडायची? अनेक प्रश्न उभे राहू शकतात. अलीकडे pre-marrage councelling देखील असतंच.
पण 'अलीकडची पिढी' अस म्हंटल तरी या मुलांना देखील मन-भावना असतातच न. त्यामुळे जर पालकांनी थोडा विश्वास दाखवला तर ही मुलं सतत धरसोड वृत्तीने नक्कीच वागणार नाहीत. त्यामुळे लिव इन नात्याकडे नकारात्मक दृष्टीकोनातून पाहू नये अस मला वाटत.
अर्थात लिव्ह इन नात्याची चर्चा करताना एकूण सूर समाज व्यवस्था, भारतीय संस्कृती याला धक्का लागेल; आपल्याकडे स्वीकारणार नाहीत; असा असतो.
समाज व्यवस्था म्हणजे नक्की काय? कोणी ठरवली ती? जर समाज व्यवस्था आहेच तर त्या नियमांनुसार extra marital affairs देखील चूक आहेत. मग अशा affairs चे प्रमाण अलीकडे वाढले आहे अशी ही एक चर्चा आहेच. मात्र तो त्या दोन व्यक्तींचा वयक्तिक प्रश्न आहे; अस म्हणून आपण बाजूला जातोच न? हे so called affair संपले की आपल्या संसाराकडे ते परत येतात; आणि त्यांचे येणे तिने/त्याने स्वीकारावे असं आपलाच समाज म्हणतो न? सुबह का भुला.... अग अग म्हशी... अशा म्हणी यावरूनच पडल्या असतील का? मग तसेच काहीसे लिव्ह इन नात्याकडे पाहिले तर काय हरकत आहे?
समाज व्यवस्थे आंतर्गत घटस्फोट देखील फार स्वीकारार्हय नाहीत. तरीही घटस्फोटाचे प्रमाण किती टक्के आहे हे सर्वश्रुत आहेच. जर आपल्या जवळच्या नात्यातली मुलगी दुर्दैवाने(?) घटस्फोटित असली तर आपण तिच्या दुसऱ्या लग्नाचा विचार करत नाही का? जर तिला पहिल्या लग्नापासून मुल असेल तर त्या बाळाचा विचार मुलाचे किंवा मुलीचे आई वडील करत नाहीत का?
म्हणजे आपण लिव इनचा विचार करून एकत्र राहणाऱ्या तरुणांना नावं ठेवताना वरच्या दोन मुद्यांचा विचार करायला हवा का? बरं, अशा नात्यात राहणाऱ्या मुलांमध्ये भावनिक गुंतवणूक नसतेच... ते केवळ सोय किंवा काही ठराविक गरज म्हणून आणि खर्चात भाग उचलणारा सोबती मिळतो म्हणून एकत्र राहतात असा विचार जर आपण केला तर तो त्यांच्यावर अन्याय नाही का? लग्नाबाहेरील संबंधांकडे दुर्लक्ष करणे, घटस्फोट चालेल, remarrage चालेल पण लिव इन नाते समाजाला घातक आहे; हा विचार कितपत योग्य आहे? ज्यांना लिव इन मध्ये राहायचे आहे त्यांच्या पालकांनी जर या मुलांशी संवाद साधला तर त्यांची ही निवड योग्य आहे की नाही हे त्यांना ठरवणे सोपे जाईल. त्यातून होणारे मानसिक त्रास कमी होतील.
त्याव्यतिरिक्त...... तरुण वय हे बंडखोर असते. जर आपण त्यांचे विचार सरसकट नाकारले तर ते बंड करतात. आपणही आपल्या तारुण्यात काही ना काही बंड केलेच असते/ किंवा निदान विचार तरी केलेला असतोच न? जर आपण या नवीन पिढीशी मोकळेपणी बोलण्याची भावना मनात ठेवली; आणि त्यांच्या मनात तसाच विश्वास निर्माण केला तर कदाचित हट्ट म्हणून लिव इन नात्यात राहण्याअगोदर ही मुलं नक्कीच आपल्याशी बोलून सारासार विचार करण्याच्या मानसिकतेत येतीलच न! अजूनही एक मुद्दा आहे; लिव्ह इन नात्याला कायदेशीर मदत आहे की नाही? लिव्ह इन नात्यामध्ये जर:
1. दोघांमधील नाते पती-पत्नीच्या नात्यासारखे असेल;
2. दोघेही कायदेशीर लग्नाच्या वयाचे असतील;
3. त्यांचे अगोदरचे वैवाहिक जोडीदार नसतील;
4. दोघेही स्वेच्छेने आणि दीर्घकाळ एकत्र राहात असतील;
5. आणि मुख्य म्हणजे एकाच घरात एकत्र राहत असतील
आणि वरील सर्व गोष्टी सिद्ध करता येत असतील तर स्त्रियांना कौटुंबिक हिंसाचारविरोधी कायद्याचे संरक्षण मिळू शकते. त्यामुळे दोन सज्ञान व्यक्तींना स्वच्छेने एकमेकांबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्यास आता पुढाररलेल्या समाजात प्रततिबंध असण्याचे कारण नाही. अर्थात हे माझे विचार आहेत. आपल्याला याविषयी काय वाटते ते नक्की खालील कंमेंट्स कॉलममध्ये जरूर लिहावेत ही विनंती.