एक प्याला स्त्रीजन्माचा
पुढील जन्मी पुन्हा फिरुनी
लाभू दे मज जन्म स्त्रीयेचा
या जन्मी जे राहील जगणे
आकंठुन रस प्रशिन मी त्याचा
नसेन दश भुजा काली मी
किंवा मखरातील कोणी देवी
सर्वव्यापी मानव ज्योत ती
अंतरी ठेवीन माझ्या तेवती
थोडे जगणे स्वतःसाठी अन्
मग थोडा विचार इतरांचा
वैचारिक-सामाजिक बेडीला
झुगारून स्वीकारी स्वच्छंदाला
सन्मानाचा-सुंदर-तृप्त जन्म
या जन्मी लाभला मला हा
मागून घेईन त्या आत्मशक्तीतून
एक प्याला परत स्त्रीजन्माचा
सुंदर कविता
ReplyDeleteधन्यवस
ReplyDeleteखूप छान कविता. १९व्या शतकाच्या मध्यापासून म. फुलेंच्या व त्यानंतरच्या म. कर्वे वगैरे, सुधारकांनी महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची जी सुरवात केली त्या १५०-१७५ वर्षांच्या अथक प्रयत्नांतून आजची स्त्री ही इथवर पोहचली आहे. परंतू अजूनही म्हणावं तितका समान दर्जा जो स्त्रियांना मिळायला हवा तो मिळालेला नाही. त्या दृष्टीनं ही कविता हा विचार सर्वत्र पसरायला योग्यच आहे. अखिल जगतातील स्त्रियांना लवकरच त्यांच्या या लढ्यात यश मिळेल हिच अपेक्षा.
ReplyDeleteमनापासून धन्यवाद अतुलजी.
ReplyDeleteसुरेख। dhananjay gangal
ReplyDelete