प्रेम म्हंटलं की...
नुसत 'प्रेम' म्हंटलं तरी कस हिरव हिरव वाटतं...
लोणावळयाच्या थंडीतलं दाट धुक आठवतं...
कोसळणाऱ्या पावसातल भिजणं जाणवतं...
नुसत 'प्रेम' म्हंटलं तरी कस हिरव हिरव वाटतं!
long drive.. धुंद music.. या प्रेमाचेच हात पाय!
किनाऱ्याची वाळु अन् क्षितिजावरचा सूर्य तो काय;
बोटात बोटं गुंतवून पहात राहावं वाटतं...
नुसत 'प्रेम' म्हंटल तरी कस हिरव हिरव वाटतं!
coffee च्या टेबलावर गुंतलेली मनं;
प्रेमाच्या आणा-भाका shear केलेली स्वप्नं.
विश्वासानं पाउल पुढे आपोआप पडतं...
नुसत 'प्रेम' म्हंटल तरी कस हिरव हिरव वाटतं!
प्रेमाला कधी कुठे वय असतं?
ते फ़क्त असतं... किंवा नसतं...
मनाला तुमच्या कधी पटतं न पटतं... तरी.....
नुसतं 'प्रेम' म्हंटलं न की कसं हिरव हिरव वाटतं!!!
No comments:
Post a Comment